ला प्लाता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ला प्लाता
La Plata
आर्जेन्टिनामधील शहर


ध्वज
चिन्ह
ला प्लाता is located in आर्जेन्टिना
ला प्लाता
ला प्लाता
ला प्लाताचे आर्जेन्टिनामधील स्थान

गुणक: 34°55′16″S 57°57′16″W / 34.92111°S 57.95444°W / -34.92111; -57.95444

देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
प्रांत बुएनोस आइरेस प्रांत
स्थापना वर्ष इ.स. १८८२
क्षेत्रफळ २०३ चौ. किमी (७८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८५ फूट (२६ मी)
लोकसंख्या  
  - शहर ७,४०,३६९
  - घनता ३,६०० /चौ. किमी (९,३०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी−०३:००
http://www.laplata.gov.ar/


ला प्लाता (स्पॅनिश: La Plata) हे आर्जेन्टिना देशाच्या बुएनोस आइरेस प्रांताची राजधानी व प्रमुख शहर आहे. १व्या शतकाच्या अखेरीस बुएनोस आइरेस शहर बुएनोस आइरेस प्रांतापासून वेगळे करून त्याला स्वायत्त दर्जा दिला गेला. १९ नोव्हेंबर १८८२ रोजी बुएनोस आइरेस प्रांतासाठीला प्लाता नावाची नवी संयोजित राजधानी वसवण्यात आली.

ला प्लाता शहर राजधानी बुएनोस आइरेसच्या ५५ किमी आग्नेयेस रियो देला प्लाता नदीच्या दक्षिण काठावर वसले आहे. २०११ सालीला प्लाताची लोकसंख्या सुमारे ७.४ लाख होती.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: