अनंत ओगले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अनंत शंकर ओगले हे एक मराठी लेखक आहेत. त्यांच्या पुस्तकांचे विषय हे बव्हंशी ऐतिहासिक आहेत. त्यांनी अनेक चरित्रे लिहिली आहेत.

अनंत ओगले यांची पुस्तके[संपादन]

 • अजात शत्रू (छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावरची चरित्र कहाणी)
 • अठ्ठेचाळीसचा अग्निप्रलय
 • अ‍ॅडॉल्फ हिटलर : एका झंझावाती गरुडाची कहाणी (कादंबरी)
 • अस्त गांधीयुगाचा आणि नंतर
 • आया मल्हार (मल्हारराव होळकर यांच्या जीवनावरची कादंबरी)
 • करुणासागर (जोतिबा फुले यांच्या जीवनावरची कादंबरी)
 • जळीत (महात्मा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या महाराष्ट्रातील जळिताच्या पार्श्र्वभूमीवरची कादंबरी)
 • तो एक राजहंस (बालगंधर्वांच्या जीवनावरील संगीत नाटक, सहलेखक - आकाश भडसावळे)
 • ध्रुवाचा तारा (डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरी)
 • दयानंद (स्वामी दयानंद सरस्वती यांचे चरित्र)
 • पहिला हिंदुहृदयसम्राट (सावरकरांचे व्यक्तिचित्रण)
 • फाळणी भारताची, कहाणी गांधी हत्येची
 • भाषाशिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर (आधीचे नाव वृत्तसुदर्शन)
 • वृत्तसुदर्शन (विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या जीवनावरील कादंबरी); भाषाशिवाजी या नावाने पुन:प्रकाशित
 • होय ! मी सावरकर बोलतोय (नाटक)