अमेरिकेच्या प्रतिनिधींचे सभागृह
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अमेरिकेच्या प्रतिनिधींचे सभागृह (इंग्लिश: United States House of Representatives) हे अमेरिकन काँग्रेसच्या दोन सभागृहांपैकी एक आहे (अमेरिकेची सेनेट हे दुसरे सभागृह). अमेरिकेच्या सर्व राज्यांतील एकुण ४३५ प्रतिनिधी ह्या सभागृहसाठी निवडले जातात. प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येप्रमाणे त्या राज्यामधील प्रतिनिधींची संख्या ठरवली गेली आहे. कॅलिफोर्निया ह्या अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्येच्या राज्यामधून ५३ सदस्य तर कमी लोकसंख्या असलेल्या काही राज्यांमधून प्रत्येकी १ सदस्य निवडले जातात.
प्रतिनिधींचा कार्यकाळ २ वर्षे असतो. दर दोन वर्षांनी होणार्या निवडणुकांमध्ये नवीन प्रतिनिधी निवडले जातात. नोव्हेंबर, इ.स. २०१० मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाने २४० जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. ह्या पक्षाचे जॉन बेनर हे सभागृहाचे नवे सभापती असतील.
बाह्य दुवे[संपादन]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |