Jump to content

अँड्रॉईड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ॲन्ड्रॉइड या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲंड्रॉईड
ॲंड्रॉईड (संचालन प्रणाली)
ॲंड्रॉईड (संचालन प्रणाली)
मूळ लेखक गूगल, ओपन हॅन्डसेट अलायन्स
विकासक गूगल
प्रारंभिक आवृत्ती २१ ऑक्टोबर २००८[]
सद्य आवृत्ती ८.१ (ओरिओ)
(५ डिसेंबर २०१७[])
सद्य अस्थिर आवृत्ती ॲंड्रॉईड पी (Android P)
प्रोग्रॅमिंग भाषा सी, सी++, जावा
स्रोत पद्धती मिश्र (मुक्तस्त्रोत आणि गुप्तस्त्रोत)
प्लॅटफॉर्म ३२ आणि ६४ बिट ए.आर.एम, x८६ आणि x८६-६४
भाषा इंग्लिश (प्रमुख), १००+ (भाषांतरीत)
सॉफ्टवेअरचा प्रकार मोबाईल संचालन प्रणाली
सॉफ्टवेअर परवाना अपाचे २.०, ग्नू जीपीएल २.० (लिनक्स गाभा आणि त्यामधील बदलांसाठी)
संकेतस्थळ ॲन्ड्रॉइड.कॉम
गॅलेक्सी नेक्सस

अँड्रॉईड (इंग्रजी: Android) ही मोबाईल फोनसाठी गूगल कंपनीने विकसित केलेली एक संचालन प्रणाली आहे. ही संचालन प्रणाली लिनक्सवर आधारभूत आहे. गूगलने ही प्रणाली लिनक्सप्रमाणे ठेवण्याचे जाहीर केले आहे.[] जावा प्रोग्रॅमिंग भाषेसाठी विकासकांना स्वातंत्र्य मिळाले आहे.[] २१ ऑक्टोबर २००८ला प्रारंभिक आवृत्ती प्रदर्शित करण्यात आली. सध्या ९ डिसेंबर २०१३ रोजी ४.४.२ (जेली बीन) ही आवृत्ती प्रकाशित करण्यात आली आहे. आता मोबाईल पाठोपाठ टॅबलेट पी.सी. साठीही अँड्रॉईड लोकप्रिय होत आहे. वापरकर्त्यांच्या संख्येच्या दृष्टीने आयफोन (आयओएस) खालोखाल दुसरा क्रमांक लागतो. नोकिया, ब्लॅकबेरी ह्या मोठ्या मोबाईल उत्पादक कंपन्या वगळता जगभरातील जवळजवळ सर्व मोठ्या मोबाईल फोन उत्पादकांनी (सॅमसंग, एलजी, सोनी एरिक्सन, मोटोरोला, एचटीसी, डेल, इत्यादी) चालणारे स्मार्टफोन व टॅबलेट पी.सी. तयार केले आहेत.

इ.स. २०१० च्या शेवटी अँड्रॉईड कार्यप्रणाली जगातील सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन प्लॅटफॉर्म बनला आणि त्याद्वारे आधी सुमारे १० वर्षे अधिपत्य गाजवणाऱ्या नोकियाच्या सिंबियन कार्यप्रणालीचे वर्चस्व संपले. कॅनालिस (Canalys) या रिसर्च संस्थेच्या अहवालानुसार इ.स. २०१० च्या शेवटी जगभरातून अँड्रॉईड ३३% स्मार्टफोन विकले गेले तर नोकियाच्या सिंबियनचे ३१% स्मार्टफोन विकले गेले.[][]

अँड्रॉईड मुक्त स्रोत असल्यामुळे अँड्रॉईड विकास करण्यासाठी जगभरात खूप मोठ्या संख्येत विकासकांचा समुदाय आहे. अँड्रॉईड फोनसाठी आतापर्यंत २,००,००० पेक्षा जास्त उपयोजने (ऍप्स) उपलब्ध आहेत. त्यातील बहुसंख्य उपयोजने मोफत आहेत.

आवृत्त्या

[संपादन]

गूगलतर्फे अधिकृतरित्या ग्राहकांसाठी वितरित केलेल्या अथवा करण्यात येणाऱ्या अँड्रॉइड आवृत्त्यांची यादी.[]

नावआवृत्तीप्रकाशनाची तारीखसद्यस्थिती
कोणतेही सांकेतिक नाव नाही१.०२३/०९/२००८कालबाह्य
पेटिट फोर१.१०९/०२/२००९कालबाह्य
कपकेक१.५२७/०४/२००९कालबाह्य
डोनट[]१.६१५/०९/२००९कालबाह्य
इक्लेअर[]२.० ते २.१२६/१०/२००९कालबाह्य
फ्रोयो[]२.२ ते २.२.३२०/०५/२०१०कालबाह्य
जिंजरब्रेड[१०]२.३ ते २.३.७०६/१२/२०१०कालबाह्य
हनीकोंब[११]३.० ते ३.२.६२२/०२/२०११कालबाह्य
आईस्क्रीम सँडविच[१२]४.० ते ४.०.४१८/१०/२०११कालबाह्य
जेली बीन[१३]४.१ ते ४.३.१०९/०७/२०१२कालबाह्य
किटकॅट[१४]४.४ ते ४.४.४३१/१०/२०१३कालबाह्य
लॉलीपॉप[१५]५.० ते ५.१.११२/११/२०१४कालबाह्य
मार्शमॅलो[१६]६.० ते ६.०.१०५/१०/२०१५कालबाह्य
नूगॅट७.० ते ७.१.२२२/०८/२०१६कालबाह्य
ओरिओ८.० ते ८.१२१/०८/२०१७कालबाह्य
पाय९.००६/०८/२०१८कालबाह्य
अँड्रॉइड १० (सांकेतिक नाव: क्विन्स टार्ट)१०.००३/०९/२०१९कालबाह्य
अँड्रॉइड ११ (सांकेतिक नाव: रेड व्हेलवेट केक)११.००८/०९/२०२०समर्थित
अँड्रॉइड १२ (सांकेतिक नाव: स्नो कोन)१२.० ते १२.१४/१०/२०२१समर्थित
अँड्रॉइड १३ (सांकेतिक नाव: तिरामिसू)१३.०१५/०८/२०२२समर्थित
अँड्रॉइड १४ (सांकेतिक नाव: अपसाइड डाउन केक)१४.०४/१०/२०२३समर्थित
अँड्रॉइड १५ (सांकेतिक नाव: व्हिन्सिला)१५.०३/०९/२०२४सद्य आवृत्ती

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 "Android is now Open Source" (इंग्रजी भाषेत).
  2. "Android 8.1 has arrived – here's everything it brings" (इंग्रजी भाषेत).
  3. "Google's Android parts ways with Java industry group" (इंग्लिश भाषेत). 2013-12-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-05-01 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. Tarmo Virki and Sinead Carew. "Google topples Symbian from smartphones top spot". Reuters (इंग्लिश भाषेत). 2015-05-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 February 2011 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. "Google's Android becomes the world's leading smart phone platform (Canalys research release: r2011013)". Canalys (इंग्रजी भाषेत). 31 January 2011. 1 February 2011 रोजी पाहिले.
  6. "Android". Android (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  7. "Android - History". Android (इंग्लिश भाषेत). 2018-08-30 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  8. "Android - History". Android (इंग्लिश भाषेत). 2018-08-30 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  9. "Android - History". Android (इंग्लिश भाषेत). 2018-08-30 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  10. "Android - History". Android (इंग्लिश भाषेत). 2018-08-30 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  11. "Android - History". Android (इंग्लिश भाषेत). 2018-08-30 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  12. "Android - History". Android (इंग्लिश भाषेत). 2018-08-30 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  13. "Android - History". Android (इंग्लिश भाषेत). 2018-08-30 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  14. "Android - History". Android (इंग्लिश भाषेत). 2018-08-30 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  15. "Android - History". Android (इंग्लिश भाषेत). 2018-08-30 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  16. "Android - History". Android (इंग्लिश भाषेत). 2018-08-30 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

[संपादन]