सावनी रवींद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.
सावनी रवींद्र
चित्र:Savani.jpg
सावनी रवींद्र
आयुष्य
जन्म २२ जुलै, १९८९ (1989-07-22) (वय: ३२)
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
देश भारत
भाषा मराठी, इंग्रजी, हिंदी भाषा
पारिवारिक माहिती
आई वंदना घांगुर्डे
वडील डॉ. रवींद्र घांगुर्डे
संगीत साधना
गायन प्रकार कंठसंगीत
संगीत कारकीर्द
कार्य पार्श्वगायन
पेशा पार्श्वगायन
बाह्य दुवे
संकेतस्थळ

सावनी रवींद्र ( २२ जुलै, १९८९ - ) ह्या भारतीय संगीतसृष्टीतील, विशेषतः मराठी संगीतक्षेत्रातील एक गायिका आहेय.

बालपण आणि शिक्षण[संपादन]

२२ जुलै १९८९ रोजी संगीताचा वारसा असलेल्या कुटुंबात सावनीचा जन्म झाला. शास्त्रीय गायक आणि गायक अभिनेता असलेले तिचे वडील डॉ. रवींद्र घांगुर्डे आणि मराठी संगीत नाटकांतील गायिका अभिनेत्री वंदना घांगुर्डे ह्या मात्यापित्यांकडून तिला बालपणापासून संगीताचे धडे मिळाले. वडील डॉ. रवींद्र घांगुर्डे यांच्याकडून विविध रागरागिण्यांची ओळख करून घेतानाच सावनी नाट्यसंगीत आणि सुगम संगीतही गाऊ लागली. वयाच्या ८व्या वर्षापासून तिने मराठी सुगम संगीताचे शिक्षण संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांच्याकडून घेण्यास सुरुवात केली.

नादब्रह्म परिवाराने आयोजित केलेल्या केलेल्या यशंवत देव यांच्या अमृत महोत्सवी सत्कार प्रसंगी सादर केलेल्या 'देवगाणी' या कार्यक्रमात आशा भोसले यांच्या उपस्थितीत गायन करण्याची संधी सावनीला मिळाली. या कार्यक्रमातील तिचे गायन ऐकून महाराष्ट्राचे तत्कालीन सांस्कृतिक मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांनी तिची निवड भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ऎ.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या भेटीसाठी पाठविण्यात येणाऱ्या महाराष्ट्राच्या संघात केली. १४ नोव्हेंबर २००२ रोजी सावनीने राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतली. याप्रसंगी तिला यशंवत देवांनी रचलेले एक गीत गाण्याची संधी मिळाली.

सावनी रवींद्रचे शिक्षण पुण्यामधील फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. फर्ग्युसनतर्फे काही निवडक प्रतिभावंत विद्यार्थ्यांना युरोपमध्ये पाठवण्यात आलेल्या चमूमध्ये सावनी होती. तिने रवि दाते यांच्याकड़े गझल गायकीचे आणि पं. पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे.

कारकीर्द[संपादन]

'गझल का सफर', 'ब्लॅक ॲन्ड व्हाईट', 'गुलझार - बात पश्मिने की' यासारख्या काही संगीताच्या कार्यक्रमातून सावनी घांगुर्डे गायल्या आहेत. ब्लॅक ॲन्ड व्हाईट या कार्यक्रमाचे प्रयोग अमेरिका, लंडन, दुबई, अबुधाबी इथेही झाले आहेत. 'अजब लग्नाची गजब गोष्ट' आणि 'भैरू पैलवान की जय', 'ती रात्र', 'मानसन्मान', 'दांडगी मुलं', 'पाच नार एक बेजार' या चित्रपटांसाठी सावनीने पार्श्वगायन केले आहे.. संगीताचे कार्यक्रम, चित्रपट या बरोबरच त्यांच्या संगीताचा 'आशाएं' हा हिंदी आणि 'अजूनही' आणि 'कॅनव्हास' हे दोन मराठी अल्बम रसिकांच्या निघाले आहेत. त्यांच्या 'सूर आनंदघन' ह्या कार्यक्रमाचे प्रयोग महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होत असतात. महाराष्ट्राबाहेरही भुवनेश्वर, दिल्ली, गुजरात, बँगलोर, ओरिसा येथे त्यांचे कार्यक्रम सादर झाले आहेत. त्याबरोबर पं. यशवंत देव ह्यांच्या देवगाणी ह्या कार्यक्रमात आणि इतर कार्यक्रमात गायक अरुण दाते, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, रविंद्र जैन, उत्तरा केळकर, श्रीधर फडके यांच्या कार्यक्रमांत त्यांना गायची संधी मिळाली आहे. हृदयनाथ मंगेशकर ह्यांनीही त्यांच्या 'भावसरगम' ह्या कार्यक्रमात एकदा सहगायिका म्हणून सावनीला गाण्याची संधी दिली आहे. .

पारितोषिके आणि पुरस्कार[संपादन]

  • बालकलाकारांना देण्यात येणारा शाहू मोडक पुरस्कार
  • मोरया फ़ाऊंडेशन तर्फ़े मोरया गोसावी पुरस्कार
  • रतिलाल भावसार पुरस्कार

इतर माहिती[संपादन]

"होणार सून मी ह्या घरची" या लोकप्रिय मालिकेमध्ये गायलेल्या "तू मला , मी तुला गुणगुणू लागलो पांघरू लागलो सावरू लागलो " या गीतामुळे सावनी घांगुर्डे यांचा आवाज घरांघरांत पोहोचला आहे. .झी-मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीच्या २०१४ सालच्या ‘सारेगमप’ स्पर्धेच्या जाहिरातीत सावनीचा आवाज आहे. नुकतेच सावनी हिचे लग्न आशिष धांडे ह्यांबरोबर झाले. आशिष धांडे हे युवा उद्योजक आहेत.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]