समकालीन प्रकाशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२४ एप्रिल २००६ रोजी पुण्यात ‘समकालीन प्रकाशन’ या प्रकाशनसंस्थेची सुरुवात झाली. सामाजिक विषय महत्त्वाचे मानणाऱ्या आणि ते विषय आतून-बाहेरून समजावून घेऊ इच्छिणाऱ्या वाचकांना एक भक्कम व्यासपीठ मिळावे या उद्देशानेच ‘समकालीन’ची आजवरची वाटचाल राहिलेली आहे.

<blockquote>

`मराठीतील अव्वल दर्जाची प्रकाशनसंस्था उभी करण्याची आमची इच्छा आहे. व्यावसायिकता, प्रयोगशीलता आणि सामाजिक जबाबदारी यांचं संतुलन साधून चांगली पुस्तकं प्रकाशित करण्याची आमची भूमिका आहे. स्मरणरंजन म्हणजे नॉस्टेल्जियामध्ये न अडकता समकालीन विषयांचं बोट धरून आम्ही पावलं टाकू इच्छितो...'

- १५ ऑगस्ट २००६ रोजी प्रकाशित झालेल्या समकालीन प्रकाशनाच्या पहिल्या पुस्तकाच्या (खरेखुरे आयडॉल्स) प्रस्तावनेतील मजकूर

</blockquote>


समकालीन प्रकाशनातर्फे आजवर ७०हून अधिक मराठी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांची साधारण पाच प्रकारांत विभागणी होते.

१. समूहलेखनातून प्रत्यक्षात आलेली पुस्तके

२. समकालीन प्रकाशनाचे संपादक आणि त्यांच्या मित्रमंडळींनी लिहिलेली पुस्तके

३. संपादकांच्या कल्पनेतून साकारलेली पुस्तके

४. धडपड्या लोकांची पुस्तके

५. ‘अनुभव’ अंकात (आणि अन्यत्रही) प्रसिद्ध झालेल्या लेखांना एका धाग्यात गुंफून प्रकाशित झालेली पुस्तके


या मराठी पुस्तकांची यादी अशा प्रकारे :


१. आयडॉल्स भाग - १ (युनिक फीचर्स)

२. खरीखुरी टीम इंडिया (युनिक फीचर्स)

३. सत्तासंघर्ष (संपादक: सुहास पळशीकर, सुहास कुलकर्णी)

४. होय, व्यसनमुक्ती शक्‍य आहे! (महेंद्र कानिटकर)

५. करके देखो (युनिक फीचर्स)

६. आधुनिक स्फूर्तिकथा (श्रुती पानसे)

७. बिग बॉस (आनंद अवधानी)

८. मेकअप उतरवल्यावर (मृणाल कुलकर्णी)

९, धर्मवादळ (निळू दामले)

१०. प्रकाशवाटा (डॉ. प्रकाश आमटे)

११. अज्ञात गांधी (मूळ इंग्रजी लेखक - नारायणभाई देसाई, मराठी अनुवाद - सुरेशचंद्र वारघडे)

१२. लोकशाही ज़िंदाबाद (योगेंद्र यादव, सुहास पळशीकर, पीटर डिसूझा)

१३. शहाण्यांचा सायकिॲट्रिस्ट (डॉ. आनंद नाडकर्णी)

१४. आहे कॉर्पोरेट तरी... (संजय भास्कर जोशी)

१५. अर्धी मुंबई (युनिक फीचर्स)

१६. खरेखुरे आयडॉल्स - भाग २ (युनिक फीचर्स)

१७. मुक्तांगणची गोष्ट (अनिल अवचट)

१८. परत मायभूमीकडे (डॉ. संग्राम पाटील)

१९. जग बदल घालुनि घाव (एकनाथ आवाड)

२०. प्लॅटफॉर्म नं. झिरो (अमिता नायडू)

२१. सदरा बदललेली माणसं (मनोहर सोनवणे)

२२. संभव असंभव (निरंजन घाटे)

२३. कुण्या एकाची धरणगाथा (अभिमन्यू सूर्यवंशी)

२४. माझं प्रिस्क्रिप्शन (डॉ. सदानंद नाडकर्णी)

२५. देवाच्या नावाने (युनिक फीचर्स)

२६. सुखाच्या शोधात... (डॉ. अनघा केसकर)

२७. तेरा ते तेवीस (मुक्ता चैतन्य)

२८. रिपोर्टिंगचे दिवस (अनिल अवचट)

२१. वैद्यकाचा बाजार... (डॉ. श्रीराम गीत)

३०. इथे नांदतो दुष्काळ (रमाकांत (बापू) कुलकर्णी)

३१. इथे खरी मुंबई भेटते (युनिक फीचर्स)

३२. रानमित्र (डॉ. प्रकाश आमटे)

३३. आम्ही माडिया (एम. डी. रामटेके)

३४. रानबखर (मिलिंद थत्ते)

३७. खिडक्या अर्ध्या उघड्या (गणेश मतकरी)

३६. एक आझाद इसम (मूळ इंग्रजी लेखक - अमन सेठी; मराठी अनुवाद : अवधूत डोंगरे)

३७. माझी चित्तरकथा (अनिल अवचट)

३८. नशायात्रा (तुषार नातू)

३९. तिची कहाणी (निरंजन घाटे)

४०. शेतकरी जेव्हा जागा होतो (अभिमन्यू सूर्यवंशी)

४१. ळ (संजीव लाटकर)

४२. एव्हरेस्ट (उमेश झिरपे)

४३. या शेताने लळा लाविला ना. धों. महानोर)

४४. आनंदवन प्रयोगवन (डॉ. विकास आमटे)

४५. पुन्हा एकदा (सानिया)

४६. लाकूड कोरताना (अनिल अवचट)

४७. शोध नेहरूंचा (मूळ इंग्रजी लेखक - शशी थरूर: मराठी अनुवाद - मनोहर सोनवणे)

४८. गोष्ट खास पुस्तकाची (युनिक फीचर्स)

४९. गोष्ट गुरुजी घडण्याची (प्रल्हाद काठोले)

४०. जनसेवे जीवन दिधले (अभिमन्यू सूर्यवंशी)

४१. सलोख्याचे प्रदेश (मूळ इंग्रजी लेखक - सबा नक्की; मराठी अनुवाद - प्रमोद मुजुमदार)

४२. विधिमंडळातून (ना.धों. महानोर)

५३. कुतूहलापोटी (अनिल अवचट)

५४. कायमचे प्रश्‍न (रत्नाकर मतकरी)

५५. आठवणींचा झोका (ना.धों. महानोर)

४६. आमचा पत्रकारी खटाटोप (युनिक फीचर्स)

५७. शोधा खोदा लिहा (युनिक फीचर्स)

५८. वाचत सुटलो त्याची गोष्ट (निरंजन घाटे)

५९. गोंदण (रत्नाकर मतकरी)

६०. शांततेचा आवाज (रत्नाकर मतकरी)

६१. सोनेरी सावल्या (रत्नाकर मतकरी)

६२. अवघे धरू सुपंथ (आनंद अवधानी)

६३. लोचना आणि आलोचना (संपादक : चंद्रकांत पाटील, केशव तुपे)

६४. देणारं झाड (सदा डुंबरे)

६५. दास्तॉ-ए-जंग (हाजी नदाफ)

६६. बदल पेरणारी माणसं (संपादन: संजीव फणसळकर, अजित कानिटकर)

६७. मी लोकांचा सांगाती (संपतराव पवार)

६८. गपसप (ना.धों. महानोर)

६९. नुक्कड (विजय खाडिलकर)

७0. हटके भटके (निरंजन घाटे)

७१. दारिद्ऱ्याची शोधयात्रा (हेरंब कुलकर्णी)


समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेली हिंदी पुस्तके :

१. आलोकित पथ (डॉ. प्रकाश आमटे)

२. बदलाव के राही (संपादन: संजीव फणसळकर, अजित कानिटकर)


समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेली इंग्रजी पुस्तके :

1. Dare to Dream (श्रुती पानसे|Shruti Panse]])

2. Pathway's to Light (Dr. Prakash Amte)

3. Learning to live again (Anil Awachat)

4. The Resignation (Sanjay Bhaskar Joshi)

5. Jihad-E-Teen Talaq (Sayedbhai)

6. Gems of Purest Ray Serene (Editors : Sanjiv Phansalkar & Ajit Kanitkar)