"मासिक पाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
धार्मिक भाग काढून टाकला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३९: ओळ ३९:
[[वर्ग:मानवी शरीर]]
[[वर्ग:मानवी शरीर]]
[[वर्ग:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र]]
[[वर्ग:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र]]
[[वर्ग:परंपरा]]

१८:५९, २७ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

मासिक पाळीचे चक्र व हार्मोन्सची भूमिका

स्त्री (मुलगी) वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी (Menstrual cycle/एमसी) असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरु होते. कधी कधी या अगोदरही सुरु होऊ शकते. दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादनही तयार केले जाते. योग्य काळात स्त्री व पुरुषाच्या वीर्यातील पुरूषबीज व स्त्रीच्या गर्भाशयातील स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ तयार होतो. पण ज्यावेळी हे स्त्रीबीज फलित होत नाही त्यावेळेस फलित न झालेल्या बिजासहित आच्छादन बाहेर टाकले जाते. ते रक्ताच्या स्वरुपात योनीमार्गाद्वारे बाहेर टाकले जाते म्हणून हा रक्तस्त्राव होतो.

मासिकपाळी चक्र व अवस्था

मासिक पाळी चक्र
मासिक पाळीतील हार्मोन्स नियंत्रण ओघतक्ता

प्रत्येक तरुण स्त्रीला दर २७ ते ३० दिवसांनी मासिक पाळी येते. हे चक्र वयाच्या बाराव्या वर्षी सामान्यत: सुरु होते आणि साधारण पन्नास वर्षे वयाला थांबते. आयुर्वेदानुसार या महत्वाच्या दिवसात स्त्रीने श्रमाची कामे करू नयेत, म्हणजे तिला या दिवसात शारीरिक दृष्ट्या ताणरहित वाटेल. मासिकपाळी संपल्यानंतर दोन आठवड्यांनी अथवा पुढची पाळी येण्याअगोदर दोन आठवडे स्त्रीचे बीजांड परिपक्व होऊन बीजपुंजापासून अलग होते.

कालावधी

वय वर्षे वीसच्या टप्प्यातील मुली आणि रजोनिवृतीपूपुर्व काळातील स्त्रिया त्यांच्या दृष्टीने ‘नियमित’ ही तुलनात्मक संज्ञा आहे. काही स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळी ही कधीच नियमित नसते. पहिल्या पाळीच्या अनुषंगाने पुढची पाळी कधी येईल याचा अंदाज वर्तविणे कधीकधी शक्य नसते. जास्त ताण पडणे, आजारपण, संतती नियमनांच्या गोळ्यांचा वापर अथवा त्यासाठी काही हार्मोन्सचा वापर अशा अनेक कारणांमुळे पाळी अनियमित येणे शक्य असते. संततिनियमनासाठी तथाकथित “तालबद्ध प्रक्रिया" (र्‍हिदम मेथड) ही एक असुरक्षित पद्धत समजली जाते.

शरीराचे नैसर्गिक ऋतुचक्र शरीरात महिन्याचे २८ दिवस सतत स्त्री- संप्रेरकांमध्ये (हार्मोन्स) काही बदल होत असतात. यालाच वैद्यकीय भाषेत फॉलिक्यूलर फेज, ल्यूटील फेज, मिडसायकल फेज असे म्हटले जाते. यातील फॉलिक्युलर टप्प्याचा काळ साधारणपणे १४ दिवसांचा असतो व नंतरचा ल्यूटील टप्प्याचा काळ १४ दिवसांचा असतो. या संपूर्ण काळात संप्रेरकांचा स्राव चालू असतो. २८ दिवसांच्या शेवटी हा स्राव बंद होतो व नैसर्गिकरीत्या बंद होणारा संप्रेरकांचा स्राव जर कृत्रिमरीत्या हॉर्मोन्सच्या गोळ्या घेऊन चालू ठेवला तर पाळी पुढे ढकलली जाते. म्हणजेच पाळीच्या अपेक्षित तारखेअगोदर सहा ते सात दिवस गोळ्या चालू केल्या जातात व जोपर्यंत पाळी नको आहे तोपर्यंत घेतल्या जातात. आपले ठरवलेले काम संपले म्हणजे मग या गोळ्या बंद करायच्या की लगेच पाळी सुरू होते. म्हणजेच आपल्या मेंदूतील पिच्युटरी ग्रंथींच्या संदेशाद्वारे होणारे संप्रेरकांचे नैसर्गिक चक्र बाहेरून कृत्रिम संप्रेरके घेऊन बिघडवायचे. हे अयोग्य आहे. पुढे ढकलायला किंवा लवकर आणायला पाळी म्हणजे काही एखादी पूर्व नियोजित भेट नाही की जी आपण आपल्या मनाप्रमाणे किंवा सोयीप्रमाणे बदलू शकतो.

पाळी पुढे करायची औषधे घेण्याचे परिणाम स्त्रिया आणि मुली यांना समजावून देणे आवश्यक आहे.

संतती नियमन

गरोदर रहाण्याची भीती न बाळगता समागम करण्याचा काळ अगोदर ठरविणे अथवा निश्चित करणे अयोग्य समजले जाते. बीजांड परिपक्व होऊन बीजपुंजापासून अलग होण्याच्या काळात केलेला समागम देखील धोकादायक ठरू शकतो कारण बीजांडाचे आयुष्य एकच दिवस असले तरी शुक्रजंतु जवळजवळ पाच दिवस कार्यरत राहतात. त्यामुळे या काळाच्या अलीकडील पाच दिवसात तर स्त्री समागम केला असेल तर स्त्री गरोदर राहू शकते. मासिकपाळीच्या काळात समागम केल्यास आपण गरोदर राहत नाही अशी एक चुकीची कल्पना स्त्रियांमध्ये आहे. जर स्त्रीची पाळी सात दिवसापर्यंत लांबली आणि शुक्रजंतू पाच दिवस राहिले किंवा मासिक पाळीचा काळ २८ दिवसांपासून कमी असेल तर स्त्री गरोदर होऊ शकते.[१]

नाटक

स्त्रियांच्या रजोनिवृत्ती या विषयावर प्रा. नितीनकुमार यांनी ’मेनोपॉज’ नावाचे नाटक लिहून दिग्दर्शित केले आहे. त्याचा पहिला प्रयोग पुण्यात २५-१-२०१८ रोजी झाला.

हेही पाहा

संदर्भ

बाह्यदुवे

  • मासिक पाळी
  • http://www.marathimati.net/masik-pali-ani-takrari/. Missing or empty |title= (सहाय्य)
  • मासिक पाळीबद्दल जगातील प्रमुख धर्म काय सांगतात
  • मासिक पाळी संदर्भातील १० गैरसमज