Jump to content

कुवेत एरवेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुवेत एरवेझ
आय.ए.टी.ए.
KU
आय.सी.ए.ओ.
KAC
कॉलसाईन
KUWAITI
स्थापना १९५३
हब कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ (कुवेत शहर)
फ्रिक्वेंट फ्लायर ओॲसिस क्लब
विमान संख्या २३
गंतव्यस्थाने ३४
ब्रीदवाक्य Earning Your Trust
पालक कंपनी कुवेत सरकार
मुख्यालय कुवेत
मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेले कुवेत एरवेझचे एरबस ए३१० विमान

कुवेत एरवेझ (अरबी: الخطوط الجوية الكويتية) ही मध्य पूर्वेतील कुवेत ह्या देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इ.स. १९५३ साली स्थापन झालेली कुवेत एरवेझ कुवेत शहराजवळील कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जगातील ३४ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते.

मध्य पूर्वेतील अतिशय वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असणारा कुवेत हा दुसरा देश आहे. या देशाची एरलाइन अतिशय आधुनिक आणि संपत्तिवान आहे. कुवेत एरवेझने विमान वाहतूक सेवेतील गुणवत्ता ग्राहकासांठी उच्चतम कशी ठेवता येईल आणि जागतिक पातळीवर आपली विमानसेवा[] नवलाईची कशी होईल याकडे लक्ष केन्द्रित केले आहे.

इतिहास

[संपादन]

सन १९५४मध्ये कुवेत एरवेझने आबादान, बैरुत, दमास्कस, आणि जेरूसलेम या कांही मर्यादित उड्डाण विमान वाहतूक सेवा सुरू केल्या. कुवेत सरकार[] या कंपनीची काळजी घेत होते आणि राष्ट्रीय वाहतूक सेवा जगातील विमान मार्गावर वेगाने विकसित करण्यासाठी धडपडत होते. या उद्योगात ५० वर्षे पूर्ण करून या विमान कंपनीने उच्च बहुमान आणि कीर्ती प्राप्त केली आहे. सन २००४मध्ये या विमान कंपनीने ”Best AIR Line For Air Safety” ॲवॉर्ड मिळविलेला आहे.

संयोग आणि विमान संच वृत्तान्त

[संपादन]

जगातील ५० ठिकाणी या विमान कंपनीचे ऑनलाईन आरक्षण होऊ शकते. यांचेकडे एरबस A320-200,A310-308,A300-600,A340-313 आणि बोइंग B777-269 ही आधुनिक हवाईयाने आहेत.

सेवा आणि प्रवाशी सामान सवलत

[संपादन]

या एरलाइन[]ने अपवाद म्हणून पृथ्वीतलावर ग्राहकांना उच्चतम समाधान देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. प्रवाशांचे ऑनलाईन चेक-इन तसेच सामानाची काळजीपूर्वक हाताळणी यांची माहिती ग्राहकापर्यंत पोहचविली जाते.

विमानातील सेवा

[संपादन]

विमानात खान पान, मदिरा, कांबळं, यांची सोय, सिनेमे पाहण्यासाठी आणि संगीत ऐकण्यासाठी हेडसेट, डोळ्यासाठी मास्क, यां सेवांचा प्रवासी आनंद घेऊ शकतात. प्रथम, व्यावसायिक, इकॉनॉमी वर्गात वर्गवारी प्रमाणे विविध मनोरंजन प्रकार निवडण्याची सोय आहे. आरामदायी आसने, लहानांसाठी खेळणी या सुविधाचा आनंद ही प्रवासी घेऊ शकतात.

प्रवा्सी सामान सवलत

[संपादन]

प्रत्येक वर्गाच्या प्रवाशांसाठी स्वतंत्र सामान सवलत व्यवस्था आहे. प्रवासी मर्यादेबाहेरील सामान जादा आकार देऊन घेऊन जाऊ शकतो. प्रवासी खालील प्रमाणे सामान बरोबर घेऊ शकतो.

प्रौढ सामानाचे वजन वर्ग
४० kg (८८ lb) प्रथम वर्ग प्रवासी
३० kg (६६ lb) व्यवसाय वर्ग प्रवाशी
२० kg (४४ lb) किफायती वर्ग प्रवाशी

दोन वर्षापेक्षा ज्यादा वय असणाऱ्या मुलासाठी प्रौढाप्रमाणेच व्यवस्था आहे.

तान्हे बाळं

[संपादन]

तान्हे बाळाला प्रौढाच्या भाड्याच्या १०% आकार पडतो. त्याला आसन मिळत नसल्याने त्याच्यासाठी एक दुमडणारी ट्रॉली, ढकलगाडी, किंवा वाहून नेण्याची टोपली किंवा प्रवासी केबिनमधील उपलब्ध जागेत ठेवता येईल आणि अशी ११५ सेंमी(४५”) पेक्षा जादा असणार नसणारी कार सीट नेण्याची परवानगी आहे. बाळाच्या सामानाचे १० किग्रॅ(२२.२ पाउंड) पर्यंतचे वजन मोफत आहे. मात्र ही मोफत सवलत ही ज्या प्रवाशांनी कुवेतमध्ये तिकीट घेतलेले आहे आणि ते कुवेत मधून जाण्या येण्याचा प्रवास करतात त्यांच्यासाठीच आहे. जे प्रवा्सी बाहेर देशी तिकीट घेतात, त्याच्यासाठी राष्ट्रीय विमान प्रवासाचे संबंधित नियमच लागू आहेत.

विना आकार सामान

[संपादन]

वरील सवलतीशिवाय प्रत्येक प्रवासी स्वतःबरोबर खालील प्रमाणे एक किवा दोन वस्तू विनाआकार नेऊ शकतो.

  1. एक ओव्हर कोट, पांघरूण किंवा कांबळे
  2. एक छत्री किंवा हातातील कांठी
  3. एक लहान कॅमेरा आणि एक द्विनेत्री (बायनॅक्युलर)
  4. बाळाला विमानात भरविण्यासाठी अन्न
  5. बाळाला वाहून नेण्यासाठी टोपली.
  6. पूर्ण दुमडणारी ट्रॉली किंवा ढकलगाडी
  7. एक पूर्ण दुमडणारी व्हील चेअर आणि किंवा कुबडी आणि गळा पॅड
  8. आवश्यक गोष्टी सामावू शकणारी लेडी पर्स, लेडी हॅंड बॅग
  9. लहानसा लॅपटॉप

प्रवासी बरोबरचे सामान त्याच्या आढ्याकडील कंपार्टमेंटमध्ये किंवा आसनाच्या खाली ठेवू शकतात. कोणत्याही वस्तूचा साधारण आकार २३ x ३६ x ५६ सेंमी (एकूण ११५ सेंमी) किंवा ९” x १४” x २२” (एकूण ४५”)पेक्षा जास्त असू नये. आणि कमाल वजन ७ किग्रॅ असावे. या वस्तू प्रवाशांनी स्वतःबरोबरच स्वतःच्या जबाबदारीवर ठेवावयाच्या आहेत.

फक्त कुवेत एरवेझच्या प्रवाशांसाठी कुवेत एरवेझच्या सामानाचे नियम लागू आहेत. इतरांसाठी त्या त्या एरलाईनचे नियम लागू आहेत.

मालकी

[संपादन]

कुवेत एरवेझची संपूर्ण मालकी डिसेंबर २०१३पासून कुवेत सरकारची झाली आहे.

खाजगीकरणासाठी नियोजन

[संपादन]

सन १९९०मध्ये गल्फ युद्धाचा भडका उडाला त्याकाळात या विमान कंपनीचे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले त्यामुळे खाजगीकरणाचा विचार सुरू झाला. सन २००४मध्ये ह्या विमान कंपनीचे संघटनेत रूपांतर झाले. २१ जुलै २००८ मध्ये खाजगीकरणाचा करार सरकारने मान्य केला. कराराप्रमाणे दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारासाठी ३५% शेअर्स व इतर पब्लिकसाठी ४०% शेअर ठेवून, उर्वरित २५% शेअर्स स्वतः सरकारने ठेवले. या व्यवस्थेचा जाझीरा एरवेझ सारख्या निवडक देशी स्पर्धकांनी संभाव्य शेअर्स मागणीदार या नात्याने अतिशय खोलवर विचार केला. या शिवाय सरकारने कामकाजाशी निगडित असणारे कर्मचारी पुढील ५ वर्षे कायम ठेवण्याचे वचन दिले आणि ज्यांना ठेवता आले नाही त्यां कर्मचाऱ्याना त्यांचे कोणतेही आर्थिक नुकसान न करता आणि कामगार करारातील अटी जशाच्या तशा ठेवून सरकारला हव्या असणाऱ्या विभागाकडे वर्ग होण्याची संधी दिली.

सन २०११मध्ये खाजगीकरण समितीने सिटी ग्रुप, अर्नेस्ट आणि यंग आणि सिबुरीचे मदतीने कुवेत एरवेझची किंमत ८०.५ कोटी अमेरिकन डॉलर ठरविली. मार्च २०११ पर्यंत हे कामकाज पूर्ण व्हावे ही अपेक्षा होती. तरी सुद्धा, त्या वर्षी ऑक्टोबरमध्ये खाजगीकरण समितीने सुचविले की खाजगीकरण करण्यापूर्वी एर कुवेतचे पुनर्व्यवस्थापन कार्य करावे. या सूचनेस कुवेतच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली आणि खाजगीकरण करारात तशी सुधारणा केली. सरकारने विशेषज्ञांशी चर्चा करून आंतरराष्ट्रीय एर ट्रान्सपोर्ट असोसिएशन बरोबर करारही केला. जानेवारी २०१३मध्ये कुवेत एरवेझ कॉर्पोरेशनने खाजगीकरण[] कायदा मंजूर केला.

मुख्य विश्वस्त

[संपादन]

डिसेंबर २०१३मध्ये राशा अब्दुलजीज अल-रौमी या अध्यक्षा[] झाल्या. त्यांचा कार्यकाळ जुलै २०१५ पर्यंत आहे.

मुख्य कार्यालय

[संपादन]

कुवेत एरवेझचे मुख्या कार्यालय कुवेत येथील Al फरवणीय गव्हर्नओरेट येथील कुवेत इंटरनॅशनल विमानतळावर आहे. ४२००० sq.mi (४,५०,००० sq.ft.) जागेवरील या कार्यालयाचा बांधकाम खर्च १.५८ कोटी कुवेत दिनार (५.३६ कोटी अमेरिकन डॉलर) झालेला होता. अहमदिया कॉन्ट्रॅक्टिंग आणि ट्रेडिंग कंपनी हे या बांधकामाचे मुख्य कॉन्ट्रॅक्टर होते. सन १९९२ ते १९९६ या काळात या मुख्य कार्यालयाचे बांधकाम झाले. या बांधकामात प्रथमच कुवेत देशात काचेच्या तावदानाचा वापर केला. पूर्वीचे कार्यालय हे कुवेत विमानतळावरच होते.

अंतिम ठिकाणे

[संपादन]

कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ या केंद्रांवरून आशिया, युरोप, उत्तर अमेरिका आणि मध्यपूर्वेतील देशांमधी यांच्या ३४ स्थळांपर्यंत कुवेत एरवेझची विमाने उड्डाणे करतात. (नोव्हेंबर २०१३ची स्थिती)

सहभाग करार

[संपादन]

कुवेत एरवेझचा खालील एरलाइन्सबरोबर कायदेशीर सहभाग करार आहे.

  1. एर इंडिया
  2. अलिटालिया
  3. इथियोपियन एरलाइन्स
  4. एतिहाद एरवेझ
  5. सौदिया
  6. तुर्की एरलाइन्स

घटना आणि अपघात

[संपादन]
  • सन १९८२मध्ये लेस ब्रॅडले एन्‌ हे वैमानिक असलेले बैरूत मार्गे त्रिपोली - कुवेत जाणारे विमान लुटारूंनी बैरूत येथे लुटले. या घटनेचा उल्लेख रॉबिन राईट यांच्या सेक्रेड रेगे या पुस्तकात आला आहे
  • १ डिसेंबर १९८४ रोजी दोन लेबानियन बंदूकधारी लुटारूंनी लंडन ते कराची असे जाणारे विमान ताब्यात घेतले आणि ते तेहरानकडे वळविले. विमानात त्यांनी गोळ्या झाडल्या. लुटारूंना ते विमान लेबनॉन येथे घेऊन जायचे होते. इंधनासाठी ते स्त्रिया आणि मुले यांची सुटका करण्याची चर्चा करीत होते. यासाठी ६ दिवस गेल्यावर शेवटी इराणी सुरक्षितता अधिकाऱ्यानी कर्मचारी गणवेश परिधान करून लुटारूंना नेस्तनाबूद केले.
  • ५ एप्रिल १९६८ रोजी कुवेत एरवेझची फ्लाइट क्रमांक ४२२ (बँकॉक ते कुवेत)चे विमान लुटले. त्यात एकूण१११ प्रवासी आणि कर्मचारी होते. त्यात कुवेत्च्या राजघराण्यातील तीन, लेबनॉनचे ६-७, प्रवासी होते. ज्या मुस्लिम गुरीलांना कुवेतमध्ये ठेवलेले आहे त्यांची सुटका करण्याची मागणी लुटारूंनी केली. या विमानाचा सर्वात जास्त म्हणजे १६ दिवसांचा ताबा लुटारूंकडे होता. कुवेतचे दोन प्रवासी, लुटारूंनी ठार केले, १७ बंदिस्त केले व बाकीच्यांना जाण्याची अनुमति दिली.
  • सन १९९०मध्ये कुवेतवर इराकने हल्ला केला, तेव्हा त्यांनी कुवेतची १० विमाने चोरली आणि बगदाद विमानतळावर ठेवली. तेथून ती इराकमध्ये मोसूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर ठेवली. हवाई हल्ल्याच्या भीतीने सद्दाम हुसेनने ही विमाने इराणला पाठविली. इराणने या १० विमानापैकी ४ नष्ट केली आणि बाकीची ६ कुवेतला परत दिली.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "कुवैत एरवेझ 25 नवीन एरबस विमाने खरेदी करणार आणि 12 अधिक भाडेतत्वावर देणार". १४ ऑक्टोबर २०१५ रोजी पाहिले.
  2. ^ "कुवैत एरवेझ खाजगीकरण अंतिम मंजूरी प्राप्त". १४ ऑक्टोबर २०१५ रोजी पाहिले.
  3. ^ "कुवैत एरवेझ सेवा". 2015-10-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  4. ^ "नवीन हवाई परिवहन खाजगीकरण कायद्यासाठी कुवेतच्या कॅबिनेटचा पाठिंबा". १४ ऑक्टोबर २०१५ रोजी पाहिले.
  5. ^ "कुवेत एरलाइन्स अध्यक्ष". १४ ऑक्टोबर २०१५ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: