मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन
Appearance
औरंगाबाद येथे सन्मित्र कॉलनीत मराठवाडा साहित्य परिषद नावाची संस्था आहे. कौतिकराव ठाले पाटील संस्थेचे अध्यक्ष आहेत. अनेक साहित्यिक उपक्रमांबरोबरच ही संस्था साहित्य संमेलने, मराठवाडा लेखिका साहित्य संमेलने व ग्रामीण साहित्य संमेलनेही भरवते. संस्थेचे स्वतःचे पुस्तक प्रकाशन आहे. संस्थेच्या मराठवाड्यात अनेक शाखा आहेत. नांदेडचे शाखाध्यक्ष प्रा. डॉ. जगदीश कदम (जून २०१२) आहेत.
मराठवाडा साहित्य परिषदेने भरवलेली मराठवाडा लेखिका साहित्य संमेलने :
- १ले, २८-२९ नोव्हेंबर २००९ या काळात औरंगाबादला झाले. अनुराधा वैद्य त्याच्या अध्यक्षा होत्या.
- २रे, २-३ एप्रिल २०११ या दिवसांत परभणीला झाले लेखिका आणि कवयित्री रेखा बैजल या संमेलनाध्यक्षा होत्या.
- ३रे, २५-२६ फेब्रुवारी २०१२ या तारखांना अंबाजोगाई येथे झाले. साहित्यसमीक्षक डॉ. लता मोहरीर संमेलनाध्यक्षा होत्या.
- ४थे मराठवाडा लेखिका संमेलन २ व ३ फेब्रुवारी २०१३ या दिवसांत बीड येथे झाले. ज्येष्ठ लेखिका मथू सावंत या संमेलनाध्यक्षपदी होत्या. संमेलनापूर्वी ३० जानेवारी रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत ’आजीबाईंच्या गोष्टी' हा कार्यक्रम आणि ३१ जानेवारी रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत लोकगीतांचा कार्यक्रम झाला.
- ५वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन सिंधफणानगरी (माजलगाव) येथे १-२ फेब्रुवारी २०१४ या काळात झाले संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. ललिता गादगे होत्या.
- ६वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन जालना येथे १७/१८ जानेवारी २०१५ या काळात झाले अध्यक्षस्थानी डॉ. छाया महाजन होत्या.
- ७वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे ६-७ फेब्रुवारी २०१६ या काळात होणार आहे, संमेलनाध्यक्षा डॉ. वृषाली किन्हाळकर होत्या.
- ८वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन बीड येथे २०-२१ जानेवारी २०१८ या कालावधीत झाले. संमेलनाध्यक्षा प्राचार्या डॉ. दीपा क्षीरसागर होत्या.
पहा : साहित्य संमेलने