जावा (आज्ञावली भाषा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
जावाचे चिन्ह:ड्यूक

जावा ही एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज (संगणकीय भाषा) आहे. जावा ही 'Sun Microsystems' ह्या कंपनीने विकसित केली आणि सर्वप्रथम सन १९९५ च्या सुमारास सार्वजनिकपणे उपलब्ध केली.

जावा ही 'सर्व्हर सॉफ्टवेर' तसेच 'वेब-बेस्ड सॉफ्टवेर्स' ह्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे.त्याचप्रमाणे हाताळण्याइतक्या लहान काँप्युटर ('Handheld computing devices') व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये (उदा. मोबाईल फोन, पी.डी.ए इत्यादी) जावाचा वापर केला जातो.

जावाचे मुख्य उद्दिष्ट्य तिच्या 'एकदा लिहा, सर्वत्र वापरा' अर्थात 'Write once, run everywhere' ह्या ब्रीदवाक्यातून ध्वनीत होते. याचा अर्थ 'जावामध्ये एकदा तयार केलेले सॉफ्टवेर, जावा असलेल्या दुसऱ्या कुठल्याही काँप्युटर सिस्टिमवर चालते' असा आहे. जावा ही पूर्णपणे वस्तुनिष्ठ संगणक आज्ञावली आहे. म्हणजे जावातील सर्व आज्ञा विशिष्ठ वर्गात लिहिल्या जातात. मग या वर्गाची वस्तू (ऑब्जेक्ट) तयार करून आपल्याला त्यातील आज्ञा कार्यान्वित करता येतात. अश्या कितीही वस्तू आपण तयार करू शकतो म्हणूनच जावा ही कोड-पुनर्वापराला मदत करते.

एका प्राथमिक आज्ञावलीचे उदाहरण:

/**
 * Outputs "Hello, World!" and then exits
 */
public class HelloWorld {
    public static void main(String[] args) {
        System.out.println("Hello, World!");
    }
}

हा प्रोग्रॅम चालविल्यानंतर संगणकाच्या पडद्यावर "Hello World" अशी अक्षरे दिसतील.

जावा चिन्ह
जावा चिन्ह