ट्राजान
Appearance
ट्राजान | ||
---|---|---|
रोमन सम्राट | ||
मार्कस उल्पियस नर्व्हा ट्रैआनस तथा ट्राजान (सप्टेंबर १८, इ.स. ५३:इटालिका - ऑगस्ट ९, इ.स. ११७) हा तथाकथित पाच शहाण्या रोमन सम्राटांपैकी दुसरा होता.
त्याने इ.स. ९८ ते मृत्यूपर्यंत राज्य केले. त्याच्या राज्यकाळात रोमन साम्राज्याचा विस्तार आफ्रिका, युरोप व आशिया या खंडांत झाला. इ.स. १०१मध्ये त्याने दाशियाचे राज्य जिंकले व तद्नंतर सध्याचे जॉर्डन व सौदी अरेबियाचा काही भाग जिंकला. ट्राजानच्या र्काळात रोमन साम्राज्य इंग्लंड पासून इराक व फ्रान्सपासून लिबिया व इजिप्तपर्यंत पसरलेले होते.
इ.स. ११७मध्ये लढाईत असताना त्याचा जलोदराने मृत्यू झाला.