कोपरगाव तालुका
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| कोपरगाव तालुका |
|
|---|---|
|
|
|
| राज्य | महाराष्ट्र, |
| जिल्हा | अहमदनगर |
| जिल्हा उप-विभाग | संगमनेर |
| मुख्यालय | कोपरगाव |
|
|
|
| क्षेत्रफळ | ७२५.१६ कि.मी.² |
| लोकसंख्या | २,७६,९३७ (२००१) |
| साक्षरता दर | ६४.०९ |
| लिंग गुणोत्तर | १.०७ ♂/♀ |
|
|
|
| प्रमुख शहरे/खेडी | कोळपेवाडी |
| तहसीलदार | शशिकांत गायकवाड |
| लोकसभा मतदारसंघ | शिर्डी |
| विधानसभा मतदारसंघ | कोपरगाव |
| आमदार | अशोक काळे |
| पर्जन्यमान | ४४०.२ मिमी |
|
|
|
| कार्यालयीन संकेतस्थळ | |
कोपरगाव तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. त्याचे मुख्यालय कोपरगाव शहर हे आहे. कोपरगाव हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ११५ कि.मी.वर वसलेले आहे. कोपरगावपासूनचे शिर्डीचे अंतर फक्त १५ कि.मी. आहे. कोपरगावचे मुंबईपासून अंतर साधारणपणे २९६ कि.मी. आहे. शिर्डी हे सध्या रेल्वेने जोडलेले आहे पण शिर्डीला रेल्वेने येण्यासाठी कोपरगाव (१५ कि.मी.) येथे उतरावे. मनमाड (८३ कि.मी.) हे रेल्वेस्थानक कोपरगावपेक्षा जास्त सोईस्कर आहे. तालुक्यातले शिर्डी हे गाव साईबाबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. शिर्डी ही प्रसिद्ध संत साईबाबा यांची कर्मभूमी आहे. येथेच साईबाबांची समाधीपण आहे.
कोपरगावात फार वर्षांपासून मकरसंक्रांतीला पतंग उडवले जातात. आदल्या रात्रीपासून लहान मुलांपासून मोठी माणसे तयारीला लागतात. आदल्या रात्री मांजा तयार केला जातो.
कोपरगावापासून ५ कि.मी. अंतरावर राक्षसांचे गुरू शुक्राचार्य यांचे मंदिर आहे.
वाहतूक :
राज्याच्या प्रमुख शहरांत जाण्यासाठी कोपरगावहून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस उपलब्ध असतात.
[संपादन] संदर्भ
|
|||||||||||||||||||||||||