Jump to content

विकास आमटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. विकास आमटे हे महाराष्ट्रातील वरोरा येथील समाजसेवक आहेत.

विकास आमटे हे बाबा आमटे यांचे चिरंजीव असून ते आपल्या कुटुंबासह बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या आनंदवन प्रकल्पाची देखरेख करतात. यात त्यांची पत्‍नी भारती, मुलगा कौस्तुभ आणि सून पल्लवी तसेच मुलगी शीतल व जावई गौतम करजगी यांचा समावेश आहे.

Dr. Vikas Amte

आमटे यांच्या तीन पिढ्यांची कहाणी सांगणारे आणि त्यांनी कसे व किती कार्यकर्ते घडवले याची साद्यंत माहिती देणारे आनंदवन-प्रयोगवन नावाचे पुस्तक डॉ. विकास आमटे यांनी लिहिले आहे. शब्दांकन गौरी कानेटकर यांचे आहे.

सौ. चित्रलेखा पुरंदरे यांनी विकास आनंदवनाचा नावाचे पुस्तक लिहिले आहे.
डॉ. विकास आमटे प्रा. नरेंद्र नायडूंसोबत पुण्यामध्ये ११ नोव्हेंबर २०१६ रोजी

लोकसत्ता लेखमाला

[संपादन]

दै. लोकसत्तामध्ये बाबा आमटे आणि आनंदवन याबद्दलच्या आठवणींवर संचिताचे कवडसे नावाची एक लेखमालिका त्यांनी लिहिली.[]

पुरस्कार

[संपादन]
  • डॉ. विकास आमटे यांना रोटरी क्लब ऑफ पुणे (सारसबाग)च्या वतीने रोटरी सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.(२०-१२-२०१५)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "संचिताचे कवडसे | Loksatta". www.loksatta.com. 2018-12-26 रोजी पाहिले.