दांंडी (उच्छेळी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


  ?दांडी (उच्छेळी)

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .१०९ चौ. किमी
जवळचे शहर पालघर
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
६,५४० (२०११)
• ६०,०००/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा मांगेली
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१५०१
• +०२५२५
• एमएच४८

दांडी (उच्छेळी) हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

बोईसर रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला तारापूर मार्गाने गेल्यावर कुरगाव गावानंतर पाचमार्गावर डावीकडे जाणाऱ्या फाट्याने गेल्यानंतर उच्छेळी गावानंतर हे गाव लागते. बोईसर रेल्वे स्थानकापासून हे गाव १५ किमी अंतरावर आहे.

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.

लोकजीवन[संपादन]

हे मध्यम क्षेत्रफळाच्या आकाराचे जास्त लोकसंख्या घनतेचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १४५२ कुटुंबे राहतात. एकूण ६५४० लोकसंख्येपैकी ३३०२ पुरुष तर ३२३८ महिला आहेत. गावाची साक्षरता ८८.७२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९३.२१ आहे तर स्त्री साक्षरता ८४.१५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ६७२ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १०.२८ टक्के आहे. मुख्यतः मांगेली कोळी समाजातील लोक येथे राहतात.मासेमारी हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे.

नागरी सुविधा[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस बोईसर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा बोईसरवरून दिवसभर उपलब्ध असतात.

जवळपासची गावे[संपादन]

उनभाट, पोफरण, पथराळी, वेंगणी, कुरगाव, उच्छेळी, नवापूर, टेंभी, पामटेंभी, कोळवडे, कुंभवली ही जवळपासची गावे आहेत.

संदर्भ[संपादन]

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc