Jump to content

ताम्हाणे (राजापूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?ताम्हाणे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर राजापूर
जिल्हा रत्नागिरी जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/०८

ताम्हाणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]
ताम्हाणे(राजापूर)गावातील दृश्य

ताम्हाणे गाव हे सह्याद्री पायथ्याला वसलेले आहे. अणुस्कृरा घाटामार्गे उतरल्यास पाचल हे गाव लागते. पाचलपासून ९ किलोमीटर अंतरावर आणि राजापूरपासून ३२ किलोमीटर अंतरावर हे गाव स्थित आहे.

हवामान

[संपादन]

सह्याद्री पर्वतच्या डोंगररांगांच्या पायथ्याशी असल्याने या गावातील वर्षा ऋतू मधील पर्जन्यमान अधिक आहे. प्रतिवर्षीचे पर्जन्यमान सुमारे २५००-३००० मि. मी. इतके असते. उन्हाळ्यात येथील तापमान सुमारे ४५ अंश इतके असते तर हिवाळ्यात येथील तापमान २० अंश सेल्सियस इतके असते.

लोकजीवन

[संपादन]
ताम्हाणे(राजापूर)गावातील शेती

गावातीळ बारा वाड्यात मिळून सुमारे १२००- १५०० लोकसंख्या आहे. प्रामुख्याने शेतीवर येथील लोकजीवन आधारित आहे. तांदूळ, नाचणी, कुळीथ, वरई ही येथील प्रमुख पिके आहेत. होळी, गणेशोत्सव आणि देवदिवाळी हे उत्सव गावात मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात.

  • ताम्हाणे गावाची ग्रामदेवता गुप्तांदेवीची पालखी शिमगा उत्सवात प्रत्येक वाडीतील घराघरात जाते.शिमगा उत्सवाच्या निमित्ताने पालखी नाचविली जाते आणि आबालवृद्ध ग्रामस्थ महिला - पुरुष उत्सवाचा आनंद घेतात.उत्सवाच्या शेवटच्या दिवशी रोमट म्हणजे जत्रा होते.
  • गणेशोत्सव काळात घरोघरी गणपतीची मूर्ती स्थापन केली जाते. प्रत्येक वाडीत घरोघरी एकमेकांच्या घरी जाऊन आरती, भजने, लोकनृत्य सादर केली जातात.
  • देव दिवाळी उत्सवात ग्रामदेवतेची पूजा आणि मंदिराची सजावट, रोषणाई केली जाते. मुंबईतील भाविक ग्रामस्थ या उत्सवाला उपस्थित राहतात. रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम होतात.

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

नागरी सुविधा

[संपादन]

गावामधील मुख्य सडक डांबरी असून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची वाहतूक सुविधा गावात उपलब्ध आहे. खाजगी रिक्षा आणि वाहने दळणवळणाची सोया उपलब्ध करून देतात. गावामध्ये मोबाईल टॉवर असून आंतरजाल सुविधा उपलब्ध आहे. अंगणवाडी, प्राथमिक शाळा (५)आणि माध्यमिक शाळा (१) गावात विद्यार्थ्याच्या शिक्षणाची व्यवस्था पाहतात. पाण्यासाठी गावात हातपंप आहेत.सार्वजनिक ग्रंथालय आहे. गावात किराणा मालाचे एकमेव दुकान आणि एक स्वस्त धान्य दुकान आहे.वीजेची व्यवस्था शासकीय यंत्रणेतून उपलब्ध आहे.

जवळपासची गावे

[संपादन]

ताम्हाणे गावाच्या पंचक्रोशीत सौंदळ, पाचल, ओशिवळे,परटवली, तळवडे अशी गावे येतात. पाचल हे आठवडी बाजाराचे गाव असून दर बुधवारी आठवडी बाजार भरतो.

संदर्भ

[संपादन]

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/

चित्रदालन

[संपादन]