Jump to content

बोली साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बोली साहित्य संमेलन बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे एकावर्षी (कोणत्या?) झाले होते. मराठी कवी विठ्ठल वाघ हे संमेलनाध्यक्ष होते.

मराठी बोली साहित्य संघाच्या वतीने झालेल्या ६व्या बोली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वऱ्हाडी लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले होत्या. हे संमेलन इचलकरंजी येथे ३० मे २०१८ रोजी झाले. इचलकरंजी येथील शाहिरी व लोककला अकादमी या संस्थेने या संमेलनाचे आयोजन केले होते.

  • तावडीचे पहिले राज्यस्तरीय साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर येथे ३० डिसेंबर २०१८ रोजी भरले होते. ज्येष्ठ साहित्यिक गो.तु. पाटील संमेलनाध्यक्ष होते.

मालवणी बोली संमेलनाची सुरुवात १९९३ मध्ये दोडामार्ग-आडाळी येथे करण्यात आली. त्यानंतर चार संमेलने झाली. ४थ्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर होते.

  • मालवणी बोली व साहित्य संशोधन केंद्राचे ५वे मालवणी बोली साहित्य संमेलन कणकवलीत १३ मे २०१८ रोजी झाले. गंगाराम गवाणकर संमेलनाध्यक्ष होते.
  • ६वे मालवणी बोली साहित्य संमेलन २३ जून २०१९ रोजी मुंबईत झाले. मालवणी साहित्यिक, कादंबरीकार प्रभाकर भोगले हे संमेलनाध्यक्ष होते.

वऱ्हाडी बोली साहित्य संमेलन

[संपादन]
  • अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच व अमरावती विद्यापीठाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ३रे अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन अमरावतीमध्ये ४ जानेवारी २०२० रोजी झाले. अध्यक्षपदी ज्येष्ठ वऱ्हाडी साहित्यिक नरेंद्र इंगळे होते.

हे सुद्धा पहा

[संपादन]