विसापूर तलाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विसापूर तलाव हा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात आहे.

बांधकाम[संपादन]

हा तलाव हंगा नदीवर ब्रिटिशांनी १८९६ साली बांधकाम सुरू करण्यात आले व १९२७ या वर्षा पूर्ण झाला. त्याला ४०,४४,३३२ रुपये खर्च झाला. तो सर्वप्रथम १९२८ साली पाण्याने भरला. तलावाची उंची ८४ फुट असून त्याची क्षमता ११३.६ कोटी घनफूट आहे. कालव्याची लांबी १६ मैल आहे.

सिंचन क्षेत्र[संपादन]

विसापूर तलावातून पाणी पुरवठ्यासाठी बांधलेली ब्रिटिशकालीन टाकी

या तलावाचा फायदा श्रीगोंदे तालुक्यात निंबवी,पिंपळगाव पिसा, कोळगाव, बेलवंडी, घारगाव, पिसोर्डी बु, पारगाव, येळापणे, शिरसगाव, लोणीव्यंकनाथ या गावांना होतो. या तलावातील १३,१४३ एकर क्षेत्राला पाणी दिले जाते.

संदर्भ[संपादन]

http://ahmednagar.gov.in/gazetteer/agri_irrigation.html