संगमनेर तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
हा लेख संगमनेर तालुका विषयी आहे. संगमनेर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
संगमनेर तालुका
संगमनेर is located in अहमदनगर
संगमनेर
संगमनेर तालुक्याचे अहमदनगर जिल्ह्याच्या नकाशावरील स्थान

१९.५७°उ.अ. ७४.२२°पू.रे.
राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा अहमदनगर
जिल्हा उप-विभाग संगमनेर
मुख्यालय संगमनेर

क्षेत्रफळ १७०५ कि.मी.²
लोकसंख्या ४३९८०६ (२००१)
शहरी लोकसंख्या ६१,९५८
साक्षरता दर ६५.२१
लिंग गुणोत्तर ९४६ स्री /

प्रमुख शहरे/खेडी साकुर घारगाव आश्वी निमोण धांदरफळ
तहसीलदार शरद घोरपडे
लोकसभा मतदारसंघ शिर्डी
विधानसभा मतदारसंघ संगमनेर
आमदार श्री बाळासाहेब उर्फ़ विजय भाऊसाहेब थोरात
पर्जन्यमान ४१६.६ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ


संगमनेर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. संगमनेर हे शहर प्रवरा नदीकाठी वसले आहे. या शहराजवळून नाशिक-पुणे महामार्ग जातो. 'संगमनेर महाविद्यालय' हे येथील मुख्य महाविद्यालय आहे. तसेच 'सह्याद्री महाविद्यालय' अणि 'सराफ महाविद्यालय' ही इतर प्रमुख महाविद्यालये आहेत. येथे एक दंतवैद्यकीय महाविद्यालय, दोन होमियोपॅथिक वैद्यकीय महाविद्यालये, दोन आयुर्वेदिक महाविद्यालये, दोन अभियांत्रिकी महाविद्यालये व दोन औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये आहेत.हे शहर विकसनशील शहर म्हणून ओळखले जाते

जोर्वे येथे पुरातन काळातील संस्कृतीचे सापडलेले अवशेष इसवी सनपूर्व १५०० या काळाचे आहेत. येथील राजापूर गावात गोळीबारात ठार झालेल्या शेतकर्‍यांचे एक स्मारक आहे.

तालुक्यातील गावे[संपादन]

पेमगिरी, जोर्वे , धांदरफळ खुर्द, खांडगाव, वडगावपान, वडगाव लांडगा, जवळेकडलग, चंदनापुरी, राजापूर, पोखरी बाळेश्वर

पेमगिरी गावात एक १.५ हेक्टर क्षेत्र व्यापलेले एक प्राचीन प्रसिद्ध वडाचे झाड आहे....

अकलापूर या गावात एकमुखी दत्ताचे देऊळ आहे. ही पुरातन मूर्ती एका टेकडीवर खोदकाम करताना सापडली. दर गुरुवारी सकाळी ८.३० वाजता येथे महाआरती होते.

संदर्भ[संपादन]

हेही पहा[संपादन]