कुळीथ
Jump to navigation
Jump to search
कुळीथ (अथवा हुलगा) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती व एक प्रकारचे कडधान्य आहे. कुळीथ या कडधान्यात भरपूर लोह असते.[१]
लागवड[संपादन]
लागवड केल्यापासून साधारणतः ९० दिवसांमध्ये कुळीथ पीक तयार होते. सध्या हे कुळीथ (अथवा हुलगा) कडधान्य जवळजवळ नामशेष झाले आहे, कारण पूर्वी याची लागवड करणारे शेतकरी आता त्या ऐवजी जास्त मागणी असणाऱ्या सोयाबीनचे पीक घेतात. तसेच पीक काढणीला वेळ झाल्यास कुळीथ(हुलगा) टरफल फुटून बाहेर सांडतो आणि शेतात विखुरतो, परिणामी नुकसान होते.
पदार्थ[संपादन]
कुळीथापासून उसळ, पिठी किंवा पिठले आणि लाडू तयार केले जाते. कुळीथ(हुलगा) भाजून फुटाण्यासारखा ही खाल्ला जातो.
आयुर्वेदातील कथित औषधी गुण[संपादन]
कुळीथामुळे वात व कफ कमी होतो. कुळीथ मुतखड्यावर औषधाप्रमाणे काम करतात. मेद वाढला असता, सूज आली असता, जंत झाले असता हितकर असतात.
संदर्भ[संपादन]
- ^ "मराठी कुमार विश्वकोशात कुळीथाबद्दल माहिती". २८ ऑक्टोबर २०१२ रोजी पाहिले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |