सुधीर तेलंग
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
सुधीर तेलंग (इ.स. १९६०:बिकानेर; इ.स. २०१६) हे एक मराठी व्यंगचित्रकार होते. त्यांची व्यंगचित्रे विविध वर्तमानपत्रांतून ३५ वर्षे प्रसिद्ध झाली.
लहानपणापासून तेलंग यांना टिनटिन, फँटम, ब्लाँडी या व्यक्तिरेखांचे आकर्षण होते. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी पहिले व्यंगचित्र इंदिरा गांधींचे काढले. लालकृष्ण अडवाणींची किमान एक हजार चित्रे त्यांनी काढली आहेत.[ संदर्भ हवा ]
सुधीर तेलंग यांची व्यंगचित्रे प्रथम राजस्थान पत्रिकेत प्रसिद्ध झाली. १९८२ मध्ये द इलस्ट्रेटेड वीकलीत व नंतर दिल्लीच्या एका हिंदी पत्रात येऊ लागली. पुढे हिंदुस्तान टाइम्स, इंडियन एक्स्प्रेस, टाइम्स ऑफ इंडिया आणि एशियन एज या वृत्तपत्रांतूनही त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली.
त्यांच्या व्यंगचित्रांच्या प्रेमात असलेल्या मुलीशीस त्यांचा विवाह झाला होता.
सार्वकालिक व्यंगचित्रे
[संपादन]सुधीर तेलंग यांची भ्रष्टाचार, गरिबी, निरक्षरता, बेरोजगारी या समस्यांवरची ३० वर्षांपूर्वीची काही व्यंगचित्रे कालसुसंगत राहिली.
झोळीवाला पत्रकार
[संपादन]झोळीवाला पत्रकार ही आर.के. लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनसारखीच एक व्यक्तिरेखा तेलंग यांनी त्यांच्या व्यंगचित्रात असायची. गोटीबंद दाढी, खांद्यावर झोळी असे त्याचे रूप होते. हा पत्रकार तटस्थ नजरेने जगाचे निरीक्षण करणारा होता. कालांतराने पत्रकारांच्या खांद्यावरची झोळी गेली व ती व्यक्तिरेखाही त्यांनी बंद केली. व्यंगचित्रेही अधिक तिखट, धारदार होऊ लागली. याबाबत त्यांचे साम्य अबू अब्राहम यांच्याशी होते. स्वतंत्र भारतातील राजकीय व्यंगचित्र-परंपरा शंकर यांच्यापासूनची आहे आणि लक्ष्मण हे राजकीय मतमतांतरांपेक्षा लोकांना महत्त्व देणारे होते. अबू अब्राहम आणि पुढे तेलंग हे शंकर यांच्या परंपरेला पुढे नेणारे व्यंगचित्रकार होत.
प्रदर्शने
[संपादन]व्यंगचित्रांखेरीज क्वचित ते चित्रेही रंगवत. २०१४ मध्य तेलंगांनी दिल्लीत त्यांच्या चित्रांचे हियर अँड हाऊ – राजीव टू मोदी हे प्रदर्शन भरवले होते, त्याला अनेक राजकीय नेत्यांनी भेट दिली होती.
पुस्तके
[संपादन]- सुधीर तेलंग यांचे भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरील व्यंगचित्रांचे नो प्राइम मिनिस्टर (२००९) हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
पुरस्कार
[संपादन]- २००४ मध्ये सुधीर तेलंग यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.