इंडो-युरोपीय भाषा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
इंडो-युरोपीय हे जगातील एक प्रमुख भाषाकुळ आहे. युरोप, दक्षिण आशिया, इराण, अनातोलिया इत्यादी भूभागांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बव्हंशी प्रमुख भाषा ह्याच कुळातील आहेत.
आजच्या घडीला जगात ३ अब्ज इंडो-युरोपीय भाषिक लोक आहेत. जगातील २० प्रमुख भाषांपैकी स्पॅनिश, इंग्लिश, हिंदी, पोर्तुगीज, बांग्ला, रशियन, जर्मन, मराठी, फ्रेंच, इटालियन, पंजाबी व उर्दू ह्या १२ भाषा इंडो-युरोपीय कुळामधील आहेत.
वर्गीकरण [संपादन]
जगातील सर्व इंडो-युरोपीय भाषांचे साधारणपणे १० गटांमध्ये वर्गीकरण केले जाते.
- अनातोलियनः अनातोलिया भागात अतिप्राचीन काळापासून ते मध्य युगाच्या सुरूवातीपर्यंत बोलल्या जाणाऱ्या व आजच्या घडीला नष्ट झालेल्या भाषांचा एक समूह.
- हेलेनिकः प्राचीन व आजची ग्रीक भाषा व तिच्या इतर प्रकारांच्या भाषांचा समूह
- इंडो-इराणी
- इराणी
- हिंद-आर्य: भारतीय भाषा.
- दार्दी भाषा
- नुरिस्तानी
- इटालिकः लॅटिन व रोमान्स भाषा.
- सेल्टिक[१][२]
- जर्मेनिक
- आर्मेनियन
- तोचारियनः ग्रीसमधील लुप्त झालेल्या भाषांचा समूह
- बाल्टो-स्लाव्हिकः बाल्टिक भाषा (लात्व्हियन आणि लिथुएनियन) व स्लाव्हिक भाषांचा समूह
- आल्बेनियन[३][४]
संदर्भ [संपादन]
- ↑ Celtic from the West Chapter 9: Paradigm Shift? Interpreting Tartessian as Celtic.
- ↑ Tartessian 2: The Inscription of Mesas do Castelinho ro and the Verbal Complex. Preliminaries to Historical Phonology.
- ↑ Of the Albanian Language. William Martin Leake, London, 1814.
- ↑ The Thracian language.
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत