Jump to content

वर्ग चर्चा:इयत्ता १० वी मराठी कुमारभारती अभ्यासक्रमाचे संदर्भलेख

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इयत्ता_१०_वी_मराठी साठी संदर्भ लेखांसाठीचा हा वर्ग आहे

[संपादन]

@आर्या जोशी: आपण सुचविल्याप्रमाणे हा वर्ग बनवलेला आहे. आपण ही बाब लक्षात आणुन दिल्याबद्दल शतश: धन्यवाद. बालभारतीच्या पुस्तकामध्ये संदर्भ पुस्तकांच्या यादीमध्ये विकीवरील लेखांची यादी दिली आहे. महाराष्ट्रभरातील शाळेतील विद्यार्थी हे लेख वाचतील म्हणून हे सर्व लेख आपण लवकरात लवकर सुधारूयात. संदर्भासाठी कुमारभारतीच्या पुस्तकातील यादी येथे छायचित्र स्वरुपात देत आहे. WikiSuresh (चर्चा) १८:०५, २५ जून २०१८ (IST)[reply]


@Sureshkhole: धन्यवाद! हे लेख अद्ययावत करुया आपण सगळे आता योग्य संदर्भांसह.विद्यार्थी अभ्यासासाठी वापरणार त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे.आर्या जोशी (चर्चा) २१:१७, २५ जून २०१८ (IST)[reply]

सर्वांना लेख उद्ययावत करण्याचे आवाहन, प्रचालकांना ह्यांकडे विशेष लक्ष देण्याचेही आवाहन

[संपादन]

@आर्या जोशी:@Tiven2240:@अभय नातू:@सुबोध कुलकर्णी:@V.narsikar:@ज्ञानदा गद्रे-फडके:@Rajendra prabhune:@Pooja jadhav:@सुबोध पाठक:

  • हे लेख बालभारतीने आपल्या पुस्तकात दुवे देऊन अतिमहत्त्वाचे केले आहे.
  • एका दॄष्टीने आनंदाची बाब असली तरीही त्यातच दुसरा एक प्रश्न उभा रहातो तो म्हणजे विश्वासाचा, आणि ह्या लेखांचा मजकूर सुरक्षित रहाण्याचा.[]

आपण ह्या लेखांची प्रतवारी लवकरात लवकर सुधारुन ते सर्व लेख संरक्षित करावेत अशी मी प्रचालकांना विनंती करित आहे.

  • तावडे यांनी लेखांच्या गुणवत्तेसाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यातील काहीही प्रत्यक्षात येण्यापूर्वीच आपले लेख सुधारण्याचे काम झालेले असेल असाही मला पूर्ण विश्वास आहे.
  • त्यामुळे आपण सर्वजण मिळून हे सर्व लेख सुधारुयात आणि विश्वासापात्र माहिती त्यांवर आणूयात. WikiSuresh (चर्चा) १२:०३, ३ जुलै २०१८ (IST)[reply]

@Sureshkhole: नक्कीच. मी अरुणा ढेरे यांच्यावरील लेख करायला अद्ययावत घेतला आहेच. फक्त संदर्भ नोंदविण्यासाठी अधिकृत स्रोत कुठे शोधूया?आर्या जोशी (चर्चा) १२:२१, ३ जुलै २०१८ (IST) @आर्या जोशी: त्या त्या पानांच्या चर्चापानावर बोलूयात, मी तिथे दुवे देतो. WikiSuresh (चर्चा) १२:२३, ३ जुलै २०१८ (IST)[reply]

नोंद घेतली. हे मराठी विकिपीडियासाठी खूप महत्वाचे पाउल आहे. यावर काम केल्याबद्द्ल धन्यवाद. -- अभय नातू (चर्चा) २०:११, ३ जुलै २०१८ (IST)[reply]

केवळ दहावी नाही तर सर्वच इयत्तांच्या पुस्तकांत अशी संदर्भयादी दिली आहे. त्यांत पूरक संदर्भग्रंथ यादी, मराठी विपी दुवे तसेच इंग्रजी विपी दुवेही आहेत. उदा. आठवीच्या मराठी भाषा विषय पुस्तकात फकिरा, गर्भरेशीम, फिरस्ती, निसर्गायन, जोहड इ. पुस्तके आणि विठ्ठल उमप, गोदावरी परुळेकर,तुकाराम,सावता माळी, सुरेश भट इ. लेखांचे चक्क इंगजी विपीचे दुवे दिले आहेत. हे लेख बहुधा मराठी विपीवरचेही वाचले जातील. त्यामुळे हा वर्ग पाठ्यपुस्तक संदर्भसाहित्य (महाराष्ट्र राज्य) असा व्यापक करावा असे वाटते. आता विपी संपादकांची जबाबदारी वाढली आहे.हे लेख त्यामधील दुव्यांसकट वाचले जातील. अनेक शिक्षक, विद्यार्थी, पालक व शिक्षणक्षेत्रातील लोक या निमित्ताने विपीकडे वळण्याची शक्यता आहे. लेख उत्तम करुयातच त्याबरोबर इतरांना लिहिण्यासाठी प्रवृत्त करूया.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २०:३४, ३ जुलै २०१८ (IST)[reply]

वर्ग पान संपादित करताना स्वयंशाबीत सदस्यांनाच परवानगी असा निरोप दिसतो आहे . संपादन कसे करायचे याचे मार्गदर्शन हवे. सातवी आणि आठवीचे बालभारती , नववी दहावीचे कुमारभारती , नववीचे कला आणि रसास्वाद तसेच दहावीचे आंतरभारती या पुस्तकांमध्ये विविध दुवे आहेत. ते सुद्धा वर्गाच्या पानावर जोडू यात.

--Subodh Pathak (चर्चा) ११:०१, ४ जुलै २०१८ (IST)[reply]

@Subodh Pathak: मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे. नक्की आपण सर्व लेख सुधारू, सद्या हे लेख अर्ध सुरक्षित आहेत त्यामुळे आपण यात बदल करू शकत नाही. जर आपल्याला या लेखात भर टाकायचे असेल तर लेखाच्या चर्चापानावर आपले बदल प्रकाशित करा एकाद्या सदस्य ती बदल करतील. आपण ४ दिवस व १० संपादन केले की आपण ही लेख सुधारण्यासाठी पात्र होईल. त्यापर्यंत चर्चापानावर संदेश टाका --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ११:४९, ४ जुलै २०१८ (IST)[reply]


काही योजना

[संपादन]

कुमारभारती (किंबहुना *भारती) मध्ये उल्लेखलेले लेख उठून दिसण्यासाठी काही योजना केल्या पाहिजेत -

  1. अशा लेखांची यादी आणि वर्गवारी करणे
  2. लेख (कमीतकमी) अर्धसुरक्षित करावे (झाले)
  3. लेखांवर विशिष्ट साचा लावणे
  4. शुद्धलेखन काटेकोरपणे तपासणे
  5. संदर्भ देणे
  6. साचे घालणे
  7. चित्रे शोधून घालणे
  8. अचूक वर्गवारी करणे
  9. कमीतकमी लाल दुवे असणे

अभय नातू (चर्चा) २१:४८, ३ जुलै २०१८ (IST)[reply]

मी आत्ताच पुस्तके तपासली. येथे सर्व पुस्तके पीडीएफ मध्ये उपलब्ध आहेत.इयत्ता सातवी ते दहावी या पुस्तकांत मराठी/इंग्रजी/हिंदी विपी दुवे दिले आहेत. विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी शोधणे सुलभ होण्यासाठी इयत्तावार उपवर्ग आणि मुख्य वर्ग शालेय अभ्यासक्रम संदर्भसाहित्य असा केला आहे. इतर इयत्तांचे उपवर्ग इयत्ता ९ वी कुमारभारती अभ्यासक्रम संदर्भलेख असे बनवले आहेत.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:४१, ४ जुलै २०१८ (IST)[reply]

@अभय नातू आणि V.narsikar: आणि सारे संपादक, आपण वर मांडलेली योजना योग्य आहे. या निमित्ताने आपण चांगले लेख, उत्तम लेख (मुखपृष्ठ लेख) यांचे निकष ठरवूया. तसेच यासाठी आवश्यक धोरणे, मार्गदर्शक तत्वे इ. स्पष्ट करूया.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २१:४६, ४ जुलै २०१८ (IST)[reply]

इतर बालभारती पुस्तकातील दुवे

इयत्ता दहावी आंतरभारती पुस्तकातील दुवे खालील प्रमाणे. कृपया आपल्या मुख्य पानावर टाकावेत हि विनंती. सिंधुताई सपकाळ ; तुकाराम ; बहिणाबाई चौधरी; आर्किमिडीज; अनिल अवचट; पांडुरंग महादेव बापट; मोर; शेख मुहम्मद - इंग्रजी विकिपीडिया

इयत्ता सातवी बालभारती या पुस्तकात खालील प्रमाणे दुवे आहेत. पांडुरंग सदाशिव खानखोजे - इंग्रजी विकिपीडिया ; सुधा मूर्ती - पुस्तकात इंग्रजी विकिपीडियाचा दुवा आहे ; कुत्रा -पुस्तकात सिम्पल इंग्लिश विकिपीडियाचा दुवा आहे ;

इयत्ता आठवी बालभारती पुस्तकातील दुवे

या पुस्तकातील सर्व दुवे इंग्रजी विकिपीडियातील आहेत. आपल्यापैकी कुणी बालभारतीच्या संपर्कात असेल तर या सर्व व्यक्तींवरील लेख मराठी विकिपीडिया मध्ये उपलब्ध आहेत हे सांगायला हवे. निदान मराठी पाठयपुस्तकात तरी इंग्रजी विकिपीडियावरील लेख नकोत.

विठ्ठल उमप ; अच्युत गोडबोले ; गोदावरी परुळेकर ; सुरेश भट ; तुकाराम ; सावता माळी ;

इयत्ता नववी कला आणि रसास्वाद पुस्तकातील दुवे

Environmental enrichment - हा लेख मराठीमध्ये लिहिता येईल; Neuroplasticity- हा लेख मराठीमध्ये लिहिता येईल; Marathi Vishwakosh - मंडळाची विनोदबुद्धी शाबूत आहे . मराठी विश्वकोशावरील लेखासाठी इंग्रजीमध्ये दुवा ; ग दि माडगूळकर - या लेखाचा पुस्तकातील दुवा इंग्रजी विकिपीडियाचा असून अर्धवट आहे ; चार्ली चॅप्लिन - इंग्रजी विकिपीडिया ; मोक्षगुंडम विश्वेश्वरया - इंग्रजी विकिपीडिया ; ऑलिंपिक ;

--सुबोध पाठक (चर्चा) १४:२५, ५ जुलै २०१८ (IST)[reply]

धन्यवाद, दुवे उपलब्ध करून दिल्याबद्दल. बारकाईने पहिले असता असे लक्षात येते की हे दुवे व्यवस्थित विचार न करता दिले गेले आहेत. सर्च इंग्रजीतून टाकला गेला आणि जे पान आले ती लिंक दिली, किंवा मोबाईलवर सर्च केले आणि ती लिंक दिली (en.m.wikipedia) झाले आहे.आपण यावर सविस्तर निवेदन करून शासनाला देऊया.तसेच शिक्षक प्रशिक्षण संस्थेमध्ये हे पोचवूया. आपण दिलेले लेख वर्गीकृत केले आहेत.काही संदर्भ पुस्तके नमूद केली आहेत. त्या पुस्तक/लेखकाविषयी असलेले लेख सुद्धा या वर्गात समाविष्ट करता येतील.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:५८, ५ जुलै २०१८ (IST)[reply]

@सुबोध कुलकर्णी, अभय नातू, आणि V.narsikar: नमस्कार ! सुबोध यांनी नोंदविल्याप्रमाणे आपण शासनाला असे एक पत्र नक्की द्यावे असे वाटते. या व्यासपीठाची विश्वासार्हता वाढविणे यासाठी या पत्राचा उपयोग व्हावा. धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा) ११:३८, ५ जुलै २०१८ (IST)[reply]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "बालभारतीमधील धड्यांना विकिपिडियाच्या "लिंक्‍स' | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune". www.dainikprabhat.com (इंग्रजी भाषेत). 2018-07-03 रोजी पाहिले.