गुलाबराव रघुनाथ पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुलाबराव रघुनाथ पाटील

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२०१९
मतदारसंघ जळगाव ग्रामीण

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष बाळासाहेबांची शिवसेना
व्यवसाय राजकारण

गुलाबराव पाटील (गुर्जर), गुलाब भाऊ म्हणून प्रसिद्ध, (५ जून, १९६६:जळगाव, महाराष्ट्र - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता या विभागाचे विद्यमान मंत्री आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[१][२] हे भाजपा पक्षातर्फे एरंडोल मतदारसंघातून १०व्या आणि ११व्या[३][४] तर जळगाव ग्रामीण मतदारसंघातून १३व्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात जलपुरवठा आणि निःसारणमंत्री होते. या आधी ते २०१६-१९ दरम्यान देवेन्द्र फडणवीस मंत्रीमंडळात सहकारमंत्री होते.[५]

आपल्या तोंडाळ भाषणशैलीमुळे त्यांना खानदेशातील मुलुखमैदान तोफ असेही म्हणतात.[६][७][८][९][१०][११]

पदे भूषवली[संपादन]

  • १९९९: महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले (पहिल्यांदा)
  • २००४: महाराष्ट्र विधानसभेवर पुन्हा निवडून आले (दुसऱ्यांदा)
  • २००९: शिवसेना उपनेते
  • २०१४: महाराष्ट्र विधानसभेवर पुन्हा निवडून आले (तिसऱ्यांदा)
  • २०१५: आश्वसन समिती प्रमुख महाराष्ट्र विधान मंडळ
  • २०१६ - २०१९: महाराष्ट्र राज्य सरकारचे सहकार राज्यमंत्री
  • २०१६ - २०१९: परभणीचे पालकमंत्री (महाराष्ट्र राज्य)
  • २०१९: महाराष्ट्र विधानसभेवर पुन्हा निवडून आले (चौथ्यांदा)
  • २०१९: महाराष्ट्र राज्य सरकारमधील पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री.
  • २०२०: जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नियुक्त

संदर्भ[संपादन]

  1. ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
  2. ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.
  3. ^ "Erandol Assembly Election results". Archived from the original on 2019-12-26. 2022-06-18 रोजी पाहिले.
  4. ^ "Jalgaon News". Archived from the original on 2016-03-14. 2022-06-18 रोजी पाहिले.
  5. ^ Sanjay Jog (5 January 2020). "Uddhav Thackeray allocates portfolios to his ministers, here is the complete list". Free Press Journal. 2 April 2020 रोजी पाहिले.
  6. ^ "Maharashtra Assembly : MLAs condemn 'offensive' editorial on farmers". DNA. PTI. 18 December 2014. 20 September 2019 रोजी पाहिले.
  7. ^ "Sena legislators take on govt on farmer issue". hindustantimes.com. 21 March 2016 रोजी पाहिले.
  8. ^ "Shiv Sena MLAs 2014". Archived from the original on 12 September 2015. 22 November 2015 रोजी पाहिले.
  9. ^ "Jalgaon Rural (Maharashtra) Election Results 2014, Current and Previous MLA". Archived from the original on 2022-05-22. 21 March 2016 रोजी पाहिले.
  10. ^ "Archived copy". Archived from the original on 2 April 2015. 13 March 2015 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
  11. ^ "Jalgaon Rural Assembly Results".