Jump to content

लिंगभाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्त्रिया आणि पुरुष यांच्या शरीररचनांमध्ये फरक आहे, पण समाजामध्ये स्त्रिया आणि पुरुषांबाबत जे भेदभाव केले जातात, त्या सर्वांचे कारण आपल्याला त्यांच्या शारीरिक फरकांमध्ये सापडेलच असे नाही. लिंग हे शारीरिक आहे तर लिंगभाव समाजात घडवला जातो. स्त्रिया आणि पुरुषांना विशिष्ट प्रकारे वाढवले जाते; यात स्त्रियांनी व पुरुषांनी कसे वागावे हे शिकवले जाते. ह्याच स्त्रीत्व आणि पुरुषत्व ह्या कल्पना होत. ह्या कल्पना माणसांच्या वागणुकीवर खोलवर प्रभाव टाकतात. स्त्रीत्व आणि पुरुषत्वाच्या रूढ कल्पना ह्या स्त्रिया आणि पुरुषांना साचेबद्ध करून एकमेकांविरुद्ध उभे करतात. उदा. स्त्रीने सहनशील, नम्र असावे, आज्ञाधारक असावे, सर्वांशी जुळवून घ्यावे अशी अपेक्षा असते. तर पुरुषांना आक्रमक बनायला मुभा असते. ह्या कल्पना स्त्री-पुरूषांवर अवास्तव ओझे लादतात. उदा. पुरुषांना रडायची मोकळीक नसते. एखादा पुरुष रडायला लागला तर, काय मुलीसारखा मुळूमुळू रडतोस म्हणून हिणवले जाते. एखादी स्त्री जोरजोरात बोलली, हसली तर तिच्याकडे पुरुषी म्हणून बघितले जाते. घरकाम, चूल-मूल ही बाईची जबाबदारी तर घराबाहेरच्या जबाबदाऱ्या पुरुषाच्या मानल्या जातात. मुलींना लहानपणी खेळायला बाहुली, भातुकली तर मुलांना सायकल, कार, बंदूक अशी खेळणी दिली जातात. प्रौढ वयात येणाऱ्या जबाबदारीचे प्रशिक्षण लहान वयातच सुरू होते. स्त्री-पुरुषामधला शारीरिक फरक हा प्रामुख्याने त्यांच्या पुनरुत्पादनासंदर्भातील भिन्न जबाबदाऱ्या हा आहे. पुरुषाकडे रेतन तर स्त्रीकडे गर्भारपण, बाळंतपण आणि स्तनपान अशा प्राकृतिक जबाबदाऱ्या आहेत मात्र या पलीकडे कोणतीही कामे स्त्री/पुरुष कोणीही करू शकतात. उदा. स्वयंपाक, घरसफाई, शिवण-टिपण, शेतातले काम, डॉक्टर, नर्स, इंजिनिअर, शिक्षक इ.इ. मात्र घरकाम आणि बालसंगोपन ह्या आजही स्त्रीच्याच प्राथमिक जबाबदाऱ्या मानल्या जातात. इतक्या की बाहेरच्या जगातही स्त्रियांना बहुतेकदा घरकामाची विस्तारीत कामे मिळतात उदा. शिक्षिका, नर्स, स्वागतिका अशा प्रकारच्या कामात स्त्रियांचा अधिक भरणा असतो. अगदी शेतीकामातही स्त्रियांना पुरुषाच्या तुलनेत कमी मजुरी देण्याची मानसिकता आढळते. अर्थात काळानुसार आणि समाज परिवर्तनाच्या प्रयत्नांमुळे लिंगभावाच्या कल्पना आता बदलत चालल्याचे/खुल्या होऊ लागल्याचेही दिसते. या लिंग भावाचा उल्लेख जेंडर असाही केला जातो.

अशा तऱ्हेने लिंगभाव हा सामाजिक -सांस्कृतिक संरचनातून घडवला जातो उदा. जात, धर्म, वय इ. वेगवेगळ्या संस्कृतींनुसार लिंगभाव बदलत राहतो. पुरुषप्रधान समाजात लिंगभावाची जडणघडण पुरुषांना झुकते माप देणारी असते आणि तुलनेने स्त्रियांना पक्षपाताला अधिक तोंड द्यावे लागते. पुरुष कुटुंबप्रमुख, पुरुषाकडे मालमत्तेची मालकी, लग्न झाल्यावर स्त्रियांनी सासरी जाणे, पितृवंशीय व्यवस्था ह्या सामाजिक प्रक्रिया आपली समाजव्यवस्था पुरुषप्रधान असल्याचे दर्शवतात. अशा समजत स्त्रीचे स्थान दुय्यम बनते. ह्याचा एक गंभीर परिणाम म्हणजे स्त्रियांवर होणारे अत्याचार. बहुतेकदा स्त्रियांना आपल्या दुय्यम स्थानामुळे अत्याचारांना तोंड द्यावे लागते. अधिकाधिक स्त्रिया सार्वजनिक क्षेत्रात अनेक जबाबदाऱ्या निभावत आहेत आणि स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनाही वाढत आहेत. ह्यासाठी सामाजिक प्रबोधन आणि स्त्रियांचा माणूस म्हणून आदर समाजात रुजवणे गरजेचे आहे.

थोडक्यात असे म्हणता येईल की लिंगभाव म्हणजे स्त्रियांचा वेगळा विचार नव्हे तर लिंगभाव म्हणजे एखाद्या समाजातील स्त्रिया आणि पुरुषांची सापेक्ष सामाजिक स्थिती. अर्थात आजपर्यंत प्रामुख्याने स्त्री आणि पुरुष ह्या दोन लिंगभाव अस्मितांचाच विचार झाला आहे. याहून भिन्न लिंग व लिंगभाव अस्मिता समजून त्याचीही लिंगभाव संवेदनशील दृष्टीकोनातून चिकित्सा होणे गरजेचे आहे. तसे काही प्रयत्न चालू असल्याचे दिसते.

[]

नवे प्रवाह

[संपादन]

तृतीय पंथीय, अन्तःलिंगी आणि इतर लिंगभावाच्या चौकटीत न बसणाऱ्या अस्मितांनी लिंगाभावाच्या प्रस्थापित द्वैतवादी सिद्धांकानासंबंधी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्यात लिंगभावाला स्त्रिया आणि पुरुष या दोन पातळ्यांवरून न बघता त्याला अधिक व्यापक चौकटीतून बघणे अपेक्षित आहे.

तृतीयपंथीयांचे वैद्यक शास्त्रातील प्रकार

लेख...

तृतीयपंथी.... ( हिजडा )

एखादी व्यक्ती जन्मतःच नैसर्गिकरित्या लैंगिक विकृती घेऊन जन्मास येतो आणि अशा वेळेस तो स्त्री लिंग आहे की पुलिंग आहे हे स्पष्ट होत नाही. म्हणजेच तो नर आहे की मादी हे स्पष्ट होत नाही. या विकृतीलाच आपल्या समाजात तृतीयपंथी, हिजडा, समलैंगिक, छक्का किंवा नपुंसक असे संबोधले जाते.

वैद्यकिय भाषेत या तृतीयपंथी विकृतीचे १) L, २) G, ३) B, ४) T, ५) I, ६) Q,

         असे सहा प्रकार सांगितले जातात. या प्रकारांचा अर्थ खालील प्रमाणे आहे.

L= लेस्बियन, ज्या महिलेला दुसऱ्या महिले विषयी आकर्षण वाटते तिला लेस्बियन म्हणतात. लेस्बियनपैकी जिचे व्यक्तिमत्त्व पुरुषासारखे असते तिला 'बुच' म्हणले जाते. ती पुरुषासारखे बोलते, कपडे घालते. पण काही लेस्बियन पुरुषासारखे राहात नाहीत, त्यांना 'फेम' म्हणले जाते.

G = गे, एक पुरुष दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होतो त्याला 'गे' म्हणले जाते. मात्र या शब्दाचा वापर सर्वच समलैंगिक व्यक्तींबाबत केला जातो. यात लेस्बियन, गे, बायसेक्शुअल असे सर्वच आहेत. 'गे' कम्युनिटी किंवा 'गे पिपल' असेही त्यांना ओळखले जाते.

B = बायसेक्शुअल, जर कुणाला पुरुष आणि स्त्री अशा दोन्ही लिंगाच्या व्यक्ती आवडत असतील, त्यांच्यासोबत सबंध ठेवायची इच्छा असेल त्यांना बायसेक्शुअल असे म्हणतात.

T= ट्रांसजेंडर, ही अशी व्यक्ती असते की जन्माच्या वेळेस तिचे लिंग वेगळे होते आणि नंतर ती व्यक्ती स्वतःला वेगळ्या लिंगाची समजते तिला ट्रांसजेंडर म्हणतात. जी ट्रांसजेंडर आपल्या मनाप्रमाणे आपला ड्रेस बदलते तिला 'क्रॉस ड्रेसर' पण म्हणले जाते. जे ट्रांसजेंडर औषधी, ऑपरेशन, हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी आणि सेक्स रिसाइनमेंट सर्जरी ने लिंग बदलवून घेतात त्यांना 'ट्रांस सेक्शुअल' म्हणले जाते. यातही लेस्बियन ट्रांसजेंडर, गे ट्रांसजेंडर, आणि बाईसेक्शुअल ट्रांसजेंडर असे प्रकार आहेत.

I = इंटर-सेक्स, जन्म झाल्या नंतर ती व्यक्ती स्त्री आहे की पुरुष हे कळतच नाही त्यांना इंटर-सेक्स म्हणले जाते. त्यावेळेस डॉक्टरांना जे वाटते त्याच लिंगाच्या आधारे त्यांचे नाव ठेवले जाते. पुढे मोठे झाल्यानंतर ती व्यक्ती स्वतःला स्त्री, पुरुष किंवा ट्रांसजेंडर यापैकी एक समजायला लागते.

Q = क्वीयर, आपण निश्चित कोणत्या लिंगाचे आहोत हेच काही जण निश्चित करू शकत नाहीत. ते स्वतःला स्त्री, पुरुष, ट्रांसजेंडर, लेस्बियन, गे, किंवा बायसेक्शुअल असे काहीच म्हणून घेत नाहीत, त्यांना 'क्वीयर' म्हणतात.

वरील माहीती वरून आपल्याला तृतीयपंथी म्हणजे नेमके काय ? हे अगदी सोप्या साधारण भाषेत आणि वैद्यकीय भाषेत कळलेच असेल. यावरून आपणांस एक गोष्ट नक्कीच स्पष्टपणे लक्षात आली असेल, ती ही की तृतीयपंथीसुद्धा आपल्यासारखेच नैसर्गिकरित्या आईच्या पोटातून जन्मास आले आहेत. जसे आपण नऊ महिने आईच्या पोटात वाढलो तसेच ते पण वाढले आणि या जगात आले. जसा जन्माच्या आधी आपल्याकडे कुठलाही विकल्प किंवा आवडनिवड नव्हती ( जसे श्रीमंत घराण्यात जन्म होणे, दिसायला फार सुंदर असणे, विद्वान असणे इत्यादी ) तशी यांच्याकडे पण नव्हती. निसर्गाने अशी सोय करून दिली असती तर बरे झाले असते. मग कुणीच गरीब, अस्पृश्य, दलित, तृतीयपंथी, मानसिक बीमार, मठ्ठ, भ्रष्टाचारी, अधर्मी, किंवा अपंग जन्मास नसता. असो परत मुळ मुद्द्यावर येऊ या.

तृतीयपंथी या विकृतीने जन्मास येणे हे एक हार्मोन असंतुलन आहे. ही कुठलीही बिमारी, आजार किंवा दैवी कोप नाही. मग का बरे आपला सुशिक्षित समाज या लोकांना भावनिक आधार न देता, त्यांचा छळ करतो. सामाजिक मुख्य धारेत त्यांना का सामावून घेत नाही ? त्यांचा तिरस्कार करतो आणि त्यांना प्रत्येक सामाजिक, प्राथमिक आणि मानवीय सुविधेपासून दूर ठेवतो. सर्वांत गलिच्छ म्हणजे या तृतीयपंथी समुदायाचा वेशा व्यवसायासाठी वापर होतो आणि त्यांना त्या व्यवसायाकडे बळजबरीने ढकलले जाते. आता आपण म्हणाल की त्यांचे आचारण उचित नाही, असले लोक समाजात दुराचार आणि अश्लिलता पसरवतात, जबरदस्तीने पैसे वसूल करतात, अनाप-शनाप बोलतात, शिवीगाळ करतात, चोरी करतात आणि जर का आपण यांना पैसे दिले नाहीत तर चार चौघात अश्लिल इशारे आणि व्यवहार करतात. बरोबर आहे हे तृतीयपंथी नक्कीच असे वागतात.

पण आपण सुशिक्षित समाजाने आणि आधुनिक पाश्चात्य संस्कृतीचा पाठपुरावा करणाऱ्या समाजाने कधी शांतपणे या गोष्टींचा विचार किंवा आत्मचिंतन केले आहे काय? की, त्यांच्या असल्या वागण्याला जबाबदार कोण आहे? आपल्यासारखी ती पण माणसं असताना, त्यांना पण पोट असतांना, भावना असताना, स्वप्नं असताना, त्यांच्या पण जीवनात बऱ्याच महत्त्वाकांंक्षा असताना आपण त्यांना मूलभूत त्यांच्या मानवीय अधिकारांपासून वंचित ठेवले. त्यांना रोजगार नाही, शिक्षण नाही, सन्मान नाही, समाजात त्यांना कुणीही मानवीय नजरेने बघत नाही. त्यां

जात आणि लिंगभाव

[संपादन]

लिंगभाव आधारित श्रम विभाजन

[संपादन]

उदा: मुलींनी घरकाम, रांगोळी काढणे मुलांनी: बाहेरील कामे, दगड फिडणे, खुर्ची टेबल लावणे इ.[]

स्त्री -पुरुष तुलना

जसे की स्त्रीला एक गृहलक्षुमी नसून तिला एक घरातील बंदिस्त आणि बटीक बनवली जाते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ वंदना सोनळकर, शर्मिला रेगे, पितृसत्ता व स्त्रीमुक्ती, क्रांतिसिंह नाना पाटील अकादमी.
  2. ^ Bhasin, Kamla (2000). Understanding Gender (इंग्रजी भाषेत). Kali for women. ISBN 9788186706213.