मुहम्मद बिन तुघलक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महंमद बिन तुघलक (१३२५-१३५१) हा दिल्ली सल्तनतीचा तुघलक वंशाचा शासक होता. गयासुद्दिन तुघलकच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र ‘जुना खॉं ’ मुहम्मद बिन तुघलक नावाने सुलतान झाला. मोहम्मद बिन तुग़लक हा विद्वानांचा आश्रयदाता होता. अनेक विद्वानांना त्याने आपल्या राज्यात आश्रय दिला.

इतिहासकारानी महम्मद बिन तुघलकाला दिलेली नावे किंवा त्याचे इतर नावाने केलेले वर्णन-

त्याचे अनियोजित,कोणतीही पूर्वतयारी न करता घेतलेले निर्णय फसल्यामुळे व त्याच्या उतावीळपणामुळे त्याला ‘स्वप्नशील’, ‘वेडा महम्मद’ किंवा क्रूर-कृत्यांमुळे ‘रक्त पिपासू’सुद्धा म्हटले जाते.

मुहम्मद बिन तुघलकचे वर्णन व कार्य खालीलप्रमाणे-

  • बुद्धिप्रामाण्यवादी
  • उदार विचारांचा राज्यकर्ता
  • प्रयोगशील व सुधारणावादी-अ-प्रशासकीय सुधारणा प्रयोगशील व सुधारणावादी शासक म्हणून मोहम्मद बिन तुगलक का चं कार्य हे काळाच्या पुढे होतं ज्या काळामध्ये चीनमध्ये चलनी नोटांचा प्रयोग सुरू झाला अशा काळात मोहम्मद बिन तुगलक याने आपल्या राज्यामध्ये चल्ली नाण्यांचा प्रयोग केला मात्र त्याची अंमलबजावणी योग्य रीतीने न झाल्यामुळे हा प्रयोग अपयशी ठरला मात्र त्याचा हा प्रयोग काळाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा होता वास्तविक तो दूरदृष्टी असलेला शासक होता तो वास्तव वादी होता स्वप्नाळू मुळीच नव्हता मात्र त्याच्या प्रयोगाची अंमलबजावणी योग्य रीतीने न झाल्यामुळे व शासकीय अधिकाऱ्यांचा त्याला पुरेसा पाठिंबा न मिळाल्यामुळे त्याचे काही प्रयोग यशस्वी ठरले आणि त्यामुळेच त्याला दोषी देखील दिला जातो

बुद्धिप्रामाण्यवादी ː- मुहंमद तुघलक स्वतःच्या जीवनात नमाज, रोजे यांचा श्रद्धापूर्वक पालनकर्ता होता, तसेच तो इतरांनी पाळावा इतका आग्रहीसुद्धा होता. एक सुशिक्षित व विद्वान शासक म्हणून त्याची ख्याती आहे.तो तत्त्वज्ञान, गणित,औषधीशास्त्र तसेच धर्म यांसारख्या विद्वत्‌शाखांचा माहीतगार होता. त्याच्या उतावीळपणामुळे त्याचे अनेक निर्णय फसले पण तो एक महत्त्वाकांक्षी शासक होता. त्याचे ग्रंथवाचन अफाट होते. बर्नीने त्याच्यावर केलेल्या टीकेनुसार कळून येते की तो आत्यंतिक बुद्धिप्रामाण्यवादी होता.बरर्नीच्या मते तो तर्काच्या व बुद्धीच्या कसोटीवर परीक्षा घेतल्याशिवाय तो कोणत्याही इस्लामी कायद्याचा कायदांचा स्वीकार करीत नसे. यामुळे त्याला बुद्धिप्रामाण्यवादी शासक म्हटले तरी वावगे ठरणार नाही. बुद्धिप्रामाण्यवादी म्हणून मोहम्मद तुगलक याचे अनेक उदाहरणे इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत त्याने अंध अनुकरणाने धर्म स्वीकारला नाही व त्याचं आचरण देखील त्या पद्धतीने केलं नाही सारासार विचार करूनच व बुद्धिप्रामाण्यवाद स्वीकारून त्याने धर्माचा स्वीकार केला वेळप्रसंगी त्याने धर्ममार्तंड प्राबल्य झुगारून दिलं

२)उदार विचारी राज्यकर्ता:- मुहंमद हा मोकळ्या तसेच उदार मनाचा होता हे त्याच्या प्रवृत्तीवरून कळून येते. तो हिंदू धर्मियांच्या होळीसरख्या काही सणांमध्ये सहभागी होत असल्याबाबतची माहिती आपल्याला अनेक इतिहासकारांच्या लेखनातून दिसून येते. तसेच तो कट्टर सिद्धान्तवादी नव्हता, ही बाब अनेक योग्यांसमवेत आणि राजशेखर तथा जिनप्रभा सुरीसारख्या जैन संतांशी त्याचे जे सहचर्य होते, यावरून स्पष्ट होते.त्याने गुजरातमध्ये असताना अनेक जैन मंदिरांना भेटी देऊन त्यांना अनुदान दिले होते, असे सतीशचंद्र यांच्या लेखनात नमूद केले आहे. यावरून आपण समजू शकतो की तो एक उदार विचारी राज्यकर्ता होता.

३)प्रयोग व सुधारणा- मुहंमद यास नावीन्यपूर्वक प्रयोग तसेच प्रशासनात सुधारणा करणे आवडे..प्रशासनात उत्साह आणि राज्यकारभरामध्ये एकसूत्रता आणण्याची त्याची इच्छा होती. यासाठी त्याने अनेक योजना आखल्या, पण त्यांपैकी काहींचाच परिणाम प्रशासन सुधारण्यासाठी झाला असे म्हणता येईल. मोहम्मद बिन तुगलक याने केलेले प्रयोग आणि सुधारणा ह्या व्यावहारिक आणि काळाची पावले ओळखणाऱ्या होत्या. परंतु योग्य नियोजनाचा अभाव आणि त्या योजना राबवताना घ्यावयाची खबरदारी या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्या प्रत्यक्षात यशस्वी होऊ शकल्या नाहीत

अ)प्रशासकीय सुधारणा:-राजधानी दिल्ली वरून देवगिरीला नेणे.हा त्याच्या जीवनातील प्रभावी तशेच बहुचर्चित असा निर्णय होता.आजपर्यंत त्याच्या या निर्णयासाठी त्याला वेड्यात काढले जाते. पण आपल्याला त्याचे या निर्णयामागे कोणते उद्देश होते व त्याची कोणती महत्त्वाकांक्षा होती ते आधी समजून घ्यायला पाहिजे. तसेच हे निर्णय अनियोजित किंवा बिनपूर्वतयारीनिशी केलेले नव्हते, असे काही पुराव्यांवरून म्हणता येते. मोहम्मद तुगलक याने आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक चांगली प्रशासकीय निर्णय घेतले परंतु त्याची योग्य अंमलबजावणी आणि कार्यवाही न केल्यामुळे त्याचे हे प्रशासकीय सुधारणांचे निर्णय फसले

देवगिरीला राजधानी स्थलांतरित करण्यामागचे उद्देश व कारणे:-

१)देेवगिरी हे ठिकाण सल्तनतीच्या माधोमध होते.

२)दक्खनवर अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवण्यासाठी त्याला दुसऱ्या राजधानीची गरज होती.

3)मुहंमद शाहजादा व सुलतान असताना या दोन्ही पदांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्याने अनेक वर्षे दक्खनमध्ये व्यतीत केले, यामुळे तो तेथील डोंगरदर्ऱ्यांशी,व आल्हाददायक हवामानाशी चांगला परिचित होता, त्यामुळे त्याला असलेले आकर्षण योग्य होते.

पण त्याचा हा निर्णय अयशस्वी व मनस्ताप करणारा ठरला व यासाठी त्याला अनेक टीकांना तोंड द्यावे लागले.

ब)आर्थिक व कृषी सुधारणा:-

सांकेतिक चलन- मोहंमदने देेवगिरीला प्रयाण केल्यानंंतर नाणेव्यवस्था सुधारण्यासाठी सांकेतिक चलनाचा दुसरा प्रयोग केला. मध्ययुगीन काळात सांकेतिक चलन ही पूर्णथा नाविन्यपूर्ण सुधारणा होती.त् या काळात चीनध्येसुद्धा सांकेतिक चलन म्हणून कागदी चलन प्रचलित होते.मंगोल सम्राट कुबलाई खानाने 'चान' नावाचे कागदी चलन सुरू केले होते व त्याच्या मृत्यूपर्यंत योग्यरीत्या चालू होते. पुढे अशाच प्रयोग कातू या इराणी राजाने 'चान' चलन लागू करण्याचा प्रयत्न केला पण तो फसला.

महंमदाने सांकेतिक चलन म्हणून सोनाच्या व चांदीच्या नाण्यानेवजी तांब्याची व पितळेची नाणी चलनात आणली,परंतु त्याचा हा प्रयोग पूर्णपणे फसला कारण बहुतेक हिंदू हे सोनार होते आणि तेच या नाण्यांची नक्कल करून बनवू लागले. या नकली नाण्यांचा वापर बाजारात होऊ लागला. त्यामुळे राज्याच्या महसुलावर ताण पडू लगल्यामुळे सांकेतिक चलन बंद करावे लागले. त्याचा हा दुसरापण प्रयोग फसला पण याचे तत्कालीन परिणाम तर नाही पण याचे दूरगामी परिणाम नक्की झाले असे म्हणता येऊ शकते,कारण मध्ययुगीन काळात असा निर्णय घेणे हे एका महत्त्वकांक्षी राजायाच घेऊ शकत होता. पण असो त्याच्या या नाणे बदलाच्या धाडसामुळे त्याला वेडा ठरवण्यात आले. .पण एक की आपल्याला त्याच्यात दूरदृष्टी नक्की दिसून येते.

सांकेतिक चलन काढण्यामागील उद्देश:-

१) प्रचंड मोठे सैन्य व या सैन्याना लागणार प्रचंड वेतन. यामुळें सरकारी तिजोरीतील तुटवडा भरण्यासाठी.

२) सोन्याचांदीचा तुटवडा असल्यामुळे सांकेतिक चलन काढण्यावर भर.

कृषीविषयक धोरण:- मुहंदाचे कृषिविषयक धोरण हे त्याच्या वडिलांपेक्षा कठोर होते. .त्याचे वडील गियासुद्दीन तुघलकानी अल्लाउद्दीनने सुरू केलेला शेतजमिनीच्या मोजणीनुसार आकारण्यात येणारी सारापद्धत मोडीत काढून त्या जागी 'प्रत्येक वेळी हातात आलेल्या पिकांची मोजणी करून त्यापैकी ठरावीक भाग शेतसारा म्हणून सुरू केला. खर तर गियासुउद्दीन तुघलकचे धोरण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर होते.

पण मुहंमदने आपल्या शासन काळात कर वसुलीत सक्ती केल्याने तसेच करांचा दर बराच वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना खुप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. दुष्काळ पडला तरी तो सक्ती ने 'चराई' तसेच 'घराई'कर वसूल करायचा.त्यामुळे शेतकरी वाढीव करांविरोधात बंड करत..मुहंमद हे बंड मोडण्यासाठी कठोर कारवाही करायचा. पण जेव्हा सतत ७ वर्ष दुष्काळ पडला तेव्हा महम्मदने अनेक कृषीविषयक धोरण आखले.यात त्याने एक 'दिवाण-ए-अमीर-कोई'नावाचा विभाग सुरू केला.

बर्नीनुसार पडीक व नापीक जमीन पिकाखाली आणण्यासाठी सुलतानाने योजना आखली होती.त्या मध्ये शेतीत सुधारणा, शेतीच्या पद्धतीमध्ये बदल जसे बार्लीच्या जागी गहू,गव्हाच्या जागी ऊस,तर उसाच्या जागी द्राक्ष. अश्या योजनांमुळे नक्कीच महसुलात वाढ होणे अपेक्षित होते.बर्नीनुसार मुहंमदाने दुष्काळावर मात करण्यासाठी दिल्लीत मंदतकेंद्रे उघडली, तसेच विहिरी खोदणे,शेती अवजारे-बी बियाणे खरेदी करणे यासाठी कर्ज वाटप केले. त्याच्या योजनांमधील काही गोष्टी नक्कीच परिणामकारक होत्या.अस म्हणणे दुमत ठरणार नाही जर त्याच्या योजनांकडे बारकाईने बघितले तर.....

शेवटचे पर्व:-

आपल्या शासन काळात शेवटच्या वेळी जेव्हा मोहम्मद तुघलकाने गुजरातमधील विद्रोह मोडून परत येत असतानी वाटेत तो बिमार पडला आणि त्याला मृत्यूने वेढले.२० मार्च १३५१ रोजी तो मृत्यू पावला.

काही इतिहासकारांचे त्याच्यावरील भाष्यः-

१)बदायुनी-सलतनतला त्याच्या प्रजेपासून व प्रजेला त्याच्यापासून सुटका मिळाली.

२)डाॅ.ईश्वरी प्रसादानुसार तो 'मध्ययुगातील राजमुकुट धारण करणाऱ्यांमध्ये मुहंमद तुघलक हा निःसंदेह योग्य व्यक्ती होता.

अशाप्रकारे मुहंमद हा आपल्या चुकींच्या निर्णयांमुळे वेडा ठरला असला तरी तो एक महत्त्वाकांक्षी ,स्वप्नशील सुलतान होता.