आर्किमिडीज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ह्या लेखातील / विभागातील सध्याचा मजकूर इतरभाषा ते मराठी मशिन ट्रांसलेशन वापरून, English भाषेतून मराठी भाषेत अंशत: अनुवादित केला गेला आहे / अथवा तसा कयास आहे. (ही सूचना/खूणपताका/टॅग लावताना, सहसा, सदर कयास संबंधीत मजकुरातील मराठी व्याकरणाच्या तफावतीवरून केले जातात). मशिन ट्रांसलेशनने मिळालेल्या अनुवादातील केवळ पूर्णतः व्यवस्थीत अनुवादीत वाक्ये तेवढीच घेण्याचा प्रयत्न केला आहे (करावा). आपल्याला आढळलेल्या त्रुटी येथे नोंदवाव्यात. लेखाच्या इतिहासातील फरक अभ्यासून भाषांतरास उपयोगी आणि अद्ययावत करण्यास मदत हवी आहे. (पहा: मशिन ट्रान्सलेशन/निती काय आहे?)
हे सुद्धा करा: विकिकरण,शुद्धलेखन सुधारणा, शब्द तपासःऑनलाईन शब्दकोश, अन्य सहाय्य: भाषांतर प्रकल्प.
दोमेनिको फेत्ती याने चितारलेला आर्किमिडीज (इ.स. १६२०)

सिराक्यूसचे आर्किमिडीज ग्रीक गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, अभियंता, आविष्कारक आणि खगोलशास्त्रज्ञ होते. [3] त्यांच्या आयुष्यातील काही माहिती ज्ञात असली तरी, त्यांना प्राचीन काळातील अग्रगण्य शास्त्रज्ञांपैकी एक मानले जाते. प्राचीन काळातील महान गणितज्ञ आणि सर्वांत महानांपैकी एक मानले जाते, [4] [5] आर्किमिडीजने अविनाशीपणाची संकल्पना लागू करून थकविण्याच्या पद्धती आणि थकबाकीची पद्धत आणि भौमितिक प्रमेय श्रेणीचे कठोरपणे सिद्ध करणारी आधुनिक गणना आणि विश्लेषण अपेक्षित आहे. मंडळाचे क्षेत्र, पृष्ठभागाचे क्षेत्रफल आणि गोलाकारांचे क्षेत्र आणि पॅराबोलाखालील क्षेत्र. [6]

इतर गणितीय यशांमध्ये पीईचे अचूक अनुमान काढणे, त्याचे नाव असणारी सर्पिल परिभाषित करणे आणि त्याची तपासणी करणे आणि मोठ्या संख्येने व्यक्त करण्यासाठी एक्सपोनेंटिएशन वापरून सिस्टम तयार करणे समाविष्ट आहे. गणिताला भौतिक घटना, पायाभूत हायडॉस्टॅटिक्स आणि सांख्यिकीशास्त्र, लिव्हरच्या तत्त्वाचे स्पष्टीकरण समाविष्ट करणारे प्रथमच होते. त्याच्या मूळ सिराक्यूसवर हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी त्याच्या स्क्रू पंप, कंपाऊंड पुलीज आणि संरक्षणात्मक युद्ध मशीनसारख्या नाविन्यपूर्ण मशीन्स डिझाइन करण्याचे श्रेय दिले जाते.

आर्किमिडीजचा मृत्यू सिराक्यूसच्या सीझ दरम्यान झाला जेव्हा त्याला रोमन सैन्याने ठार केले होते, तरी त्याला हानी पोहचली नाही. सिसेरो आर्किमिडीजच्या कबरला भेट देत आहेत, जे गोलाकार आणि एक सिलेंडरद्वारे सरकले गेले होते, ज्याला आर्किमिडीजने त्याच्या कथेवर आपला गणित शोध दर्शवण्यासाठी विनंती केली होती.

पुरातन काळात आर्किमिडीजची गणितीय लिखाणे त्यांच्या आविष्कारांपेक्षा वेगळी नव्हती. अलेक्झांड्रियातील गणितज्ञांनी त्यांचे वाचन केले आणि उद्धृत केले, परंतु प्रथम व्यापक संकलन सी पर्यंत केले नव्हते. इ.स.530 मध्ये मिलेनस इसादोरने बीजान्टिन कॉन्स्टॅंटिनोपलमध्ये, सहाव्या शतकात ईटोकिससने लिहिलेल्या आर्किमिडीजच्या कामांवरील भाष्य करताना त्यांना प्रथम वाचकपदासाठी उघडले. आर्किमिडीजच्या मध्ययुगातून वाचलेल्या लिखित कार्याची तुलनेने थोड्या प्रमाणात प्रतियांमध्ये वैज्ञानिकांच्या कल्पनांचा एक प्रभावशाली स्त्रोत होता [7] आणि 1906 मध्ये आर्किमिडीज पॅलीम्पेस्ट मधील आर्किमिडीजने पूर्वी अज्ञात कार्यात शोध लावला होता. त्याने गणिती परिणाम कसे प्राप्त केले. [8]

जन्म व शिक्षण[संपादन]

आर्किमिडीज यांचा जन्म सिसिलीमधील सेरॅक्यूज येथे झाला. सेरॅक्यूजचा राजा दुसरा हीरो व त्यांचा मुलगा गेलो यांच्याशी त्यांची दाट मैत्री होती. त्यांचे सर्व शिक्षण अलेक्झांड्रिया येथे झाले. तेथे कॉनन नावाच्या गणितज्ञाशी त्यांचा परिचय झाला. शिक्षण संपल्यावर आपल्या जन्मगावी येऊन त्यांनी गणिताचा अभ्यास पुढे चालू ठेवला. उपलब्ध असलेल्या त्यांच्या लेखांवरून त्यांच्या सखोल कार्याची कल्पना येते. त्यांचे काही लेख जवळजवळ दोन हजार वर्षांपर्यंत प्रमाणभूत मानले गेले आहेत.

भौतिकशास्त्राचा अभ्यास व शोध[संपादन]

आर्किमिडीज यांना वर्तुळ, अन्वस्त आणि सर्पिल या वक्रांच्या क्षेत्रमापनासाठी त्यांनी वापरलेली 'निःशेष पद्धत' बऱ्याच बाबतीत अर्वाचीन समाकलनाच्या [अवकलन व समाकलन] विवरणाशी जुळती असल्याचे आढळते. वर्तुळाचा परीघव्यास यांच्या गुणोत्तराचे (π)चे मूल्य ३१०/७१ आणि ३१/७ त्यांच्या दरम्यान असल्याचे त्यांनी सिद्ध केले. शंकूचे विविध प्रकारे छेद घेतल्याने बनणाऱ्या आकृतींचे क्षेत्रफळ अगर त्या आकृती अक्षाभोवती फिरवून बनणाऱ्या घनाकृतीच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ अगर त्या आकृतीचे घनफळ तुलनात्मक रीतीने मांडता येते असे आर्किमिडीज यांनी दाखविले. अंक मोजण्याच्या ग्रीक पद्धतीत त्यांनी सुधारणा केल्या.

सोनाराने बनविलेल्या मुकुटात चांदीची भेसळ असल्याचा राजा हिरो यांस संशय आला व त्याची शहानिशा करण्याचे काम आर्किमिडीज यांच्याकडे सोपविण्यात आले. या घटनेतूनच आर्किमिडीज यांना तरफेचा शोध लागला. "योग्य टेकू मिळाल्यास मी पृथ्वीसुद्धा तरफेचा साहाय्याने उचलून दाखवीन" असे त्यांनी उद्‌गार काढले होते.

आर्किमिडीजचा सिद्धान्त[संपादन]

"एखादा पदार्थ द्रवरूप किंवा वायुरूप (द्रायू) पदार्थात तरंगत असताना त्यावर खालून वर अशी एक प्रेरणा लागू होते. तिला उत्प्रणोदन असे नाव आहे व तिचे मूल्य पदार्थाने बाजूस सारलेल्या द्रायूच्या वजनाएवढे असते." हा सिद्धान्त आर्किमिडीजने प्रस्थापित केला. "पदार्थाचे पाण्यात केलेले वजन हे त्याच्या हवेतील वजनापेक्षा त्याने बाजूला सारलेल्या पाण्याच्या वजनाइतके कमी असते" हे त्यांचे तत्त्व 'आर्किमिडीजचा सिद्धान्त' या नावाने सुप्रसिद्ध आहे.

पाणी उपसून काढण्याकरिता त्यांनी शोधून काढलेल्या यंत्रात 'आर्किमिडीज स्क्रू' असे नाव प्राप्त झाले आहे व ते इजिप्तमध्ये वापरातही होते. गोफणीतून ज्याप्रमाणे दगड फेकता येतात त्याच धर्तीवर मोठेमोठे दगड फेकण्याचे यंत्र आर्किमिडीज यांनी तयार केले होते.

आर्किमिडीज स्क्रू[संपादन]

या उपकरणामध्ये एक लांब नळकांडे असून त्याच्या आत त्याच्या अक्षावर बसवलेल्या दांड्याभोवती मळसूत्राप्रमाणे बसवलेला व नळकांड्याला चिकटवलेला पत्र्याचा पडदा असतो. दांड्याचे खालचे टोक विहिरीसारख्या पाण्याच्या साठ्यामध्ये बुडविलेले असते व वरचे टोक उंचावर पाण्याच्या बाहेर असते.दांड्याच्या वरच्या टोकावर नळकांडे फिरविण्याचा दांडा बसवलेला असतो. नळकांडे योग्य दिशेने फिरवले म्हणजे नळकांड्याच्या खालच्या तोंडातून पाणी आत शिरते व मळसूत्री पडद्यावरून हळूहळू वर चढत जाऊन वरच्या तोंडातून बाहेर पडते.

आर्किमिडीज स्क्रूच्या उपयोजनेचे प्रात्यक्षिक

मृत्यू[संपादन]

रोमन सेनापती मार्सेलस् यांनी समुद्रमार्गे सेरॅक्यूजवर केलेली स्वारी राजा हीरोनी या यंत्राच्या जोरावर परतविली. तथापि खुष्कीच्या मार्गाने येऊन मार्सेल्स यांनी सेरॅक्यूज काबीज केले व त्यांच्या सैन्यातील एका सैनिकाने आर्किमिडीज यांचा शिरच्छेद केला.

आर्किमिडीजच्या लिखानांचे संपादन[संपादन]

टॉरेली यांनी १७९२ मध्ये व हायबर्ग यांनी १८८० मध्ये आर्किमिडीज यांच्या सर्व लिखाणाचे संपादन केले. त्यानंतर १८९७ मध्ये हीथ यांनी वर्क्स ऑफ आर्किमिडीज या ग्रंथात आर्किमिडीज यांचे लेख आधुनिक चिन्हे व खुणा वापरून प्रसिद्ध केले.

संदर्भ[संपादन]

इंग्रजी विकिपीडिया

बाह्य दुवे[संपादन]