तँतँ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तँतँ[१] (मराठी नामभेद: टिनटिन ; फ्रेंच: Tintin) हा लेझावाँत्यूर द तँतँ (फ्रेंच: Les Aventures de Tintin ; अर्थ: तँतँची साहसे) या बेल्जियन काल्पनिक चित्रकथेचा नायक आहे. बेल्जियन चित्रकथाकार एर्जे याने ही व्यक्तिरेखा रेखाटली आहे. तँतँ पेशाने पत्रकार आहे. मीलू (चित्रकथेच्या इंग्लिश आवृत्तीत स्नोई) नामक आपल्या पाळीव कुत्र्यास सोबत घेऊन तँतँ जगभर फिरत असताना त्याने केलेल्या साहसी कामगिर्‍या या चित्रकथांमध्ये रंगवल्या आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. मूळ फ्रेंच भाषेतील उच्चार. फॉर्वो.कॉम. २६ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. (इंग्लिश, फ्रेंच मजकूर)


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेतWiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.