कासार
कासार हा एक भारत देशातील समाज आहे जो की प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात आहे. हा समाज श्री कालींका देवीला स्वतःची संरक्षण देवता मानतात. कासार म्हणजे तांबे पितळ या धातूंची भांडी तयार करून ती विकणार याला कासार म्हणतात.[१]
कासार | |
---|---|
सोमवंशीय क्षत्रिय कासार, त्वष्टा कासार, जैन कासार | |
कालिंका देवी, डिग्रस | |
ठिकाण | महाराष्ट्र, भारत |
वर्ण |
चंद्रवंशी क्षत्रिय त्वष्टा ब्राह्मण |
लोकसंख्या | २००००००[ संदर्भ हवा ] |
भाषा | मराठी |
धर्म | हिंदू |
आडनावे | कासार, सातपुते, तांबट,काटकर, रासने, अक्कर, मांगले,वडगांवकर,मुरुडकर,कारेकर, घडमोडे, गोऱ्हे, शेटे, पोफळे इत्यादी. |
उत्पत्ती
[संपादन]कासार या शब्दाची उत्पत्ती संस्कृत कांस्यकार म्हणजे धातूशी निगडीत व्यवहार करणारा तो कासार अशी आहे. ही धातू म्हणजे तांबे, पितळ वगैरे भांडी बनवणारे व विकणारे दोघेही कासार या संज्ञेस पात्र ठरतात. पूर्वी कांसेची भांडी व बांगडी तयार करणारा वर्ग होता. नंतर कांस्याची भांडी जाऊन तांबे पितळेची भांडी घडवणारा व विक्री करणारा वर्ग आला. कासार समाज हा संख्येने अल्प आहे.
उपजीविका
[संपादन]तांबे पितळेची भांडी तयार करणारा त्वष्टा कासार व त्या भांडयांचा व्यापार करनारा सोमवंशीय क्षत्रिय कासार समाज. त्वष्टा कासार स्वताला त्वष्टा ब्राह्मण म्हणतात.सध्याची पिढी उच्चशिक्षीत आहे.
वर्ण
[संपादन]कासार हे सोमव्ंशीय क्षत्रिय म्हणजे चंद्रवंशी क्षत्रिय आहेत. समाजाची ऊत्पत्ती सप्तर्षी पैकी अत्रि ऋषी पासून झाली व कुलवृद्धी सोमवंशी राजा कार्तविर्य सह्स्त्रार्जुन याच्या पासून झाली. मध्य प्रदेश स्थीत वर्तमान महेश्वर (प्राचीन- माहिष्मती नगरी) ही हयहयाधिपती कार्तविर्य सहस्रार्जुन राजाची राजधानी होती.श[२]
धर्म
[संपादन]कासार समाज हा विखुरलेला असुन वेगवेगळ्या ठिकाणी असलेला प्रमुख धर्म त्यांनी आत्मसात केलेला दिसतो. म्हणुनच पुढील विभाग पडतात- १)हिंदू उपासना असलेला सोमवंशीय क्षत्रीय कासार. २)जैन उपासना मानणारा दिगंबर जैन कासार. ३)श्री चक्रधर स्वामींना मानणारा महानुभाव पंथी.
उपास्य देवता- कासार या जातीची उपास्य देवता ही श्री कालिका माता आहे. ही कालिका माता पद्मसनात बसलेली, क्षमादायिनी आहे, उभी संहारक रूपातील नाही.
संत
[संपादन]१) संत श्री अडकोजी महाराज- राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज यांचे गुरू. २) श्री श्रीनाथ महाराज, तळेगाव ढमढेरे, ता-शिरूर, जि- पुणे ३) संत श्री शिवजी कासार- संत श्री तुकाराम महाराज यांचे १४ मानाचे टाळकरी पैकी एक. ४) संत श्री महादबा कासार- दरवर्षी कासार समाजाची दिंडी आषाढी एकादशीस श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री महादबा कासार दिंडी या नावाने नेण्यात येते.
संस्था
[संपादन]संस्था - क्षत्रीय कासार समाजाचे 'अखिल भारतीय कासार मध्यवर्ती मंडळ' ही संस्था आहे.
2. श्री कालिंका देवी संस्थान उर्फ श्री कासार देवी संस्थान, अचलपूर जि. अमरावती (र. न. अ १०५२)
प्रमुख मंदिरे
[संपादन]सोमवंशीय क्षत्रीय कासार श्री कालिका देवी मंदिर ५५२ बुधवार पेठ पुणे येथे आहे.
कासार समाजाचे पुरातन श्री कालिका देवी मंदिर-
१) शिरुर कासार
२) निनगुर (नेकनुर)
३) कलिंका देवी मंदिर, डिग्रस (बीड)
४) घोटण (जिल्हा - अहमदनगर)
५) भुतेगाव (जिल्हा- जालना)
६) श्री कालिंका देवी कासार समाज मंदिर, वामन नगर, खामगांव जि.बुलढाणा
७) श्री कालिका माता मंदिर कनकशीळ छत्रपती संभाजीनगर
८) कालिंका माता मंदिर कुंभारी बाजार, ता. जि. परभणी
९) श्री कालिका माता मंदिर चकलांबा ता.गेवराई जि.बीड
10) श्री. कालिंका देवी संस्थान, अचलपूर. जि. अमरावती
उल्लेखनीय व्यक्ती
[संपादन]चित्रपटसृष्टी- १) व्ही. शांताराम (श्री शांताराम राजाराम वणकुद्रे) २) किमी काटकर ३) वैभव मांगले ४) अश्विनी कासार ५) चिन्मय मांडलेकर
राजकारणी- १)स्व.शंकर रामकृष्ण मुरुडकर हे पुणे सार्वजनिक सभेचे व्यवस्थापन मंडळाचे कायमस्वरूपी सदस्य होते. १८८५ सालापासून 'पुणे सार्वजनिक सभा' भारतीय काँग्रेस म्हणून ओळखली जाऊ लागली. २)स्व. राजाभाऊ झरकर (राज्यमंत्री). ३)पुणे स्थायी समिती विद्यमान अध्यक्ष श्री हेमंत रासने. 4)स्व. पी. जी. दस्तुरकर विधान परिषद नांदेड.
संदर्भ
[संपादन]- ^ "महाराष्ट्रातील जैन, सोमवंशीय क्षत्रिय, त्वष्टा कासार". Channel Mahalaxmi (इंग्रजी भाषेत). 2021-03-30. 2022-07-07 रोजी पाहिले.
- ^ केतकर, डाॅ श्रीधर (१९२४). महाराष्ट्रीय ज्ञानकोश विभाग ११. महाराष्ट्रीय ज्ञानकोशमंडळ लिमिटेड नागपूर. pp. ४७३, ४७४, ४७५, ४७६, ४७७.