Jump to content

अलास्का

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


अलास्का
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
अलास्का राज्याचा ध्वज अलास्का राज्याचे राज्यचिन्ह
चिन्ह
टोपणनाव: The Last Frontier
ब्रीदवाक्य: North to the Future
अलास्का दर्शविणारा नकाशा
अलास्का दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर अलास्काचे स्थान
अधिकृत भाषा -
इतर भाषा इंग्लिश
रहिवासी अलास्कन
राजधानी जुनू
मोठे शहर ॲंकरेज
सर्वात मोठे महानगर ॲंकरेज
क्षेत्रफळ  अमेरिकेत १वा क्रमांक
 - एकूण १७,१७,८५४ किमी² (६,६३,२६८ मैल²)
  - रुंदी ३,६३९ किमी 
  - लांबी २,२८५ किमी 
 - % पाणी १३.७७
लोकसंख्या  अमेरिकेत ४७वा क्रमांक
 - एकूण ७,३१,४४९ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता ०.४९/किमी² (अमेरिकेत ५०वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  $६४,३३३
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश (४९वावा क्रमांक)
गव्हर्नर शॉन पार्नेल
संक्षेप AK  US-AK
संकेतस्थळ www.alaska.gov

अलास्का हे अमेरिकेच्या ५० राज्यांपैकी एक आहे. अलास्का व हवाई ही दोन राज्ये अमेरिकेच्या एकमेकांशी संलग्न असलेल्या अन्य ४८ राज्यांपासून वेगळी पडली आहेत. अलास्काच्या पूर्वेला कॅनडा देशाचे युकॉनब्रिटिश कोलंबिया हे प्रांत, उत्तरेला आर्क्टिक महासागर व पश्चिम व दक्षिणेला प्रशांत महासागर आहे. पश्चिमेला बेरिंगची सामुद्रधुनी अलास्काला रशियापासून वेगळे करते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अलास्का हे अमेरिकेचे सर्वात मोठे राज्य आहे, परंतु लोकसंख्या घनतेच्या दृष्टीने अलास्का अमेरिकेतील सर्वात तुरळक लोकवस्तीचे (०.४९ व्यक्ती प्रति चौरस किमी) राज्य आहे.

इ.स. १८६७ साली अमेरिकेने अलास्का प्रदेश रशियन साम्राज्याकडून ७२ लाख डॉलर्स किंमतीला विकत घेतला. ११ मे १९१२ रोजी अलास्काला अमेरिकेचा एक प्रदेश बनवण्यात आले तर ३ जानेवारी १९५९ रोजी अलास्का अमेरिकन संघामधील ४९वे राज्य बनले. जुनू ही अलास्काची राजधानी तर ॲंकरेज हे येथील सर्वात मोठे शहर व महानगर आहे. अलास्कामधील ५० टक्के रहिवासी ॲंकरेज महानगर क्षेत्रामध्येच राहतात.

अलास्काची अर्थव्यवस्था खनिज तेल, नैसर्गिक वायूमासेमारी ह्या नैसर्गिक संपत्तीवर अवलंबून असून येथील वार्षिक दरडोई उत्पन्न अमेरिकेमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.


गॅलरी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  • Alaska.gov – अधिकृत संकेतस्थळ
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: