मोन्तेविदेओ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोन्तेविदेओ
Montevideo
उरुग्वे देशाची राजधानी
Flag of Uruguay.svg
ध्वज
Montevideo Department Coa.png
चिन्ह
Uruguay - Montevideo.png
मोन्तेविदेओचे उरुग्वेमधील स्थान

गुणक: 34°53′01″S 56°10′55″W / -34.88361, -56.18194गुणक: 34°53′01″S 56°10′55″W / -34.88361, -56.18194

देश उरुग्वे ध्वज उरुग्वे
विभाग मोन्तेविदेओ
स्थापना वर्ष इ.स. १७२६
क्षेत्रफळ २०९ चौ. किमी (८१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १४१ फूट (४३ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १३,३६,८७८[१]
  - घनता २,५२३ /चौ. किमी (६,५३० /चौ. मैल)
  - महानगर १९,७३,३८०
प्रमाणवेळ यूटीसी - ३:००
www.montevideo.gub.uy


मोन्तेविदेओ (स्पॅनिश: Montevideo; इंग्लिश उच्चारः माँटेव्हिडीयो) ही उरुग्वे देशाची राजधानी, सर्वात मोठे शहर व प्रमुख बंदर आहे. हे शहर देशाच्या दक्षिण भागात अटलांटिक महासागराच्या किनार्‍यावर वसले आहे. २०१० साली मोन्तेविदेओ शहराची लोकसंख्या १३,३६,८७८ (उरुग्वेच्या ५० टक्के) तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १९,७३,३८० इतकी होती.

मोन्तेविदेओ दक्षिण अमेरिका खंडाच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण शहर मानले जाते. १९३० सालामधील पहिल्या फुटबॉल विश्वचषकाचे सर्व सामने मोन्तेविदेओमध्ये भरवण्यात आले होते. तसेच २६ डिसेंबर १९३३ रोजी अमेरिका (खंड)ातील १९ देशांनी मोन्तेविदेओ येथे लष्करी अनाक्रमणाचा करार केला होता. आजच्या घडीला मोन्तेविदेओ हे लॅटिन अमेरिकेतील एक मोठे सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. एका अहवालानुसार २००७ साली मोन्तेविदेओ हे लॅटिन अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट राहणीमान असलेले शहर होते.[२][३][४][५][६][७]

जुळी शहरे[संपादन]

मोन्तेविदेओचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.

संदर्भ[संपादन]

हे सुद्धा पाहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: