हरिद्वार
हरिद्वार | |
भारतामधील शहर | |
हर की पौडी घाट |
|
देश | भारत |
राज्य | उत्तराखंड |
जिल्हा | हरिद्वार जिल्हा |
क्षेत्रफळ | १२.३ चौ. किमी (४.७ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १,०३० फूट (३१० मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | २,२८,८३२ |
- महानगर | ३,१०,७९६ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
हरिद्वार हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक शहर आहे.हरिद्वार जिल्ह्याचे मुख्य ठिकाण(मुख्यालय) आहे. हरिद्वार शहर उत्तराखंडच्या दक्षिण भागात गंगा नदीच्या काठावर वसले आहे व ते राजधानी देहरादूनच्या ५० किमी नैऋत्येस स्थित आहे. २०११ साली हरिद्वारची लोकसंख्या सुमारे २.२८ लाख होती.
हरिद्वार हे हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते. गंगा नदीचा हरिद्वार येथे भारतीय उपखंडामध्ये प्रवेश होतो. कुंभमेळा भरणाऱ्या ४ स्थानांपैकी हरिद्वार एक असून येथे दर १२ वर्षांनी हा मेळा भरतो. (नाशिक, अलाहाबाद व उज्जैन ही कुंभमेळ्याची इतर तीन स्थाने). तसेच अयोध्या, मथुरा, वाराणसी, कांचीपुरम, उज्जैन व द्वारका समवेत हरिद्वार सप्त पुरी ह्या सात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. हिंदू पुराणानुसार हरिद्वारमध्ये गंगेत स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात व मोक्षप्राप्ती होते.
वाहतूक
[संपादन]हरिद्वार रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे क्षेत्रामधील एक स्थानक दिल्ली-देहरादून ह्या प्रमुख मार्गावर स्थित असून येथे दररोज अनेक गाड्या थांबतात. राष्ट्रीय महामार्ग ५८ हरिद्वारमधून जातो.