Jump to content

घृष्णेश्वर मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(घृष्णेश्वर या पानावरून पुनर्निर्देशित)
घृष्णेश्वर मंदिर

घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे ११ कि.मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात.

मंदिराचे बांधकाम[संपादन]

वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून शिवाजी महाराज यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इ.स. १७३० मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला. मंदिराचे बांधकाम लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे.

राष्ट्रीय संरक्षित स्मारक[संपादन]

या मंदिराला २७ सप्टेंबर, इ.स. १९६० रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "नोटिफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्युमेन्ट्स इन इंडिया" (PDF) (इंग्रजी भाषेत). Archived from the original (PDF) on 2016-03-04. २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.