"दयानंद सरस्वती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
रचना
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Dayananda Saraswati.jpg|इवलेसे|स्वामी दयानंद सरस्वती]]
[[चित्र:Dayananda Saraswati.jpg|इवलेसे|स्वा जन्मसिद्ध मी दयानंद सरस्वती]]
{{कॉमन्स|File:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf}}
{{कॉमन्स|File:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf}}
'''स्वामी दयानंद सरस्वती''' (जन्म : मोरबी, १२ फेब्रुवारी १८२४; मृत्यू : [[मुंबई]], ३० ऑक्टोबर १८८३) हे भारतीय समाजसुधारक व [[आर्य समाज]]ाचे संस्थापक होते. आक्रमक व निर्भय धर्मसुधारक, कुशल संघटक आणि हिंदी भाषेचे राष्ट्रीय स्वरूप ओळखणारे महर्षी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे [[सत्यार्थ प्रकाश]] हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
'''स्वामी दयानंद सरस्वती''' (जन्म : मोरबी, १२ फेब्रुवारी १८२४; मृत्यू : [[मुंबई]], ३० ऑक्टोबर १८८३) हे भारतीय समाजसुधारक व [[आर्य समाज]]ाचे संस्थापक होते. आक्रमक व निर्भय धर्मसुधारक, कुशल संघटक आणि हिंदी भाषेचे राष्ट्रीय स्वरूप ओळखणारे महर्षी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे [[सत्यार्थ प्रकाश]] हे पुस्तक प्रसिद्ध आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी वरील ग्रंथामध्ये आर्य समाजाच्या तत्त्व विचारांची मांडणी केलेली आहे स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे व तो आम्ही मिळवणारच असे प्रतिपादन करणारे पहिले धर्मसुधारक म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती हे होत


== कौटुंबिक माहिती ==
== कौटुंबिक माहिती ==

११:०७, १९ मे २०२० ची आवृत्ती

स्वा जन्मसिद्ध मी दयानंद सरस्वती
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

स्वामी दयानंद सरस्वती (जन्म : मोरबी, १२ फेब्रुवारी १८२४; मृत्यू : मुंबई, ३० ऑक्टोबर १८८३) हे भारतीय समाजसुधारक व आर्य समाजाचे संस्थापक होते. आक्रमक व निर्भय धर्मसुधारक, कुशल संघटक आणि हिंदी भाषेचे राष्ट्रीय स्वरूप ओळखणारे महर्षी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक प्रसिद्ध आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी वरील ग्रंथामध्ये आर्य समाजाच्या तत्त्व विचारांची मांडणी केलेली आहे स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे व तो आम्ही मिळवणारच असे प्रतिपादन करणारे पहिले धर्मसुधारक म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती हे होत

कौटुंबिक माहिती

महर्षी दयानंद सरस्वतींचा जन्म सौराष्ट्रातील मोरबी संस्थानात अंबाशंकर नावाच्या औदिच्य ब्राह्मणाच्या पोटी झाला. त्यांचे मूळ नाव मूळशंकर अंबाशंकर तिवारी होते. संन्यास घेतल्यावर त्यांनी दयानंद सरस्वती असे नाव धारण केले.

ग्रांथिक कार्य

वैदिक धर्माचा प्रचार करण्यासाठी दयानंदांनी १० एप्रिल १८७५ रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. वेदांतील तत्त्वज्ञानाचे यथार्थ ज्ञान व्हावे म्हणून यांनी "सत्यार्थ प्रकाश" नावाचा ग्रंथ संस्कृतहिंदी भाषेत लिहिला. सत्यार्थ प्रकाश ग्रंथात वैदिक धर्माचे यथार्थ स्वरूप प्रतिपादन करताना इतर पंथमतांचे खंडनही त्यांना करावे लागले. या प्रचारात्मक ग्रंथानंतर वेदाचा अर्थ समजण्याकरिता यांनी "वेदभाष्य" लिहिण्यास सुरुवात केली पण तो ग्रंथ अपुराच राहिला. यानंतर "संस्कारविधी" हा ग्रंथ लिहून सोळा संस्कारांचे वर्णन व प्रयोग यांनी दिले. "पंचमहायज्ञविधी" या लहानशा ग्रंथात नित्य करावयाच्या यज्ञाचे यांनी विवेचन केले. "गोकरुणानिधी" या ग्रंथात यांच्या अंत:करणाचे प्रतिबिंब पहावयास मिळते.

आर्य समाजाचे कार्य

आर्य समाजाच्या तत्त्वांचा प्रचार ते प्रथम अहमदाबाद, बडोदे, पुणे, मुंबई या ठिकाणी गेले त्यानंतर दिल्ली येथे भरणाऱ्या दरबारासाठी गेले. तेथे सर्व धर्मांच्या प्रतिनिधींना बोलाविलेले होते व चर्चेसाठी पाच प्रश्न ठेवलेले होते. दयानंदांनी त्या प्रश्नांची यथायोग्य उत्तरे दिल्यामुळे उत्तर हिंदुस्थानात व विशेषत: पंजाबात त्यांच्या मताचा चांगलाच बोलबाला झाला. शैक्षणिक संस्था, गुरुकुले व अनाथालये निघून होमहवनादी वैदिक पद्धतीचे कार्यक्रम तिकडे होऊ लागले.[१]

महर्षी दयानंद यांनी लिहिलेली पुस्तके

  • गोकरुणानिधी
  • पंचमहायज्ञविधी
  • वेदभाष्य (अपूर्ण)
  • सत्यार्थ प्रकाश
  • संस्कारविधी

दयानंदांची चरित्रे

  • दयानंद (अनंत ओगले)
  • दयानंद सरस्वती (प्रल्हाद कुळगेरी)
  • स्वामी दयानंद सरस्वती : व्यक्ती विचार आणि कर्तृत्व (डॉ. जनार्दन वाघमारे)
  • स्वामी दयानंद सरस्वती (मेघा अंबिके)

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ चित्राव सिद्धेश्वरशास्त्री,अर्वाचीन चरित्र कोश (१९४६)