चर्चा:दयानंद सरस्वती

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इतरत्र सापडलेला मजकूर योग्य ते बदल करुन या लेखात घालावा. -- अभय नातू (चर्चा) ०७:५९, १७ ऑक्टोबर २०१९ (IST)[reply]


भारतात मोठ्या प्रमाणावर धार्मिक व सामाजिक सुधारणा घडवून आणणाऱ्या आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. इ.स. १८२४ मध्ये गुजरातमधील मोर्वी संस्थानातील टंकारा या गावी एका सनातनी कुटुंबात दयानंदाचा जन्म झाला. त्यांचे पूर्वाश्रमिचे नाव ' मूळशंकर ' असे होते. त्यांचे वडील अंबाशंकर हे सनातनी विचाराचे व धार्मिक प्रवृत्तीचे होते. ' शिव ' हे या घराण्याचे दैवत होते . लहानपणापासूनच दयानंदावर धार्मिक संस्कार झाले होते. आपल्या वडिलांकडून त्यांना शिक्षणाचे प्रारंभीचे धडे घ्यावे लागले. वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत दयानंदानी धार्मिक शिक्षण व संस्कृत विषयामध्ये प्राविण्य मिळविले. दयानंदानी धर्मगुरू व्हावे , अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. चौदाव्या वर्षी स्वामी दयानंदाच्या आयुष्यात घडलेल्या एका प्रसंगाने त्यांच्या जीवनाला कलाटणी देण्याचे कार्य केले. या काळात काठेवाडमध्ये शिवआराधना व शिवकृपेसाठी महाशिवरात्रीचा उपवास व प्रार्थनेस विशेष महत्व होते. महाशिवरात्रीच्या दिवशी मूळशंकर आपल्या वडिलांबरोबर शिवाची पूजाप्रार्थना करीत असताना रात्रीच्या वेळी महादेवाच्या पिंडीवर एक उंदीर फिरत असल्याचे व तो उंदीर देवापुढे ठेवलेला प्रसाद खात असल्याचे त्यांना पहावयास मिळाले . हे दृश्य पाहून मूर्तीत काही सामर्थ्य नसते; त्यामुळे मूर्तीपूजेला काही अर्थ नाही , याची त्यांना जाणीव झाली . दयानंद एकोणीस वर्षाचे असतानाच त्यांची बहीण व चुलते मरण पावल्याने मुर्तीपुजेवरील त्यांचा उरलासुरला विश्वासही उडाला. घरात आपल्या लग्नाचा विचार चालला आहे, हे कळताच इ.स. १८४६ मध्ये सत्य , ज्ञान व धर्माचा शोध घेण्यासाठी ते घराबाहेर पडले. पूढील पंधरा वर्षे त्यांनी भारतातील निरनिराळ्या ठिकाणांना भेटी दिल्या व सत्य आणि अंतिम ज्ञान प्राप्त करून घेण्याचे प्रयत्न केले. अखेर मथुरा येथे पाणिनीच्या व्याकरणशास्त्रावरील थोर भाष्यकार व अंध पंडीत बिरजानंद यांचे त्यांनी शिष्यत्व स्वीकारले . आपल्या गुरूंच्या शिकवणुकीमुळे हिंदूधर्मत्त्वातील तारतम्यभावाचे त्यांना ज्ञान झाले . सरस्वती संप्रदायाकडून त्यांनी दीक्षा घेतली. व ते ' स्वामी दयानंद सरस्वती ' म्हणून ओळखले जाऊ लागले.