तुर्की एरलाइन्स
| ||||
स्थापना | २० मे १९३३ | |||
---|---|---|---|---|
हब | इस्तंबूल अतातुर्क विमानतळ | |||
मुख्य शहरे | इझ्मिर, अंकारा | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | माइल्स अँड स्माईल | |||
अलायन्स | स्टार अलायन्स | |||
विमान संख्या | २६७ | |||
ब्रीदवाक्य | Widen Your World | |||
मुख्यालय | इस्तंबूल, तुर्कस्तान | |||
संकेतस्थळ | http://www.turkishairlines.com/ |

तुर्की एरलाइन्स (तुर्की: Türk Hava Yolları) ही तुर्कस्तान देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९३३ साली स्थापन झालेली तुर्की एरलाइन्स तुर्कस्तानमधील ४१ व जगातील २०६ शहरांना विमानसेवा पुरवते. ह्या बाबतीत तुर्की एरलाइन्सचा जगामध्ये चौथा क्रमांक लागतो. तुर्की एरलाइन्स १ एप्रिल २००८ पासून स्टार अलायन्सचा सदस्य आहे. यांचे प्रधान कार्यालय इस्तंबूल येथील येसिल्कोय मधील अटतुर्क विमानतळावरील तुर्की एरलाइन जनरल मॅनेजमेंट बिल्डिंग मध्ये आहे.[१] याची मुख्य ठाणी इस्तंबूल विमानतळ, एसेंबोगा आंतरराष्ट्रीय विमानतळ, सबीहा गॉक्सेन आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहेत.[२]
इतिहास
[संपादन]सुरुवातीचा काळ
[संपादन]तुर्की एरलाइन्सची स्थापना २० मे, १९३३ रोजी देव्लेत हवा योल्लारी (तुर्की भाषेत तुर्की शासकीय एरलाइन्स) या नावाने झाली.[३] त्यावेळ ही कंपनी तुर्की संरक्षण मंत्रायलयाचा एक भाग होती.[४] त्यावेळी त्यांच्याकडे दोन ५ आसनी कर्टिस किंगबर्ड, दोन ४ आसनी जुंकर्स एफ १३ आणि एक १० आसनी तुपोलेव्ह एएनटी-९ अशी पाच विमाने होते.१९३५मध्ये तुर्की एरलाइन्सची मालकी तुर्कीच्या सार्वजनिक कामकाज खात्यात जनरल डिरेक्टोरेट ऑफ स्टेट एरलाइन्स असे उपखाते तयार करून हस्तांतरित झाली. १९३८मध्ये ही कंपनी तुर्कीच्या वाहतूक, समुद्री वाहतूक आणि दळणवळण मंत्रालयाचा भाग झाली.[५]
युद्धानंतरचा काळ
[संपादन]या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
सन 1947 मध्ये या विमान कंपनीची आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू झाली. त्यात अंकारा इस्तंबूल अथेन्स या ठिकाणांचा समावेश होता. निकोसिया,बैरूत,आणि कैरो या आंतरराष्ट्रीय विमान सेवेची त्यात भर पडली. सन1960 पर्यंत तुर्की राष्ट्रीय विमान सेवा मात्र पूर्वीचीच कायम राहिली.
सन 1956 मध्ये तुर्क सरकारने व्यवस्थापनात थोडाफार बदल करून या विमान सेवेचे नाव तुर्क हवा योल्लरी A.O.(टोपण नाव THY) असे केले. या कंपनीत TRL 60 मिल्लियन भाग भांडवल घातले. पुढील थोड्याच काळात ही कंपनी आंतरराष्ट्रीय एर ट्रान्सपोर्ट असोसिएशनला (IATA) जोडली. सन1957 मध्ये ब्रिटिश ओवर्सीस एर वेझ संघटनेला या कंपनीचे पुढील 20 वर्षासाठी 6.5% भाग प्राप्त झाल्यानंतर त्यांनी या विमान कंपनीला तांत्रिक सहकार्य केले.
ही विमान कंपनी आतापर्यंत म्हणजे सन 1960 पर्यंत सेवरल डगलस DC-3s, C-47s,विक्केर्स विस्कौंट्स, फोक्कर F27s, ही विमाने वापरत होती. या विमान कंपनीने सन 1967 मध्ये पहिल्यांदाच मॅकडोन्नल्ल डग्लस DC-9, मॅकडोन्नल्ल डग्लस DC-10, फोक्कर F28, ही जेट विमाने आपल्या संचात वापरण्यास सुरुवात केली. त्यात 1971 मध्ये तीन बोइंग 707 जेट विमानांची भर पडली.[६] सन 1970चे सुरुवातीचे काळात वापरात असणारी मॅकडोन्नल्ल डग्लस DC-10, फोक्कर F28, ही परत सन 1972 आणि 1973 मध्ये प्रवाशी सेवेत आणली.
ताफा
[संपादन]
मे २०२४ च्या सुमारासतुर्की एरलाइन्सकडे १३ प्रकारची[७] एकूण ४०७[८] विमाने सेवारत आहेत.[९]
कंपनी कामकाज
[संपादन]फेब्रुवारी २०२४मध्ये बिलाल एक्सी हे या विमान कंपनीचे मुख्याधिकारी आणि उप चेरमन आहेत तर अहमत बोलाट हे चेरमन आहेत.
गंतव्यस्थाने
[संपादन]
२०२४मध्ये तुर्की एरलाइन्सची विमाने १२९ देशांतील ३४० शहरांना विमानसेवा पुरवते. यांत तुर्कीमधील ५३ शहरांचा समावेश आहे.[१०][११][१२][१३]
कायदेशीर भागीदारी करार
[संपादन]या विमान कंपनीचे खालील विमान कंपनीशी भागीदारी करार आहेत
- अद्रिय एरवेझ
- एजियन एरलाइन्स
- एर अलजरी
- एर अस्ताना
- एर कॅनडा
- एर चायना
- एर युरोप
- एर इंडिया
- एर माल्ता
- एर न्यू झीलंड
- ऑल निप्पॉन एर वेझ
- असियांना एर लाइन्स
- अवियंका
- अवियंका ब्राझील
- आझरबैजन एरलाइन
- क्रोटीया एरलाइन
- ईजिप्त एर
- इथिओपियन एरलाइन
- ईतीहाड एर वेझ
- EVA एर
- गरुडा इंडोनेशिया
- हवाईयन एरलाइन
- इराण एर
- जेट ब्ल्यु
- LOT पॉलिश एरलाइन
- लक्स एर
- ओमान एर
- पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन
- फिलिपाईन एरलाइन
- रोयल एर मारको
- रोयल बृनेरी एरलाइन
- रोयल जोर्डनियन
- र्वंड एर
- स्कंडियांवियन एरलाइन
- सिंगापूर एरलाइन
- TAP पोर्तुगाल
- थाई एरवेझ
- युक्रेन आंतरराष्ट्रीय एरलाइन
- युनायटेड एरलाइन
- युतइर अवियशन
विमानांची दिखावट
[संपादन]तुर्की एरलाइन्सची विमाने पांढऱ्या रंगाची असून त्यांवर निळ्या इंग्लिश अक्षरात टर्किश एरलाइन्स असे लिहिलेले असते. विमानांची शेपूट लाल रंगात असून त्यांवर कंपनीचे मानचिह्न असते.
विमानाची दुरुस्ती
[संपादन]तुर्की एरलाइन्सचे विमान देखभालीचे मुख्य केंद्र इस्तंबूल विमानतळावर आहे.
बाह्य दुवे
[संपादन]![]() |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
संदर्भ
[संपादन]- ^ "डिस्कॉव्हर तुर्की एरलाइन्स". 2016-09-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-16 रोजी पाहिले.
- ^ "अंकारा विल बिकम थर्ड तुर्की एरलाइन्स हब".
- ^ "DHY timetable October 15, 1955". www.timetableimages.com. 15 October 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 October 2019 रोजी पाहिले.
- ^ "Turkish Airlines – History". Turkishairlines.com. 17 February 1977. 21 May 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 May 2016 रोजी पाहिले.
- ^ "History of Turkish Airlines". Seatmaestro. 24 April 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 April 2015 रोजी पाहिले.
- ^ "कॉंनेक्टिव्हिटी ॲंड फ्लीट इन्फॉर्मशन ऑफ तुर्की एरलाइन्स". 2017-06-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-16 रोजी पाहिले.
- ^ Güntay Şimşek (11 October 2021). "THY uçak filosunu sadeleştiriyor". Habertürk. 27 October 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 January 2022 रोजी पाहिले.
- ^ "Hakkımızda". AnadoluJet (Turkish भाषेत). 4 April 2024 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Fleet". Turkish Airlines. 1 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 January 2023 रोजी पाहिले.
- ^ "Sayılarla Türk Hava Yolları". Turkish Airlines. 8 May 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 July 2022 रोजी पाहिले.
- ^ Feride Cem (20 June 2022). "THY'nin uçakları dünya semalarında! Yeni hatlar açacağız". Sabah. 29 July 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 July 2022 रोजी पाहिले.
- ^ https://www.travelandtourworld.com/news/article/turkish-airlines-wins-coveted-guinness-award-for-unparalleled-global-reach/
- ^ https://www.businesstraveller.de/mobil/turkish-airlines-schafft-es-ins-guinness-buch-der-rekorde/