तिबेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
<div" cellpadding="0"> Cultural/historical Tibet (highlighted) depicted with various competing territorial claims.
  चीनमधील तिबेट स्वायत्त प्रदेश
  अनेक स्वातंत्र्यवादी चळवळींनुसार बृहद तिबेटची व्याख्या
  चीनच्या मते तिबेटची व्याख्या
  अक्साई चीन
  भारताच्या अखत्यारीखालील प्रदेश ज्यांवर चीनने हक्क सांगितला आहे
  इतर ऐतिहासिक तिबेटी भाग

तिबेट (तिबेटी: བོད་; चिनी: 西藏) हे आशिया खंडातील हिमालय पर्वताच्या उत्तरेकडील एक पठार आहे. त्याला तिबेटचे पठार असे म्हणतात. समुद्रसपाटीपासून सरासरी १६,००० फूट उंच असलेले तिबेट हे जगातील सर्वात उंच पठार आहे. त्यामुळे त्याला जगाचे छप्पर असे सुद्धा म्हणतात. सातव्या शतकापासून इतिहास असलेले तिबेट आजवर एक साम्राज्य, स्वायत्त देशचीन देशाचा प्रांत इत्यादी अनेक स्वरूपांमध्ये अस्तित्वात राहिलेले आहे. सध्या तिबेट ह्या नावाने ओळखला जाणारा बराचसा प्रदेश चीनच्या अंमलाखाली (तिबेट स्वायत्त प्रदेश) आहे.

बहुसंख्य बौद्ध धर्मीय असलेले तिबेटी लोक दलाई लामा ह्यांना धर्मगुरू, पुढारी व तिबेटचे खरे शासक मानतात. परंतु १९५९ सालापासून १४ वे दलाई लामा तेंझिन ग्यात्सो हे धर्मशाळा, हिमाचल प्रदेश येथे भारत सरकारच्या आश्रयास आहेत व ते तेथूनच आपले सरकार चालवतात. लाई लामा हे तिबेटचे सर्वश्रेष्ठ राष्ट्रपुरुष आणि धर्मपुरुष. चौदावे दलाई लामा म्हणतात-“ संस्कृती, शिक्षण, धर्म, साहित्य आणि कला अशा सर्वच क्षेत्रात तिबेटला भारतानेच मार्गदर्शन केले. मूलभूत विचाराच्या तत्त्वज्ञानाचा प्रवाह अखंडितपणे भारतातून तिबेटमध्ये प्रवाहित झाला आणि ज्ञानोत्सुक तिबेटने त्या प्रवाहाचे अंतःकरणपूर्वक स्वागत केले.” (डॉ. हेबाळकर शरद, भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार, २०१५, भारतीय विचार साधना प्रकाशन पृष्ठ क्रमांक १७५ )

राजकीय इतिहास[संपादन]

इसवी सन ६२९ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी नरदेव हा तिबेटच्या सिंहासनावर आला. तो महत्त्वाकांक्षी आणि पराक्रमी होता. त्याने वयाच्या सोळाव्या वर्षी साम्राज्य विस्तार करण्यास सुरुवात केली. नेपाळवर त्याने आक्रमण केले. नेपाळच्या राजाने प्रसंग ओळखून आपली कन्या नरदेवाला दिली. तिने जाताना आपल्याबरोबर बुद्धाची एक मूर्ती नेली आणि तिबेटच्या राजघराण्यात गौतम बुद्धाची उपासना सुरू झाली. चीनच्या राजानेही आपली कन्या नरदेव याला दिली, तिनेही येताना शाक्यमुनी आणि मैत्रेय बुद्ध यांच्या प्रतिमा सोबत आणल्या. या दोन्ही पत्नींच्या निमित्ताने राजा नरदेव याला बौद्ध धर्माचा परिचय झाला. नरदेवाने थोन मि संभोत या बुद्धीमान आचार्याला आपल्या राजवाड्यात पाचारण केले.[१]

आध्यात्मिक आणि सांस्कृतिक विकास[संपादन]

संभोताने आपल्या सोळा सहकारी सदस्यांसह भारतात प्रयाण केले. गौतम बुद्धांच्या पवित्र बोधिवृक्षाला प्रणाम करून त्याने आपल्या अभ्यासाला आणि कार्याला सुरुवात केली. संभोताने संस्कृत, पाली, अर्धमागधी या भाषांचा अभ्यास केला. बौद्ध ग्रंथालये पाहिली. तेथील ग्रंथ अभ्यासले आणि त्यांच्या प्रतीही करून घेतल्या. लिपीदत्त आचार्य सिंह घोष यांच्याकडे त्याने लिपीशास्त्राचा अभ्यास केला. तिबेटला परत आल्यावर त्याने मध्य भारतातील प्राचीन लिपीवर आधारित तिबेटी लिपी शोधून काढली. या राजलिपीचा स्वीकार तिबेटने केला. राजाने स्वतः संभोताचे शिष्यपद स्वीकारले. त्याने संभोताजवळ चार वर्षे अध्ययन केले. ताने अनेक बौद्ध ग्रंथांची भाषांतरे केली.केवळ व्याकरण या विषयावरच त्याने कारंडव्यूह, रत्नमेघ इ. ग्रंथ लिहिले. तिबेटचा सम्राट नरदेव तिबेटचा धर्म, संस्कृती , राष्ट्रकल्पना यांचा प्रेरक आणि संस्थापक झाला. त्याने बौद्ध तत्त्वज्ञानानुसार दहा शिक्षापदांवर आधारित राज्यशासन उभे केले.[१]

भारतीय भिक्षूंचे आगमन[संपादन]

इसवी सन ७४० ते ७८६ या काळात भारतीय भिक्षूंचे तिबेटमध्ये आगमन झाले. बौद्ध पंडित आचार्य शांतिरक्षित हा पहिला प्रभावी भारतीय प्रचारक मानला जातो. त्याने तिबेटची यात्रा केली. राजा नरदेव याने त्याचे विशेष स्वागत केले.ल्हासाच्या जवळ त्याने विहार बांधला. तेथे विद्यापीठ सुरू झाले आणि शांतिरक्षित त्याचा कुलगुरू झाला.काम वाढायला लागल्यावर त्याने भारतातून आचार्य पद्मसंभव याला बोलावून घेतले. योगाचार या विषयाचा पद्मसंभव याचा विशेष अभ्यास होता. त्याने भिक्षुसंघाची स्थापना केली. अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी भारतात पाठविले.शांतिरक्षित आणि पद्मसंभव यांच्या प्रयत्नातून बौद्ध धर्मप्रचारकांचा ओघ तिबेटमध्ये सुरू झाला.[२]

हवामान  [संपादन]

पठाराचे हवामान उंच पर्वत व कोरडे तलाव असलेले उंच व कोरडे मेदयुक्त आहे. येथे पाऊस कमी पडतो आणि 100 ते 300 मिमी पर्यंत साचलेले बहुतेक पाणी गारांच्या रूपात पडते. पठाराच्या दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील भागात गवताळ प्रदेश आहेत जिथे भटक्या विमुक्त लोक गुरेसमवेत राहतात. बऱ्याच भागात इतकी थंडी असते की माती कायमचे गोठविली असते. पठाराच्या वायव्य भागात ५००० मीटर पेक्षा जास्त उंचीचे चांगतंग क्षेत्र आहे जे भारताच्या दक्षिण-पूर्व लडाख प्रदेशापर्यंत पसरलेले आहे. येथे हिवाळ्यात तपमान −60 ° से. या भयानक परिस्थितीमुळे येथे लोकसंख्या फारच कमी आहे. अंटार्क्टिका आणि उत्तर ग्रीनलँडच्या चिरस्थायी क्षेत्रांनंतर चांगटंग हे जगातील तिसरे सर्वात कमी दाट लोकवस्तीचे क्षेत्र आहे. तिबेटचे असे काही भाग आहेत जिथे लोकांनी कधीही झाड पाहिले नाही.[३]

तिबेटचे प्राचीन धर्मसाहित्य[संपादन]

विहार, संघ आणि विद्यापीठे यांच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रसार तिबेटमध्ये झाला. चौदाव्या शतकाच्या पूर्वार्धात ‘बस्तीन’ हा प्रख्यात तिबेटी इतिहासकार होवून गेला. त्याने तिबेटचे सर्व साहित्य संकलित केले. कंंजूर आणि तंजूर अशा दोन भागात हे सर्व साहित्य संकलित आहे. ४५६६ भिक्षूच्या लेखनाचे हे संकलन आहे. कंजूर या भागात विनय, प्रज्ञापारमिता, बुद्धाबतंसक, रत्नकूट, सूत्र, निर्वाण तंत्र अशा विषयांचा समावेश आहे. संघ तत्त्व नियम, भिक्षुभिक्षुणी आचार समाज, जीवनपद्धती औषधी, पदार्थ विज्ञान असे विविध विषय यात समाविष्ट आहेत. तंंजुर म्हणून ओळखल्या जाणा-या साहित्य विभागात मुख परंपरा, वंशचरित्रे, इतिहास या विषयाचे संकलन केले आहे.[१]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  1. ^ a b c डाॅॅ.हेबाळकर शरद, भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार, २०१५ , भारतीय विचार साधना प्रकाशन
  2. ^ डा.हेबाळकर शरद, भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार, २०१५ , भारतीय विचार साधना प्रकाशन
  3. ^ Midal, Fabrice (2004). Chögyam Trungpa: His Life and Vision (इंग्रजी भाषेत). Shambhala Publications. ISBN 978-1-59030-098-5.