Jump to content

कांदे पोहे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कांदेपोहे या पानावरून पुनर्निर्देशित)
कांदे पोहे
कांदे पोहे
प्रकार नाश्ता
उगम भारत
प्रदेश किंवा राज्य महाराष्ट्र
द्वारे निर्मित अज्ञात
शोध लावला अज्ञात
अन्न बनवायला लागणारा वेळ 10 मिनिटे ते 15 मिनिटे
अन्न वाढण्याचे तापमान गरम गरम
मुख्य घटक पोहे, शेंगदाणे, कांदे हिरवी मिरची,
सामान्यतः वापरले जाणारे साहित्य तेल, चटणी, मीठ, हळद
भिन्नता सामान्य
अन्नाद्वारे प्राप्त ऊर्जा
(प्रती 1 प्लेट द्वारे)
180 किलो कॅलरी (754 किलो जुल)tarladalal
पौष्टिक मूल्य
(प्रती 1 प्लेट द्वारे)
प्रथिने 2 ग्रॅम
स्निग्धांश 7.9 ग्रॅम
कर्बोदके 25 ग्रॅम
तत्सम पदार्थ बटाटे पोहे

कांदे पोहे, बटाटेपोहे हा मराठी खाद्यपदार्थ आहे.

साहित्य :

  1. जाड पोहे
  2. चिरलेले कांद्याचे काप
  3. चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  4. हळद
  5. मोहरी/जिरे
  6. तेल (गोडेतेल)
  7. मीठ
  8. शेंगदाणे

पूर्व तयारी : पोहे क‍रण्या अगोद‍र पोहयांचे दोन प्रकार असतात हे जाणून घेणे आवश्यक आहे. १} जाड पोहे २} पातळ पोहे

पोहे निवडून व पाण्याने भिजवून रोळी मध्ये काढून घ्यावे म्हणजे पाणी निथळून जाईल. जाड पोहे भिजवण्यासाठी पाण्याचा हबका{प्रमाण}जास्त मारावा लागतो. आणि पातळ पोहे भिजवण्यासाठी पाण्याचा हबका{प्रमाण}कमी मारावा लागतो.

कढई मध्ये तेल टाकुन त्यात मोहरी/जिरे टाकावे. तडतडल्यानंतर त्यात चिरलेले कांद्याचे काप टाका व नंतर थोड्यावेळाने त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाका. मिरच्या थोड्या पांढुरक्या झाल्यावर नंतर हळद व भिजवलेले पोहे टाका. हळदीचा समान रंग येईपर्यंत परता.

सजावट : खायला देताना कोथिंबिर व खोबऱ्याचा कीस टाकुन द्यावे. आणि त्यावर मिरचीचे बारीक काप टाकुन घ्या.

इतर माहिती

[संपादन]
  1. कांद्याचे प्रमाण थोडे कमी करून त्यात उकडलेले/कापा करून थोडे तळलेले बटाटे घातल्यास हे आलूपोहे होतात.
  2. पोहे तयार करताना तुमच्या आवडीनुसार त्यात शेंगदाणे, बटाटा किंवा हिरवा वाटणे ही घालू शकता. कांद्याबरोबर या गोष्टी परतून घ्या.

संदर्भ

[संपादन]