रोमान्स भाषासमूह
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
रोमान्श भाषा याच्याशी गल्लत करू नका.
रोमान्स हा इंडो-युरोपीय भाषा कुळामधील भाषांचा एक समूह आहे. ह्या गटामध्ये लॅटिन मधुन निर्माण झालेल्या सर्व भाषा मोडतात. खालील सहा जगातील प्रमुख रोमान्स भाषा आहेत. ह्या व्यतिरिक्त इतर २५ रोमान्स भाषा आज अस्तित्वात आहेत.
- स्पॅनिश - ४० कोटी भाषिक
- पोर्तुगीज - २० कोटी भाषिक
- फ्रेंच - १० कोटी भाषिक
- इटालियन - ७.५ कोटी भाषिक
- रोमेनियन - २.४ कोटी भाषिक
- कातालान - ६७ लाख भाषिक