Jump to content

शिवाजीराव पाटील निलंगेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिवाजीराव निलंगेकर पाटील

कार्यकाळ
३ जून, इ.स. १९८५ – ६ मार्च, इ.स. १९८६
मागील वसंतदादा पाटील
पुढील शंकरराव चव्हाण

जन्म ९ फेब्रुवारी, इ.स. १९३१
निलंगा
मृत्यू ५ ऑगस्ट २०२०
पुणे
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

शिवाजीराव निलंगेकर पाटील (९ फेब्रुवारी, इ.स. १९३१ - ५ ऑगस्ट २०२०, पुणे[]) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. ३ जून, इ.स. १९८५ ते ६ मार्च, इ.स. १९८६ या कालखंडात ते महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. हा कालखंड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रांतील काळजीवाहू सरकारांपैकी सगळ्यात छोटा कालखंड आहे.[]

आपल्या मुलीच्या एम.डी. परीक्षेतील मार्क वाढवून घेण्याबद्दल झालेल्या कोर्ट केसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढल्यावर निलंगेकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

संक्षिप्त परिचय

[संपादन]
  • भूषविलेली अन्य पदे : राज्यमंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, संसदीय कार्य, आरोग्य, तंत्रशिक्षण, दुग्धविकास, विधी व न्याय, सहकार, सांस्कृतिक कार्य. मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात महसूल हे खाते.
  • १९९० ते १९९१ या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद.
  • सध्या आमदार. राजकीय वारसदार पुत्र कै. दिलीप हे आमदार होते.
  • सून रूपाताई या लातूरच्या माजी खासदार.
  • नातू संभाजी हे निलंग्याचे माजी आमदार. (आजोबांचा पराभव करून आमदारकी)
  • मुख्यमंत्रीपदाचा कालावधी: ३ जून १९८५ ते १३ मार्च १९८६ पक्ष : काँग्रेस
  • पहिल्यांदा आमदार १९६२ मध्ये निलंगा मतदारसंघ.
मागील:
वसंतदादा पाटील
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
३ जून, इ.स. १९८५ – ६ मार्च, इ.स. १९८६
पुढील:
शंकरराव चव्हाण

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Shivajirao Patil-Nilangekar : माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचं निधन". Maharashtra Times. 2020-08-08 रोजी पाहिले.
  2. ^ Shivajirao Nilangekar Patil History