मुंबईतील गणेशोत्सव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
] लालबागचा राजा प्रसिद्ध गणपती

मुंबईतील गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव म्हणून ओळखला जातो.[१][२] मुंबईत दहा दिवस हा उत्सव विशेष उत्साहाने साजरा केला जातो.[३]

इतिहास[संपादन]

मुंबईतील सर्वात जुने सार्वजनिक गणेश मंडळ म्हणून १२५ वर्षापूर्वीचे गिरगाव येथील केशवजी नाईक चाळ मंडळ प्रसिद्ध आहे.लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून हा उत्सव मुंबईत सुरू झाला.[४]

प्रसिद्ध गणेश मंडळे[संपादन]

चिंचपोकळी येथील चिंतामणी गणेश, लालबागचा राजा,[५] परळ येथील नरे पार्कचा गणपती, गणेश गल्लीचा राजा हे मुंबईतील गणपती विशेष प्रसिद्ध आहेत. गणेशोत्सवात महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून या गणपतींच्या दर्शनाला भाविक मुंबईत येतात.[६]

विसर्जन मिरवणूक[संपादन]

मुंबईच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक पहायला महाराष्ट्रातून भाविक येतात.[७] प्रामुख्याने दादर चौपाटी आणि गिरगांव चौपाटी,वर्सोवा येथील समुद्रात या गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते.[८]

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ इंग्रजी मजकूर. "Ganesh chaturthi rituals".
  2. ^ Raskino, Ivan (2018-07-20). The Soul of Mumbai (इंग्रजी भाषेत). Ivan Raskino.
  3. ^ Planet, Lonely; Harding, Paul; Blasi, Abigail; Holden, Trent; Stewart, Iain (2015-09-01). Lonely Planet Goa & Mumbai (इंग्रजी भाषेत). Lonely Planet. ISBN 9781743609743.
  4. ^ "मुंबईचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव, केशवजी नाईक चाळीच्या गणपतीची १२५ वर्षे (२. ९. २०१८)". लोकमत.
  5. ^ "1934 पासून असे बदलत गेले मुंबईतील 'लालबागच्या राजा'चे रुप (२२. ८. २०१७)". दिव्य मराठी.
  6. ^ "दर्शन घ्यावे आता (१८. ७. २०१८)". महाराष्ट्र टाइम्स.
  7. ^ "निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी!". लोकसत्ता. २४. ९. २०१८. २९. ८. २०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  8. ^ "गणपती निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला..." महाराष्ट्र टाइम्स. ६. ९. २०१७. २९. ८. २०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)