सदस्य:सुबोध कुलकर्णी/नमुना लेख
महाराष्ट्राची संस्कृती
[संपादन]संत परंपरा
[संपादन]चारशे वर्षांची संत परंपरा या राज्याला लाभली आहे. त्यांत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, रामदास, चोखामेळा, जनाबाई, कान्होपात्रा इ. चा समावेश होतो.[१]
वृत्तपत्रे
[संपादन]राज्यात एकूण ३७१५ वृत्तपत्रे आहेत. त्यांत राज्यस्तरीय, जिल्हा , तालुका तसेच गाव पातळीवरील असे प्रकार आहेत. पहिले वृत्तपत्र 'दर्पण'बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३९ मध्ये प्रकाशित केले. ते इंग्रजी व मराठीत होते.
ध्यान पद्धती
[संपादन]विपश्यना, कुंडलिनी, नाम इ. पद्धती आचरल्या जातात.
पोशाख
[संपादन]साधारणतः धोतर, फेटा, अंगरखा, नऊवारी/पाचवारी साडी, झब्बा-पायजमा असे पोशाख आढळून येतात. वेगवेगळ्या समाज गटांमध्ये व्यवसायानुसार विविध पोशाख वापरले जातात. उदा. कोळी समाजाचा पेहराव, लमाण व्यक्तीचा पेहराव.
मंदिरे
[संपादन]महाराष्ट्रात पर्यटकांच्या पसंतीची अनेक मंदिरे आहेत. मुंबई येथील सिद्धिविनायक देवस्थान प्रसिद्ध आहेत. तसेच शिर्डीचे साईबाबा, कोल्हापूरचे महालक्ष्मी, भीमाशंकर, अष्टविनायक, तुळजाभवानी,सप्तशृंगी अशी असंख्य मंदिरे आहेत.
गुहा
[संपादन]अजिंठा लेणी : अजिंठा लेणी या अजिंठा, भारतात 29 बौद्ध लेणी मंदिरे, 2 रे शतक इ.स.पू. पासून जे तारीख काही मालिका आहेत. दोन्ही थेरवडा आणि महायान बौद्ध परंपरा समावेश एलिफंटा गुंफा : एलिफंटा गुंफा , तालुका उरण, जिल्हा रायगड बेट टेकड्या वर स्थित आहे 11 किलोमीटर अपोलो बंदर , मुंबई उत्तर-पूर्व आणि अंदाजे घेर 7 कि.मी. क्षेत्र पांघरूण मुख्य भूप्रदेश शोर पासून 7 किमी . बेट लोकप्रिय ' घारापुरी ' म्हणून ओळखले जाते जे बेट , आढळले एक प्रचंड हत्ती नामकरण झालेले आहे. [२]
खाद्यपदार्थ
[संपादन]महाराष्ट्रात कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा इत्यादि भागांप्रमाणे वेगळ्या पाकशैली आणि वेगवेगळे पदार्थ पहायला मिळतात. प्रत्येक भागात वापरले जाणारे विशिष्ट जिन्नस, तिखट-गोड चवींबद्दलची आवड निवड यातील बदल याचा त्या भागातील पाककलेवर परिणाम झालेला आहे.काही वैशिष्ठ्यपूर्ण पदार्थ - मोदक, पुरण पोळी,बुंदीचे लाडू, कांदेपोहे, झुणका भाकर इ.