सास्काचेवान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सास्काचेवान
Saskatchewan
कॅनडाचा प्रांत
ध्वज
चिन्ह

सास्काचेवानचे कॅनडा देशाच्या नकाशातील स्थान
सास्काचेवानचे कॅनडा देशामधील स्थान
देश कॅनडा ध्वज कॅनडा
राजधानी रेजिना
सर्वात मोठे शहर सास्काटून
क्षेत्रफळ ६,५१,९०० चौ. किमी (२,५१,७०० चौ. मैल)
लोकसंख्या (२०११) १०,३३,३८१
घनता १.७५ /चौ. किमी (४.५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CA-SK
प्रमाणवेळ यूटीसी−०६:००
संकेतस्थळ http://www.gov.sk.ca

सास्काचेवान हा कॅनडा देशाच्या गवताळ प्रदेशामधील एक प्रांत आहे. सास्काचेवानच्या पूर्वेस मॅनिटोबा, उत्तरेस नॉर्थवेस्ट टेरिटोरीज, पश्चिमेस आल्बर्टा हे कॅनडाचे प्रांत तर दक्षिणेस अमेरिका देशाची नॉर्थ डकोटामोंटाना ही राज्ये आहेत. सास्काचेवानमधील लोकवस्ती अत्यंत तुरळक असून बव्हंशी रहिवास प्रांताच्या दक्षिण भागात वास्तव्य करतात.

इ.स. १६९० मध्ये येथे युरोपीय शोधक पोचले व १७७४ साली येथे वसाहतीस सुरुवात केली गेली. सास्काचेवानला १९०५ साली प्रांताचा दर्जा मिळाला. सध्या येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीप्रधान असून खाणकाम हा देखील एक प्रमुख उद्योग आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: