रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रिपब्लिकन पक्ष हा अमेरिकेतील दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षांपैकी एक पक्ष आहे (दुसरा महत्त्वाचा पक्ष: डेमोक्रॅटिक पक्ष). हा पक्ष ग्रँड ओल्ड पार्टी किंवा जी.ओ.पी. ह्या नावाने देखील ओळखला जातो. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश हे रिपब्लिकन पक्षाचे सदस्य आहेत. आपल्या आर्थिक व सामाजिक भुमिकांमुळे रिपब्लिकन पक्ष अमेरिकन राजकारणात उजवीकडे झुकणारा पक्ष मानला जातो.