टायटस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
टायटस
रोमन सम्राट
Château de Versailles, galerie des glaces, buste d'empereur romain 03 (Titus).jpg

टायटस फ्लाव्हियस वेस्पाशियानस (रोमन लिपी: Titus Flavius Vespasianus ;) (डिसेंबर ३०, इ.स. ३९ - सप्टेंबर १३, इ.स. ८१) हा इ.स. ७९ पासून त्याच्या मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता.

रोमन सम्राट व्हेस्पासियन याचा पुत्र असलेला टायटसाने पित्याच्या राजवटीत पहिल्या ज्यू-रोमन युद्धात रोमन सैन्याचे सेनापतित्व सांभाळले. इ.स. ७० साली जेरूसलेम शहराचा पाडाव करण्याची निर्णायक कामगिरी त्याने बजावली. वेस्पाशियनाच्या मृत्यूनंतर टायटस राज्यारूढ झाला. अवघ्या दोन वर्षांच्या त्याच्या राजवटीत रोम येथील प्रसिद्ध कलोसियम बांधून पूर्ण झाले. इ.स. ७९ सालातील व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक व इ.स. ८० सालातील रोम शहरातील आगींच्या आपत्तींनंतर आपद्ग्रस्तांचे पुनर्वसन करण्याकडे त्याने लक्ष दिले.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: