Jump to content

एचटीसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एचटीसी कॉर्पोरेशन
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र स्मार्टफोन
स्थापना इ.स. १९९७
मुख्यालय ताओयुआन, Flag of the Republic of China तैवान
महत्त्वाच्या व्यक्ती चेर वांग (चेयरमन)
पीटर चौ (सीईओ व अध्यक्ष)
कर्मचारी ५,६५९
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

एचटीसी कॉर्पोरेशन (इंग्लिश: HTC Corporation , चिनी: 宏達國際電子股份有限公司 ;) ही तैवान येथील मोबाईल फोन आणि स्मार्टफोनांचे उत्पादन करणारी एक दूरसंचार कंपनी आहे. पूर्वी ही कंपनी मायक्रोसॉफ्टच्या विंडोज मोबाईल संचालन प्रणालीवर चालणारे स्मार्टफोन तयार करण्यावर लक्ष एकवटत होती. परंतु इ.स. २००९ सालापासून एचटीसीने आपले लक्ष गूगलच्या ॲन्ड्रॉइड मोबाईल संचालन प्रणालीवर, तसेच इ.स. २०१० सालामध्ये मायक्रोसॉफ्टच्या विंडोज फोन प्रणालीवर चालणारे स्मार्टफोन तयार करण्यात केंद्रित केले आहे. या कंपनीचे मोबाईल फोन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]