वसुंधरा राजे शिंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वसुंधरा राजे शिंदे
वसुंधरा राजे शिंदे

मतदारसंघ झालरापटन
कार्यकाळ
८ डिसेंबर, इ.स. २००३ – ८ डिसेंबर, इ.स. २००८
राज्यपाल कैलाशपती मिश्रा
मदनलाल खुराना
टी. व्ही. राजेश्वर
प्रतिभा पाटील
अखलाकर रेहमान किडवई
एस्. के. सिंग
मागील अशोक गेहलोत
पुढील अशोक गेहलोत

जन्म ८ मार्च, इ.स. १९५३ (1953-03-08) (वय: ६०)
मुंबई, महाराष्ट्र,भारत
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पती हेमंत सिंग
धर्म हिंदू

वसुंधरा राजे शिंदे(राजस्थानी : वसुंधरा राजे सिंधिया) डिसेंबर २००३ ते डिसेंबर २००८ दरम्यान राजस्थानच्या मुख्यमंत्री होत्या. त्या राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत.

बालपण आणि शिक्षण [संपादन]

वसुंधरा राजेंचा जन्म ८ मार्च १९५३ रोजी मुंबईमध्ये झाला. विजयाराजे शिंदे आणि ग्वाल्हेरचे महाराजा जिवाजीराव शिंदे यांच्या कन्या आहेत. ग्वाल्हेरच्या मराठा राजघराण्याच्या त्या वारसदार आहेत. त्यांचे शालेय शिक्षण प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट, कोडाईकॅनल,तामिळनाडू येथे झाले. मुंबईच्या सोफिया कॉलेजमधून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात पदवी शिक्षण घेतले.

राजकिय कारकिर्द [संपादन]

१९८२ मध्ये वसुंधरा राजेंचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. त्यांच्या राजकारणातील सहभागात त्यांची माता विजयाराजे सिंधिया यांची निर्णायक भूमिका होती. भारतीय जनता पक्षात अनेक संघटनात्मक पदे सांभाळल्यानंतर १९८५ मध्ये त्या राजस्थानच्या विधानसभेवर निवडून गेल्या. १९८९ पासून सलग चार वेळा झालावाड, राजस्थान मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेल्या.

वैयक्तिक आयुष्य [संपादन]

पूर्व राजस्थानमधील ढोलपूरच्या राजघराण्यातील हेमंत सिंग यांच्यासोबत १७ नोव्हेंबर १९७२ रोजी त्यांचा विवाह झाला. विवाहपश्चात एका वर्षातच त्या विभक्त झाल्या.आपल्या निवडणुक प्रचारादरम्यान अनेकदा ढोलपूरच्या जाट राजघराण्यासोबत असलेल्या संबंधांचा त्यांनी उल्लेख केला आहे. मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या लोकसभेच्या झालावाड मतदारसंघातून त्यांचे पुत्र दुष्यंत सिंग निवडून आले.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.