हा लेख
अकोले तालुका विषयी आहे. अकोले शहराच्या माहितीसाठी पहा,
अकोले
अकोले तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई, भंडारदरा धरण, निलवंडे धरण आणि प्रवरा नदी हे येथील प्रमुख वैशिष्ट्य आहे.
प्रमुख आकर्षणे [संपादन]
रतनगड, मदनगड ,कुलंग ,आजोबागड, बितनगड, पाबरगड यासारखे किल्ले, व हरिश्चंद्रगड या तालुक्यात आहे. वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना असणारे फोफसंडी हे ठिकाण याच तालुक्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई अकोले तालुक्यात आहे.
अकोले शहराजवळ अगस्ती आश्रम नावाचे स्थळ आहे. या स्थळी रामाची अगस्तीशी भेट झाली, असे मानले जाते[ संदर्भ हवा ]. या तालुक्यातल्या रतनवाडी गावात अमृतेश्वर मंदिर नावाने ओळखले जाणारे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे मंदिर आहे.
प्रवरा नदीवर इ.स. १९१६ साली बांधण्यात आलेले भंडारदरा धरण अकोले तालुक्यात आहे. तसेच प्रवरेवरच बांधले जात असलेले ७.८ टीएमसी क्षमतेचे निळ्वंडे धरणही येथे आहे. १२५ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा उदंचन जलविद्युत प्रकल्प असलेले घाटघर धरणही अकोले तालुक्यात आहे.
रंधा धबधब्याशेजारी कोदणी प्रकल्प नावाचा एक जलविद्युत प्रकल्प आहे. या जलविद्युत प्रकल्पाची स्थापित क्षमता ३४ मेगावॅट आहे. हा प्रकल्प डॉडसन कंपनीला ३० वर्षाच्या भाडे पट्ट्यावर चालण्यासाठी देण्यात आला आहे[ संदर्भ हवा ].
अकोले तालुकातील रस्ते नकाशा
बाह्य दुवे [संपादन]
|
अकोले तालुका |
|
|
इतिहास
|
|
|
|
किल्ले
|
|
|
|
शिक्षणसंस्था
|
|
|
|
धरणे
|
|
|
|
तालुक्यातील गावे
|
|
|