Jump to content

सुदर्शन रापतवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुदर्शन रापतवार हे एक पत्रकार, संपादक, लेखक व राजकीय विश्लेषक आहेत. ३० हून अधिक वर्षे ते या व्यवसायात आहेत. सामाजिक व राजकीय विषयांची अभ्यासपूर्ण माहिती सह ते बातम्या लिहितात.[]

प्रारंभिक कारकीर्द

[संपादन]

रापतवार यांनी आपल्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात नांदेड येथील गोदातीर समाचार या दैनिकात कंपोजिटर म्हणून केली. पुढे ते मराठवाडा साथी, चंपावती पत्रिका, लोकपत्र आणि लोकमत या दैनिकांन मध्ये त्यांनी काम केले. लोकमत मध्ये त्यांनी १५ वर्षे काम केले[]. पुढारी, एकमत आणि दिव्य मराठी या दैनिकांसाठी त्यांनी काम केले[].

पत्रकारितेतील केलेले काम

[संपादन]
  • तालुका प्रतिनिधी
  • उपविभागीय प्रतिनिधी
  • ब्युरो चीफ
  • विभागीय प्रतिनिधी
  • संपादक

साहित्य व प्रकाशन

[संपादन]

पत्रकारितेबरोबरच रापतवार यांनी लेखक म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रावर आधारित खालील पुस्तके लिहिली आहेत:  

  • असामान्य
  • मंदिरांचे गाव[]
  • सहज सुचलं म्हणून[]

त्यांची पुस्तके महाराष्ट्राच्या वारसा आणि सामाजिक वास्तवाचे मार्मिक चित्रण करतात.  

पुरस्कार

[संपादन]
  1. अनंत भालेराव पुरस्कार
  2. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार
  3. 'नव ज्योति संस्था' पुरस्कार (किरण बेदी फाऊंडेशन)[]
  4. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार[]
  5. अप्रतिम मीडियाचा चौथास्तंभ पुरस्कार[]
  6. भक्त नामदेव साहित्य पुरस्कार[][१०]

विशेष प्रकल्प  

[संपादन]

एखाद्या विशिष्ट विषयावर अभ्यासपूर्ण लेखांचा संग्रह करून विशेषांक प्रसिद्ध करणे ही त्यांची खासियत आहे. त्यांच्या विशेषांकांनी वाचकांवर वेगळी छाप टाकली आहे.[ व्यक्तिगतमत ]

भूमिका  

[संपादन]

सुदर्शन रापतवार सध्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत. सामाजिक प्रश्नांवर सखोल जाण असलेला एक अभ्यासू पत्रकार आणि संवेदनशील कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. मराठवाडा साहित्य परिषद शाखा अंबाजोगाई साहित्य संमेलन स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार[११][१२][१३][१४][१५][१६][१७]

संदर्भ  

[संपादन]
  1. ^ "अंबाजोगाई साहित्य संमेलन". विकिपीडिया. 2024-12-15.
  2. ^ रापतवार, सुदर्शन (2024-11-15). सहज सुचलं म्हणून..!. Madhyam Publication's. ISBN 978-81-902787-8-2.
  3. ^ रापतवार, सुदर्शन (2024-11-15). सहज सुचलं म्हणून..!. Madhyam Publication's. ISBN 978-81-902787-8-2.
  4. ^ रापतवार, सुदर्शन (2024-08-15). मंदिराचे गाव. Madhyam Publication. ISBN 978-81-902787-7-5.
  5. ^ रापतवार, सुदर्शन (2024-11-15). सहज सुचलं म्हणून..!. Madhyam Publication's. ISBN 978-81-902787-8-2.
  6. ^ "किरण बेदी". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2024-11-06.
  7. ^ "उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार". माहिती व जनसंपर्क महासंचालनालय. 2024-01-05. 2024-12-16 रोजी पाहिले.
  8. ^ "उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार". माहिती व जनसंपर्क महासंचालनालय. 2024-01-05. 2024-12-15 रोजी पाहिले.
  9. ^ "नानक साई च्या घुमान साहित्य सभेचे स". www.bhartiyamahitiadhikar.com. 2024-12-15 रोजी पाहिले.
  10. ^ "सुदर्शन रापतवार भक्त नामदेव साहित्य पुरस्काराने सन्मानित | Satya Marathi News". www.satyamarathinews.com. 2024-12-15 रोजी पाहिले.
  11. ^ "अंबाजोगाई साहित्य संमेलन लोकाभिमुख व्हावे यासाठी सर्वांनी सहकार्य करावे - विजयी दर्पण न्यूज" (इंग्रजी भाषेत). 2024-11-27. 2024-12-15 रोजी पाहिले.
  12. ^ "११ वे अंबाजोगाई साहित्य संमेलन विविध उपक्रमांचे आयोजन - NEWS 24 TODAY" (इंग्रजी भाषेत). 2024-07-09. 2024-12-15 रोजी पाहिले.
  13. ^ "११ वे अंबाजोगाई साहित्य संमेलन पार्श्वभूमीवर ४ डिसेंबर रोजी साहित्यिकांची बैठक". वास्तव दर्शन (इंग्रजी भाषेत). 2024-12-15 रोजी पाहिले.
  14. ^ "११ वे अंबाजोगाई साहित्य संमेलन पार्श्वभूमीवर ४ डिसेंबर रोजी साहित्यिकांची बैठक". www.viveksindhu.com. 2024-12-15 रोजी पाहिले.
  15. ^ "११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सुदर्शन रापतवार यांची निवड". www.viveksindhu.com. 2024-12-15 रोजी पाहिले.
  16. ^ "Lokmat ePaper: Marathi News Paper | Online English, Hindi & Marathi Paper | Daily News ePaper| Today's News Papers | लोकमत वृत्तपत्रे". epaper.lokmat.com. 2024-12-15 रोजी पाहिले.
  17. ^ आंबेकर ९४२२९३१४२१, दत्तात्रय (2024-12-13). "११ वे अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे उद्या होणार उद्घाटन, नागरीकांना सहभागी होण्याचे स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांचे आवाहन". Zunjar News | Marathi News Portal in Maharashtra State | Top News | (इंग्रजी भाषेत). 2024-12-15 रोजी पाहिले.