सुएझ कालवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुएझ कालव्याचे उपग्रहावरुन टिपलेले चित्र

सुएझ कालवा इजिप्त देशातील एक कालवा आहे. भूमध्य समुद्रलाल समुद्राच्या उत्तरेकडील सुएझचे आखात ह्यांना जोडणारा हा कालवा १८६९ सालापासुन वापरात आहे. सुएझ कालव्यामुळे युरोपआशिया खंडांदरम्यान जलद सागरी वाहतुक शक्य होते. सुएझ कालवा सुरु होण्यापुर्वी युरोपातुन आशियाकडे जाणाऱ्या बोटींना आफ्रिका खंडाला वळसा घालुन जावे लागत असे.

सुएझ कालवा १९२ किमी लांब आहे व त्याची कमाल खोली ६६ फूट इतकी आहे. सुएझ कालवा प्राधिकरण या संस्थेकडे कालव्याची मालकी व देखभालीची जबाबदारी आहे. ही संस्था इजिप्त सरकारने १९५६ मध्ये स्थापन केली.


सुवेझ