हिंदू विरोधी भावना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हिंदू विरोधी भावना, ज्याला हिंदूफोबिया किंवा हिंदुत्व विरोध म्हणूनही ओळखले जाते, ही हिंदू धर्माच्या पाळण्याविषयी आणि हिंदू लोकांच्या विरोधात एक नकारात्मक समज, भावना किंवा कृती आहे.

भारतामध्ये जगात सर्वाधिक हिंदू वास्तव्यास आहेत. भारतीय लोकांच्या अनुसार पाश्चात्य विद्वानांनी हिंदू धर्माला विकृत करुन समाजामध्ये नकारात्मक दृष्टी कायम ठेवली आहे. याची सुरुवात भारतातील मॅकालेईझम पासून झाली. ऐतिहासिकदृष्ट्या, ब्रिटिशांनी विभाजन आणि राज्य करा या धोरणाचा एक भाग म्हणून, दक्षिण आशियातील अनेक प्रकारच्या रूढीवाद्यांना प्रवृत्त केले होते.

दक्षिण आशियातील जाती प्रणालीवर ही भेदभावपूर्ण असल्याची टीका केली जाते आणि बहुतेक वेळा हिला सांस्कृतिक विषयाऐवजी फक्त 'हिंदू' मुद्दा म्हणून पाहिले जाते. हा एक सामान्य गैरसमज आहे, कारण इस्लाम, शीख आणि ख्रिस्ती यासारख्या इतर धर्मातील काही अनुयायांनी भारतात जातीभेद ठेवण्याची प्रथा पाळली आहे.[१][२][३] ख्रिश्चन मिशनऱ्यांनी हिंदू प्रथेच्या निवडक वैशिष्ट्यांची टिका केली आहे; जसे की मूर्तिपूजा, सती आणि बालविवाह. यातिल मूर्तिपूजा हि इस्लाम मध्ये अमान्य असल्याने ह्यावर मुसलमानांकडूनही टीका केली गेली आहे.[४]

भारतात हिंदूविरोधी विचारांचा इतिहास[संपादन]

मुस्लिम राज्यकर्ते[संपादन]

सोरठी सोमनाथचे इ.स. १८९६ मधील खंडर
मार्तंड सूर्य मंदिराचे अवशेष

मुहम्मद बिन तुघलकच्या कारकीर्दीत, मुस्लिम धर्मगुरू झियाउद्दीन बरानी यांनी फतवा-ए-जहंदारी या सारख्या अनेक कृती लिहिल्या ज्याने त्यांना "इस्लामचा धर्मांध नायक" म्हणून नावलौकिक मिळविले. त्याने लिहिले की "हिंदू धर्माविरूद्ध सर्वतोपरी संघर्ष" सुरू करावा. टिपू सुलतानच्या कारकिर्दीत हिंदूंवरही विविध अत्याचार झाले. १५व्या शतकाच्या सुरुवातीला काश्मीरवर राज्य करणाऱ्या शाह मीर राजघराण्याचा सहावा सुलतान सिकंदर बुत्शिकनने अनंतनाग जवळ असलेल्या मार्तंड सूर्य मंदिराचा नाश केला. तसेच महमूद गझनीने पण सोरठी सोमनाथ मंदिरावर पहिला हल्ला केला.

ब्रिटिश आणी पोर्तुगीज राज्य[संपादन]

भारतीय उपखंडाच्या ब्रिटीश आणी पोर्तुगीज राजवटीदरम्यान, अनेक ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी हिंदूंना ख्रिस्ती धर्मात रूपांतरित करण्यासाठी हिंदूविरोधी प्रचार केला.

भारता बाहेर[संपादन]

पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, मलेशियासारख्या अनेक मुस्लिम बहुसंख्य देशांमध्ये हिंदू धर्माच्या लोकांना अत्याचाराचा सामना करावा लागतो. त्यांना काफिर म्हटले जाते. १९८० च्या दशकात पाकिस्तानमधील सार्वजनिक शालेय अभ्यासक्रमाचे इस्लामीकरण करण्यात आले. दक्षिण अफ्रिका, अमेरिका, इंग्लंड, त्रिनिदाद आणि टोबॅगो यासारख्या देशांमध्येही हिंदूविरोधी भावना दिसतात.

अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीत हिंदू आणि शीख यासारख्या अल्पसंख्यांकांना मे २००१ मध्ये सार्वजनिक ठिकाणी बिल्ले घालायला सांगण्यात आले ज्याने हे लोक ओळखणे सुलभ झाले. असे नाझी जर्मनीने ज्यू लोकांना पिवळे बिल्ले घालण्यासाठी सक्ती केली होती.

मलेशियामध्ये विविध हिंदू मंदिरे नुकतीच तोडण्यात आली आहेत. २००९ मध्ये हिंदूंच्या मंदिरात गायींचे चिरलेली मुंडके फेकण्यात आली.

संदर्भ[संपादन]

  1. ^ correspondent, Soutik Biswas Delhi. "Why are many Indian Muslims seen as untouchable?". BBC News. 2016-05-17 रोजी पाहिले.
  2. ^ Cohen, Stephen P. (2001). India: Emerging Power. Brookings Institution Press. p. 21. ISBN 978-0-8157-9839-2.
  3. ^ The Editors of Encyclopædia Britannica. "Christian caste-Indian Society". Encyclopædia Britannica. The Encyclopædia Britannica. 31 May 2017 रोजी पाहिले.
  4. ^ The Editors of Encyclopædia Britannica. "Hinduism". Encyclopædia Britannica. The Encyclopædia Britannica. 26 June 2017 रोजी पाहिले.